संपादने
Marathi

इलेस्टोग्राफी, शरीरातील गुढ आवाजातून कर्करोगांचे निदान करण्याची पध्दती!

Team YS Marathi
5th Jul 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

२०१६च्या अहवालानुसार, कर्करोगाच्या नवीन भर पडणा-या प्रकरणांची संख्या १४.५ लाख मागील वर्षात होती, आणि ती २०२० पर्यंत १७.३ लाखांच्या घरात जावू शकते. सन २०१६मध्ये ज्यांना कर्करोग झाला अशा रुग्णांची संख्या ७.३६लाख इतकी आहे, या मध्ये २०२०पर्यंत वाढ होवून ती ८.८लाख होवू शकते. या माहिती नुसार, हे देखील पाहण्यात आले की, केवळ १२.५ टक्के कर्करोगग्रस्तांना वेळेवर उपचार मिळाले.


image


कर्करोग आता ओळखणे आणि त्याचे निदान करणे यासाठी नव्या प्रकारचे तंत्र विकसित होत आहे ज्यात मानवी शरीराच्या नैसर्गिक गूढ आवाजांचा वापर केला जातो. जेणेकरून चांगल्या प्रकारे शरीरातील दोषांचे चित्रण करता येते. यात कर्करोगामुळे होणा-या अनेक प्रकारच्या गाठी देखील शोधता येतात.

इलेस्टोग्राफी, अंदाज लावते आणि प्रमाणित करते ज्यात मानवी शरीरातील पेशींच्या लवचिकतेची परिक्षा केली जाते. त्यामुळे यकृताचा कर्करोग आणि थायरॉईडचे आजार अधिक परिणामकारकपणे आणि लवकर समजू शकतात.

याबाबतच्या अहवालानुसार, स्टेफन कॅथलीन, या फ्रान्स मधील लायॉन विद्यापीठातील संशोधक संचालकाने म्हटले आहे की, “ पॅसीव इलेस्टोग्राफी ही सहजसाध्य आणि योग्य अशी पध्दती आहे ज्यात अवयवातील कर्करोगाचे निदान खोलवर शरीरातून करता येते, जसे की यकृताबाबत किंवा वेगवेगळ्या ग्रंथीबाबत. ज्या अवयवांची खूप काळजी घेतले जातात जसे की मेंदू, किंवा ज्ञानेंद्रीये जसे की डोळे.”

अगदी भूकंपाच्या लहरींप्रमाणे, या अवयवातून वेगळ्या प्रकारच्या लहरी येत असतात, आणि त्या दिवसभरात मोजता येतात.

या बाबतच्या अहवालानुसार स्टेफन म्हणातात की, “ या मागची कल्पना आहे ती इलेस्टोग्राफी, ज्याचा उपयोग निसर्गत: शरीरात वाहणा-या लहरींना ओळखून त्यांचा नकाशाव्दारे अभ्यास करून पेशींमधील दोष शोधता येतात. यालाच पॅसीव इलेस्टोग्राफी म्हणता य़ेते ज्यात लहरींच्या माध्यमातून निदान करता येते.”

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags