संपादने
Marathi

टोमण्यांनी बदलले जीवन,. . . पॅशन पूर्ण करताना कामिनी सराफ यांनी मिळविले फॅशनच्या दुनियते मोठे नाव!

FM SALEEM
10th Jul 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

हैद्राबादच्या उद्यमी कामिनी सराफ यांनी आजपासून दहा-बारा वर्षांपूर्वी फॅशन प्रदर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते, ज्यावेळी लोक याबाबत छोट्या आयोजनापेक्षा जास्त विचारही करत नव्हते. त्यांनी तयार केलेल्या ब्रॅण्डला फॅशन यात्रेत वेगळी ओळख आहे, पण त्यामागे असलेल्या कहाणीबाबत खूपच थोडे लोक जाणतात, एक अशी कहाणी जी प्रेरित करते, आपल्या पॅशनमध्ये स्थान बनविण्यासाठी, स्वत:ला ओळखून त्यातून इतरांनाही लाभ देण्याची.

image


जीवनात गाडी, बंगला, नोकर- चाकर, ऐशोराम हेच काही सर्वस्व नाही. खूपकाही असूनही जेव्हा समाधान, संतोष आणि आत्मशांती यांचा शोध घेत कुणी निघतो, त्यावेळी त्यांच्या आतील पॅशन, शौक आणि आनंद आवाज देऊ लागतात. हा आवाज ओळखून त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणारे लोकच नवा इतिहास तयार करतात. आपल्या पाऊलखुणा काहीशा अशा उमटवतात की, त्यावर चालताना इतर लोकही सहजपणाने यशाच्या मार्गाने चालतात. आज जेंव्हा व्यापारी अहवाल सांगतात की, जगात प्रदर्शनांचा बाजार ५५ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे तेंव्हा खूप सारे लोक याकडे वळत आहेत. पण हैद्राबादच्या उद्यमी कामिनी सराफ यांनी आजपासून दहा बारा वर्षापूर्वीच त्यावेळी फॅशन क्षेत्रात पाऊल टाकले होते, ज्यावेळी लोक याबाबत छोट्या आयोजना पलिकडे विचार करत नव्हते. त्यांनी बनविलेल्या ब्रँण्डला चांगली दाद मिळत होती.

image


कामिनी सराफ यांना लहानपणी एका खास टिपणीने खूप त्रास झाला. ती त्यांच्या आपल्या लोकांनी केली होती. शहरात राहणारी त्यांची चुलत भांवंडे त्यांना नेहमी गावच्या मानत आणि तुच्छ लेखत. अश्याच टीका टोमण्यांना ऐकून कामिनी यांनी ठरविले की, त्या शहरात राहणा-या चुलत भांवडांना काही असे करून दाखवतील जे त्यांनी कधी विचारातही घेतले नसेल हेच कारण आहे की कामिनी यांचे मन परंपरागत उद्योगात लागले नाही. स्टीलच्या फॅक्टरीत मोठा आवाज करणा-या यंत्रात किंवा वातानुकूलीत कार्यालयात त्यांचे मन रमले नाही आणि निघाल्या त्या दुनियेत जेथे लोक एका नजरेत अपार सुख अनुभवतात. आपण तयार केलेल्या आरेखनानुसार तयार केलेल्या कपड्यांना विकून अमुल्य प्रसन्नता मिळवणा-यांच्या मध्ये दुवा बनण्यासाठी त्या निघाल्या आणि त्यांनी आज ते मिऴविले आहे जी खूप लोकांची फक्त इच्छा असते. कामिनी सराफ यांनी हैद्राबाद येथे प्रसिध्द डिझायनरांना जागा देणा-या शोरुमसाठी नियोजन केले आहे.

image


कामिनी सराफ यांचे बालपण रोमांचक होते. झारखंडच्या धनबाद मध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या त्या मोठ्या कुटुंबाच्या बाबत कामिनी सांगतात, “२० एकरवर पसरट घर, फुलं आणि भाज्यांच्या बागा, अनेक फॅक्टरीज आणि टाटा यांच्या सारख्या लोकांचे घरी येणे जाणे एका मोठ्या संयुक्त परिवारात पाच मुली आणि तीन मुलगे यांच्यात मी प्रत्येक कामात पुढे राहात असे. काका, दादा, मोठे भाऊ सगळे मला फॅक्टरीत फिरवत असत. औषध घ्यायचे असेल तर आजोबा त्याबाबत प्रथम वाच असे सांगत, त्याचा उपयोग काय आहे? आणि त्याचे प्रतिकूल परिणाम काय आहेत? हे जाणून घ्या आणि नंतर भरवा.

image


एका मोठ्या औद्योगिक परिवारात वाढलेल्या कामिनी यांचे जीवन सामान्य होते. सात वाजता त्या उठत आणि आजोबांची पत्र वाचावी लागत, त्यांची स्टेनो बनावे लागे. या साधेपणाला पाहून शहरात राहणा-या चुलत भावंडांनी त्यांना कमी लेखण्यास सुरुवात केली. त्या सांगतात की, “ चुलत भांवडे मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे राहात. जेंव्हा आम्ही तिथे जात असू तेंव्हा आमच्याशी असे वागत की, आम्ही गावातून आलो आहोत आणि त्यांच्या पेक्षा कमी आहोत. खरेतर मी डिझाइन मध्ये नेहमीच त्यांच्या वरचढ होते. मावशी, आत्या काकू सर्वजणी मला काहीना काहीतरी काम देत, घरचे पडदे लावून दे, लग्नासाठी ब्लाऊज नीट करून दे, जुनी साडी नीट करून दे, अशा अनेक कामात माझेच नाव पुढे असायचे. असे असूनही त्यांना मी गावची वाटायचे. माझ्या भावंडांना वाटे की मी लहान जागेतून आल्याने पॉलिश होणार नाही. त्याच वेळी मी विचार केला होता की, एक दिवस मी सांगेन मी काय होऊ शकते. तुम्ही मला बोलवाल तर मी तुमच्या पेक्षा श्रेष्ठ जागी असेन.”

image


आज जे लोक सडपातळ कामिनी सराफ यांना पाहतात, त्यांना कदाचित माहिती नसेल की आपल्या जाडेपणाच्या कारणाने त्यांना अनेक विद्यार्थीनी नी टोमणे मारले आहेत. आपल्याच वयाच्या घरातील दुस-या मुलांना शिकवणारी, आजोबांच्या नोटस लिहिणारी, बुध्दीमान समजली जाणारी कामिनी सराफ जेंव्हा सातव्या वर्गात शिकत होत्या, अचानक त्यांचे वजन वाढू लागले. सोबतच्या मैत्रीणी त्यांना चिडवू लागल्या. जाडेपणा असूनही वर्गात कामिनी अव्वल होत्या. एक दिवस अशी घटना झाली की त्यांनी सडपातळ होण्याचा निश्चय केला. त्याबाबत त्या सांगतात की, “ जरी आमचा परिवार त्या छोट्या जागेत राजासारखा होता. तरीही मी लहानपणी घरात गप्प राहात नसे. तरीही माझे वजन अचानक वाढू लागले. शाळेत ही परंपरा होती की अव्वल येणा-या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थी पालखीत घालून मिरवत असत. जेंव्हा मी अव्वल आले तेंव्हा मुलीनी टोमणा मारला कीआता या म्हशीला पालखीत उचलावे लागेल. मी हे ऐकून पालखीत बसण्यास नकार दिला. म्हैस आहे ना एक दिवस नक्कीच तुम्हाला बकरी बनून दाखवेन. आणि रोज जॉगिंगला जाण्यास सुरूवात केली. हे आजही सुरू आहे. मी आपल्या जीवनाल साधारण बनविले आहे. सध्या जिमला पण जाते, कोणत्याही अडचणीशिवाय.”

image


कामिनी यांना लहानपणापासूनच पुस्तके आणि नियतकालीके वाचण्याचा नाद होता. त्यांना देश आणि दुनिया याबाबत खूप माहिती होती. बारावी नंतर पुढच्या शिक्षणसाठी त्या कोलकाता येथे आल्या. येथे त्यांनी फॅशन स्कुल मध्ये प्रवेश घेतला. पण तो पूर्ण करता आला नाही. फॅशन स्कुल मध्ये दोन तीन महिनेच जाता आले कारण त्यांचे लग्न हैद्राबादच्या उद्यमी परिवारात करून देण्यात आले. येथे त्यांनी काही दिवस परिवाराच्या फॅक्टरीचे कामही पाहिले. जेंव्हा राधा स्मेंटर्स लिमिटेडची सुरुवात झाली तेंव्हा त्यांनी ब्रॅण्डींग आणि जाहिरात ही जबाबदारी घेतली. तरीही त्यांचे मन त्यात जास्त लागले नाही. फॅशनच्या दुनियत काही करावे या धुंदीत त्यांनी आपल्या मैत्रिणी, ओळखीच्या महिलांद्वारे बनविण्यात येणा-या कपड्यांच्या छोट्या छोट्या प्रदर्शनातून घरगुती स्वरुपात आयोजन सुरू केले. कामिनी सांगतात की, “फॅशन माझे पॅशन होते. माझे मन त्यात होते मला आनंद मिळत होता. मी छोटे प्रदर्शन सुरू केले. दिल्ली आणि कोलकाता मधून सारे लोक येत तेंव्हा त्यांच्यासाठी घरगुती आयोजने सुरु केली. त्यात मैत्रिणींनी ओळखीच्या महिलांना आमंत्रित करणे सुरू केले. ते खूप डिझायनर कपडे नव्हते. घरगुती पध्दतीने तयार केलेले कपडे होते, कोलकाता मध्ये घरात बसून कपडे तयार करणा-या महिला होत्या, गृहिणी होत्या, त्या चांगले कपडे वापरत होत्या, मी त्यांना म्हटले की डिझायनर सुरू करा मी विकते, अनेकजणी तयार झाल्या आणि त्या आज ग्लँमरस साड्या बनवित आहेत. माझ्या वयाच्या आणि माझ्याहून मोठ्याही. त्यातून ओळख वाढली आणि इतक्या लोकांचा संपर्क झाला की त्यांची वेगवेगळी प्रदर्शने करणे कठीण झाले. तीन चार लोकांसाठी करत असे, सर्वांसाठी कसे करु. केले नाही तर लोक घमेंड आहे आणि काय काय म्हणू लागले. २००४-०५ मध्य विचार केला की सर्वाना एकाच ठिकाणी जमा केले तर आणि मग फॅशन यात्राचा जन्म झाला.

फॅशन यात्रीचे पहिले मोठे प्रदर्शन २००६ मध्ये आयोजित केले. कामिनी सांगतात की यामध्ये त्यांना फॅसिलीटेटर म्हणून काम करताना आनंद मिळाला. त्यांना वाटले सगळे आपले आपले विकतील. एक रुपयाही त्यांना खर्च करावा लागला नाही सर्वानी आपले आपले काम केले. पहिल्या प्रदर्शनात हैद्राबादमध्ये २५ डिझायनर होते, दुस-या वर्षी ४५ जणांनी भाग घेतला. इतके नांव झाले की त्यांना फॅशन यात्रा चेन्नई, जयपूर, कोलकाता, मुंबई, सिंगापूर आणि दुबई मध्ये घ्यावी लागली. त्या म्हणतात की, “त्यातून मला पूर्णता मिळाली. माझ्या पॅशनची हौस पूर्ण झाली. मी त्यात खुश होते. याला मी कधी काम म्हणून पाहिले नाही. हेच कारण आहे की, रुग्णालयात असो की घरात किवा यात्रेत प्रत्येक जागी बसून मी योजना तयार करत होते.”

image


कामिनी सराफ यांनी या यशाच्या वाटचालीत वाईट काळही पाहिला. त्यांच्या भावाच्या अचानक मृत्यूनंतर त्यांना माहेरची जबाबदारी होती. पतीच्या अस्वास्थामुळेही त्यांना वाईट काळ पहावा लागला. त्यांना स्वत:लाही काही दिवस ट्युमरच्या रोगाचा सामना करावा लागला.पण त्यांनी आपला वसा टाकला नाही.कुटूंबाच्या संपूर्ण सहकार्याने त्यांनी वाटचाल केली. हेच कारण आहे की त्यांनी फॅशन यात्रा सुरू करतानाच आपल्या परिवारालाही काही वेळ देण्याची जबाबदारी कबूल केली. आज त्या केवळ हैद्राबाद मध्ये फॅशन यात्रा करत आहेत. त्यांनी त्या बंद केल्या नाहीत. त्यासाठी सुध्दा की ‘नन्ही कली’ नावाच्या संस्थेला गरीब मुलींच्या शिक्षणासाठी मदत करता यावी. पाचशे मुली त्यांच्या मदतीने शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी पाण्याची टाकी आणि रक्तपेढीसाठी इमारत तयार करण्याच्या कामी देखील फॅशन यात्राने आर्थिक हातभार लावला. आता त्यांनी ‘अंगसूत्र’वर जास्त भर देण्यास सुरुवात केली आहे. हा त्यांचा ब्रँण्ड स्टोर झाला आहे. मनीश मल्होत्रा, निता लुल्ला, अरुण बहल, पल्लवी भैरवी, जयकिशन, पायल सिंघल, अश्या प्रसिध्द डिझायनरांचे हे केंद्र झाले आहे. याच प्रकारच्या आणखी काही स्टोरची त्या सुरुवात करत आहेत. अनेक डिझायनरांसाठी अंगसूत्रची स्टोर सुरू करण्याची योजना आहे.

फॅशन यात्राच्या मागच्या उद्देशांचा उल्लेख करताना कामिनी सांगतात की, महिलांना अधिक प्रोत्सहीत करणे, त्यांना मध्यस्थांपासून वाचविणे, ग्राहकांना सरऴ संपर्क आणि संवाद स्थापित करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्या मानतात की विकणारे लोक असावे आणि खरेदी करणाऱ्यांची गर्दी असावी तर प्रदर्शन सफल झाले समजावे. नव्या लोकांना त्या सांगू इच्छितात की, लोकांना तुमचा विश्वास वाटणे अनिवार्य आहे, कारण त्यावर ते गुंतवणूक करतात. कोणतेही आयोजन एक दिवसांचा विचार करून आयोजित न करता बाजारात कायम रहायचे आहे हा विचार करून केले पाहिजे. योग्य आणि उपयोगी खर्च आणि गुंतवणूक करताना ब्रँण्डींगवर काम करणे जरूरी आहे. नियोजनात वेळेचे भान हवे, डिजायनरांना सेवा देताना वेळ लावू नये, कारण त्या दिवशी आमच्यासाठी वर्षभराची कमाई होऊ शकते. पण डिझायनरसाठी तर ते वर्षभराच्या गुंतवणूकीसारखे असते. ते आपले कलेक्शन तयार करण्यासाठी सहा महिने ते वर्षभर लावतात त्यामुळे प्रदर्शनात योग्य पध्दतीने काम झाले नाही तर त्याचे नुकसान होते.

कामिनी सांगतात की, प्रदर्शनाच्या वेळेवर लक्ष द्यायला हवे. जेणेकरून त्यांचे कलेक्शन विकले जावे. त्यासाठी गृहपाठ आवश्यक आहे. हे त्यासाठी नाही की आम्हाला पैसा मिळवायचा आहे, तर त्यांच्यासाठी जे मेहनत करतात, आपला पैसा खर्च करून डिझाईन तयार करतात, त्यांची निराशा होता कामा नये. त्या म्हणतात की जे आपल्याला योग्य वाटते तेच केले पाहिजे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags