संपादने
Marathi

स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून मुंबई मेट्रोने प्लास्टिक क्रशर्स बसविले

Team YS Marathi
17th Jul 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मुंबई मेट्रोने स्वच्छ भारत मिशनचा भाग म्हणून, त्यांच्या १२ पैकी सहा स्थानकांवर प्लास्टिक क्रशर्स बसविले, जेणे करून प्लास्टिक बॉटल्स रिसायकल केल्या जाव्यात. याबाबत अधिकृत प्रवक्ता म्हणाले की, “ ११.४० किमी लांबीच्या मुंबई मेट्रोची बारा स्थानके आहेत, जी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर आहेत.”


image


हे क्रशर्स वाइल्ड वेस्ट मिडीया, यांनी विकसित केले असून ते डिएन नगर, अंधेरी, चकाला, मरोळनाका, साकीनाका आणि घाटकोपर येथे लावण्यात आले आहेत. जेथे प्रवाशी संख्या जास्त प्रमाणात असते.

या उपक्रमातून प्रवाश्यांना सहजतेने सुविधा मिळेल आणि ते प्लास्टिकच्या बाटल्याची सहजतेने विल्हेवाट लावू शकतील. त्यामुळे पर्यावरण स्वच्छता करण्यासही हातभार लागू शकेल. याबाबत प्रवक्ता म्हणाले की, “ पर्यावरणाच्या दृष्टीने ही सुविधा चांगली असून आम्हाला पर्यावरण स्वच्छ आणि हरित राखायचे आहे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना नेहमीच केल्या जातात, ज्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आम्ही करत आहोत. मुंबई मेट्रो देखील स्वच्छतेची भोक्ती आहे.” त्यांच्या या प्रयत्नासाठी प्रवाश्यांनाही तातडीने बक्षीस वळते करण्याजोग्या कूपन्सच्या रूपाने यंत्राव्दारे दिले जातात. या कूपन्समध्ये वीस- पंचवीस टक्के सूट देण्यात येते आणि विशिष्ट ब्रॅण्डच्या वस्तू खरेदीसाठी ती वापरता येतात.

क्रश केलेल्या प्लास्टिक बॉटल्स, फायबर उत्पादक कंपनीला पुन्हा निर्मितीसाठी पाठविल्या जातात. आणि त्यांचा वापर कापड, कारपेट,ग्रोसरी बॅग्ज,इत्यादी बनविण्यासाठी होतो. वापरण्यास सोपे आणि किमतीत कमी असलेल्या या यंत्राचा आकार वातानुकूल यंत्रा इतका असतो. त्यामध्ये दररोज पाच हजार बाटल्या तोडण्याची क्षमता असते.

याशिवाय, रिलायन्स इन्फ्रा मुंबई मेट्रोच्या इतर अनेक पर्यावरणपूरक उपाय योजनांप्रमाणेच ९०टक्के पाण्याचा फेरवापर करण्याचे,छतावरील सौरउर्जा पॅनल्स वापरून उर्जा निर्मीतीचे आणि एलईडी दिव्यांचा वापर करत कार्यालय आणि स्थानकांवर वीज बचत करण्याचे प्रयत्न सुरू असतात.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags