संपादने
Marathi

अत्याधुनिक तंत्रशिक्षणाची वेगळी वाट

श्रेयोवशी..परिवर्तनातून प्रगतीकडे !

12th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

“परिवर्तन झाल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. आणि तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल आणल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे.” सुप्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांचं हे विधान श्रेयोवशी यांच्यासाठी अगदी चपखलपणे लागू होतंय. श्रेयोवशींनी आपल्या करिअरची सुरुवात भूगोलापासून केली, पण नंतर मात्र त्यांनी दिशा बदलली. आजघडीला श्रेयोवशी ‘फ्रुगल लॅब्स’च्या सहसंस्थापक आणि मार्केटिंग डिरेक्टर आहेत. ‘फ्रुगल लॅब्स’मध्ये तंत्रशिक्षणासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, नवनवे प्रकल्प आणि प्रोटोटाईप अर्थात अशा प्रशिक्षणाचे नमुने तयार केले जातात.

श्रेयोवशी यांचा जन्म कोलकात्यामध्ये झाला. लहानपणापासूनच त्या अतिशय हुशार होत्या. त्यांचे वडील एक यशस्वी व्यावसायिक होते. त्यामुळे व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवणं त्यांच्यासाठी अगदी सोपं होतं. पण भूगोलात शिक्षण झालेल्या श्रेयोवशींनी त्यांची पहिली नोकरी एका एचआर कन्सल्टन्सी फर्ममध्ये केली. लवकरच एका विमा कंपनीच्या एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणून त्या चेन्नईला गेल्या. पण ही नोकरीसुद्धा त्यांना पटली नाही. काही महिन्यांनंतर त्या एका मित्राच्या रोबोटिक्स कंपनीत रुजू झाल्या. खरंतर त्यांना रोबोटिक्स प्रणालीविषयी काहीही माहिती नव्हतं. पण त्यांनी हे एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि कामाला सुरुवात केली. अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आणि मोठा संघर्ष केल्यानंतर ही कंपनी बंद पडली. हा त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला. श्रेयोवशी आणि त्यांचे मित्र अनिर्बन चौधरी या दोघांनीही भारतातल्या आयटी उद्योगाचं माहेरघर असलेल्या बंगळुरुमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अनिर्बनच पुढे जाऊन श्रेयोवशी यांच्यासोबत ‘फ्रुगल लॅब्स’चे सहसंस्थापक आणि तांत्रिक विभागाचे प्रमुख अर्थात टेक्निकल हेड बनले.

श्रेयोवशी..परिवर्तनातून प्रगतीकडे !

श्रेयोवशी..परिवर्तनातून प्रगतीकडे !


श्रेयोवशी सांगतात, “सुरुवातीच्या काळात हे फार कठीण होतं. पण मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याच्या जोरावर नोव्हेंबर २०१२मध्ये ‘फ्रुगल लॅब्स’ची सुरुवात केली. जिथे इतर कंपन्या नवनवीन उत्पादनं बनवण्याच्या मागे लागल्या होत्या, तिथे आम्ही ‘फ्रुगल लॅब्स’मध्ये उत्तम आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी ट्रेनिंग मॉड्युल्स बनवतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योगविश्वात मोठी मजल मारण्याचं स्वप्न बाळगणा-यांसाठी हे प्रशिक्षण मॉड्युल्स एक चांगली संधी निर्माण करुन देऊ शकतात.”

अत्याधुनिक तंत्रशिक्षणावर आधारित हे प्रशिक्षण मॉड्युल अतिशय सोप्या पद्धतीने बनवण्यात आलंय. जेणेकरुन प्रत्येकाला ते सहज समजावं. त्यासोबतच ‘फ्रुगल लॅब्स’ इतर कंपन्यांना उत्पादन प्रणालीचे विविध प्रकार आणि फायदेशीर प्रकल्प बनवण्यासाठी मदतही करते. जगभरातल्या ग्राहकांना कंपनी सेवा पुरवते. खास महाविद्यालयीन युवकांसाठी कंपनीने आयओटी अर्थात इंटरनेट ऑफ थिंग आन्त्रप्रुनर चॅलेंज २०१५ हे एक विशेष मॉड्युल बनवलंय. नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरील उद्योजकतेला प्राधान्य देण्याचा हेतू हे मॉड्युल बनवताना डोळ्यांसमोर ठेवण्यात आले. सुरुवातीचा काही काळ कंपनी स्वत:च आपला खर्च उचलत होती. मात्र कालांतराने कार्यशाळा आणि विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नफा येणं सुरु झालं. आज प्रामुख्याने कंपनी भारतातल्या महाविद्यालयीन युवकांना सेवा पुरवते.

श्रेयोवशी म्हणतात, “भारतात जवळपास ४००० अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. यापैकी ७०० कॉलेज हे एकट्या आंध्रप्रदेशात आहेत. दरवर्षी भारतात सुमारे ४५० अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या बाजारपेठेत दाखल होतात. तर अमेरिकेत हेच प्रमाण तब्बल २५ हजार इतकं आहे. आमचं म्हणणं आहे की भारतीय विद्यार्थी हे अतिशय हुशार आणि प्रतिभावान असतात. फक्त त्यांच्यात नव्या दृष्टीकोनाचा अभाव आहे. नेमकी हीच कमी भरुन काढणं आणि त्याद्वारे ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा आमचा मानस आहे.”

नवनवीन आव्हानं पार करण्याचा निर्भेळ आनंद...

नवनवीन आव्हानं पार करण्याचा निर्भेळ आनंद...


एक महिला उद्योजिका म्हणून श्रेयोवशी यांनी मिळवलेलं यश अतिशय वाखाणण्याजोगं आहे. श्रेयोवशी सांगतात, “मी या क्षेत्रात आनंदी आहे, कारण माझ्यासाठी कोणत्याही एका गोष्टीला चिकटून रहाणं महाकठिण आहे. परिवर्तन आलं, बदल घडला, तरच आयुष्यात नवनव्या गोष्टी शिकायला मिळतात.” श्रेयोवशींच्या मते भारतीय महिलांमध्ये उद्योजकता वाढते आहे. प्रत्येकाचं स्वत:चं स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. जर या क्षेत्रात महिलांचे प्रमाण अधिक वाढले तर समाजाची अधिक वेगाने प्रगती होईल.

या व्यवसायात पाय रोवल्यानंतर भविष्यातल्या त्यांच्या योजनाही तयार आहेत. श्रेयोवशी म्हणतात, “उद्योजकतेचं दुसरं नाव आव्हान असं आहे. तसं पहायला गेलं तर कोणत्याही व्यवसायात प्रत्येक निर्णय हा एक आव्हानच असतो. पण खरी मजा ही त्या आव्हानांना यशस्वीरित्या पार करण्यात आहे.” एका वेळी एकाच प्रकारच्या कामात स्वत:ला गुंतवून घेणं हे त्यांच्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. श्रेयोवशींना ‘फ्रुगल लॅब्स’ला भारतातली सर्वात मोठी तंत्रशिक्षण संस्था बनवायचंय. अनेक समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन भारतातल्या मागासलेल्या गावांमध्ये अशी समाजोपयोगी कामं करण्याची त्यांची इच्छा आहे. पण त्यांचा प्रवास इतक्यावरच थांबणारा नाही. एका नव्या प्रकल्पावर त्या काम करत आहेत. सध्या जरी तो अगदी प्राथमिक स्तरावर असला, तरी सामान्य माणसाचं आयुष्य अधिक सुखकर बनवण्याचा त्यामध्ये प्रयत्न असणार आहे. सगळ्यात शेवटी श्रेयोवशी स्वत:विषयी इतकंच सांगतात, “माझं मन हे खूप चंचल आहे. मी नेहमीच काहीतरी नवीन विचार करत असते. मी एक ब्लॉगरसुद्धा आहे. प्रवास करणं आणि उंच डोंगरांना साद घालणं मला आवडतं.”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags