संपादने
Marathi

आदर्श माता ते आदर्श उद्योजिका – तारा शर्मा सलुजा यांची कथा

29th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

“ आज सिंहावलोकन करताना असे दिसते, की मातृत्वाने मला एकाच वेळी एकापेक्षा अधिक कामे करण्यासाठी सक्षम बनविले आहे. उद्या सकाळपर्यंत मला काही मजकूर पाठवायचा आहे. पण करारात नमुद केलेल्या वेळेत मी तो निश्तितपणे देऊ शकेन, याची मला खात्री असल्याने, मी अगदी शांत आहे. पण जर काही वर्षांपूर्वीची मी असते, तर अशा प्रसंगी मी निश्चितच तणावाखाली आले असते,” हैदराबादमधील एका टेरेस रेस्टॉरंटमध्ये बसून अतिशय शांत चित्ताने तारा शर्मा सलुजा बोलत होत्या. तारा या एक मॉडेल, अभिनेत्री आणि आता एक उद्योजिका आहेत, ज्या स्वतःचा एक टीव्ही शो (कार्यक्रम) चालवितात.

‘प्रत्येक जण स्वतंत्र असून स्वतंत्रपणे विचार करतो’, या तत्वज्ञानावर प्रचंड विश्वास असल्याने, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम असतात असे तारा मानतात. “ ‘मॉमप्रुनर्स’ (मॉम अर्थात आई अधिक आन्त्रप्रुनर्स अर्थात उद्योजक) आणि आन्त्रप्रुनर्स (उद्योजक) हे निराळे आहे. माझ्यासाठी फक्त वाढ हे काही एकमेव उत्तर नाही. सध्या मी मॉमप्रुनर आणि मुलांकडे स्वतः लक्ष देणारी आई यांच्यामधील तोल सांभाळण्यातच आनंदी आहे. कदाचित काही वर्षांनंतर यामध्ये बदल होऊ शकेल, पण वैयक्तिकरित्या माझ्यासाठी या परिस्थितीत असणे चांगले आहे,” तारा सांगतात.

त्या स्वतःला अभ्यासू म्हणवून घेतात, ज्यांचे सर्व लक्ष हे नेहमीच शिक्षणाकडे होते. माध्यमिक विद्यालयात असताना, त्या सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक होत्या. त्यानंतर त्या इटलीतील ऍड्रीएटीक येथील युडब्ल्युसी येथे शिष्यवृत्तीवर गेल्या. त्यावेळच्या अनुभवाबाबत विस्ताराने सांगताना त्या म्हणतात, की काही वेळा अशा असत, जेंव्हा त्यांना घराची खूपच ओढ वाटत असे पण तरीही हा अनुभव फारच छान होता. “ तेथे ७५ वेगवेगळ्या देशांतील लोक होते आणि त्यामुळे मला सांस्कृतिक देवाणघेवाणीचा खूपच चांगला अनुभव मिळविता आला आणि या अनुभवातून खूप चांगला बोधही मिळाला,” त्या सांगतात.

image


जन्माने अर्ध्या इंग्लिश-अर्ध्या भारतीय असल्याने, तारा यांना असा विश्वास वाटतो की, जगभरात प्रवास केल्याने आणि स्वतःची कामे स्वतः केल्याने, खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यक्ती होणे म्हणजे काय हे समजण्यास त्यांना मदत झाली. त्यानंतर त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे व्यवस्थापनातील बी.एससी. पूर्ण करण्यासाठी गेल्या.

शिक्षण संपल्यानंतर तारा यांनी सिटीबॅंकेत इंटर्नशीप केली आणि ऍक्सेंचरमध्ये नोकरी केली. “ मी नेहमीच स्वतःला सूट घालून एखादी कॉर्पोरेट नोकरी करताना बघितले होते. मला वाटते, त्यावेळी मी त्याचा पूर्ण विचार केला नव्हता,” त्या पुढे सांगतात. सिटीबॅंकेतील इंटर्नशीपनंतर तारा यांनी पंख पसरुन जगभरात प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

त्या जरी खूपच अभ्यासू आणि कॉर्पोरेट वृत्तीच्या असल्या, तरी तारा यांचे वडील प्रताप शर्मा हे एक लेखक आणि नाटककार होते आणि त्यामुळे मॉडेलिंग, अभिनय आणि सर्जनशील गोष्टींच्या जगाशी त्यांचा परिचय होता. “ आज मागे वळून बघताना, मला वाटते की मी शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्राची निवड केली, ती एक सुरक्षिततेची भावना मिळविण्यासाठी. माझे वडील स्वतंत्रपणे काम करत होते आणि वेगवेगळ्या गोष्टी करत होते आणि मला वाटले की, कॉर्पोरेट नोकरी ही मला एक सुरक्षितता देऊ शकेल,” त्या सांगतात.

पण त्यांच्या मते, त्यांचे मन हे नेहमीच अभिनय आणि आयुष्यातील सर्जनशील गोष्टींकडे झुकलेले होते. तरीही सुरुवातीला आखलेल्या या योजनेचा फायदा त्यांना त्यांच्या शोसाठी जाहिरातदारांसमोर आपली बाजू मांडताना झाला. ऍक्सेंचरमध्ये दोन वर्षे घालविल्यानंतर तारा यांनी मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या मॉडेलिंग क्षेत्रातील कामगिरीने त्यांना चित्रपटांसाठी विचारणा होण्यास मदत झाली. पण चित्रपटांचे जग हे काही वेगळेच होते, यानिमित्ताने तारा आता एका अशा जगाच्या दिशेने गेल्या जेथे निश्चित वेळा अशा काही नव्हत्याच. ते वेगळेच होते, पण त्यांना मात्र त्यातून खूपच आनंद मिळाला. “ त्यापैकी काही चित्रपट चांगले चालले, काही ठीकठाक चालले तर काही सपशेल आपटले. पण ठीक आहे,” त्या सांगतात.

पण खरे म्हणजे त्यांच्या पहिल्या अपत्यानंतर मात्र त्यांना चित्रपटासाठी विचारणाच झाली नाही. “ माझे वडील मला सांगत असत, ‘ जे तुम्हाला करायचे आहे ते जर अस्तित्वात नसेल, तर ते निर्माण करा.’ तुम्ही तुमचा पुन्हा नव्याने शोध घेणे आवश्यक आहे,” तारा सांगतात. त्यानंतर त्यांना जाणविले की त्यांना बोलायला आवडते तसेच वास्तवात आईची भूमिका करण्यात त्यांना निश्चितच आनंद वाटतो. “ जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष आई होत नाही, तोपर्यंत तुम्ही कशा प्रकारची आई व्हाल, हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मला नेहमीच मुलांकडे लक्ष देणारी, त्यांची सर्व कामे करणारी, अशी आई बनायचे होते. त्यानंतर मी माझा स्वतःचा शो सुरु करण्याचा निर्णय घेतला,” त्या पुढे सांगतात.

जरी त्यांनी यापूर्वी अनेक चर्चांचे कार्यक्रम (टॉक शो), स्वयंपाकविषयक कार्यक्रम (कुकरी शो) आणि इतर असेच कार्यक्रम पाहिले असले, तरी मातृत्व आणि पालकत्व यावर चर्चा होणारा एकही कार्यक्रम आतापर्यंत त्यांच्या बघण्यात आला नव्हता. त्या सांगतात, की जेंव्हा तुम्ही आई बनता, त्यावेळी लोक तुम्हाला घाबरवून टाकतात, पण हे काही नेहमीच सत्यावर आधारित नसते. या क्षेत्रातील मित्रांच्या सल्ल्याने आपला शो हा जाहिरातदार प्रायोजित करण्याचे त्यांनी ठरविले.

फिशरप्राईसपुढे त्यांनी सादरीकरण केले आणि त्यांना यासाठी राजी केले. त्यांचे पती रुपक सलुजा यांनी त्यांना हा कार्यक्रम केवळ टीव्हीपुरता मर्यादित न ठेवता, वेगवेगळ्या व्यासपीठांचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांच्या पटकथा या त्यांच्या ब्लॉगमधूनच येतात.

image


“ दुसऱ्या सिजनमध्ये आम्हाला जॉन्सन’स् मिळाले आणि का कार्यक्रम कलर्स वाहिनीवर गेला. तिसऱ्या सिजनपर्यंत हा इंग्रजीमध्ये गेला आणि पालकत्वाशी संबंधित विशिष्ट विषयांवर भाष्य केले,” तारा सांगतात. आता या कार्यक्रमाचे स्वरुप प्रसिद्ध व्यक्ती आणि सर्वसामान्य आणि फिचर विभाग असे आहे. मुलांच्या संगोपनाशी संबंधित सर्व विषय आणि मुलांच्या खास गरजांबाबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करण्यात येते.

“ जेंव्हा मी पहिल्यांदा प्रसिद्ध व्यक्तींना कार्यक्रमात येण्याबाबत विचारणा केली, तेंव्हा लोक मुलांवर बोलण्यास तयार नव्हते. पण आता माझ्याकडे काजोल, मेरी कॉम, शिल्पा शेट्टी आणि इतर अनेकजण आले आहेत. त्यामुळे मी आनंदी आहे. मला वाटते, एक आई असल्याने आता मी पूर्वी कधीच केला नसेल अशा पद्धतीने विचार करायला आणि कल्पना करायला शिकले आहे. मी त्याचा आनंद घेत आहे आणि मातृत्वाने तुमच्या कारकीर्दीवर परिणाम होतो, या सर्वसामान्य समजाच्या अगदी विरुद्ध जात, माझी कारकीर्द मात्र मातृत्वानेच अधिक भरभराटीला आली आहे,” तारा सांगतात.

यानिमित्ताने त्यांच्या कार्यक्रमात कोंकणा सेन शर्माने दिलेल्या उत्तराचा त्या आवर्जून उल्लेख करतात, तारा म्हणतात की मातृत्वाने त्यांना बदलले नाही पण त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू ताकदवान आणि खोलवर अर्थाने अधिक उंचीवर नेऊन ठेवले. “ त्यामुळे माझे प्राधान्यक्रम अधिक स्पष्ट झाले आणि मला दृढनिश्चय आणि सुरक्षिततेची एक मजबूत जाणीव दिली,” तारा सांगतात.


लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags