संपादने
Marathi

दिल्लीमधील सम विषम योजना ही पर्यावरणासाठी ठरू शकते एक वरदान

Team YS Marathi
11th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जस जशी १ जानेवारी ही तारीख जवळ येत आहे तस तसे दिल्ली आणि एनसीआर या भागात राहणारे आणि दिल्लीत आपल्या कामानिमित्त वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकार द्वारे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या नियमांची अंमलबजावणी होणाऱ्या सम – विषम योजनेच्या समाधान वजा समस्येच्या निवारण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. एकीकडे लोक या चिंतेने ग्रासलेले आहे की ते आपल्या कामाच्या ठिकाणी सुनियोजित वेळेत कसे पोहचतील, अशातच नोएडाचा एक १३ वर्षीय ८ वीत शिकणारा एक विद्यार्थी अक्षत मित्तल हा कार पूलिंगच्या एका अभिनव कल्पनेने वेबसाईटच्या माध्यमाने प्रकाशित झाला आहे. ज्याच्या मदतीने दिल्ली मध्ये आपल्या वाहनाने प्रवास करणारे नागरिक अगदी सहज या सम विषम योजनेवर अंमल करून कार पूलिंग या पर्यायावर शिक्का मोर्तब करू शकतील.


image


नोएडाच्या सेक्टर ४४ स्थित एमीटी इंटरनॅशनल शाळेचा ८ वीचा विद्यार्थी अक्षत याने १ जानेवारी २०१६ पासून दिल्लीच्या रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांसंबंधी लागू केलेले सम-विषम नियम योजनेच्या पूर्णत्वासाठी www.odd-even.com नावाची एक वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटच्या मदतीने कोणतीही व्यक्ती आपल्या येण्याजाण्याच्या वेळांची नोंदणी करून अगदी सहजरीत्या कारपूलिंग करू शकते आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आपले अमूल्य योगदान देऊ शकतात. या वेबसाईटला तयार करणारे अक्षत युवर स्टोरीला सांगतात की, ‘काही दिवसांपूर्वी जेव्हा दिल्ली सरकारने १ जानेवारी २०१६ मध्ये राजधानीत चालणाऱ्या वाहनांना सम-विषम योजनेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांना कळले की आपल्या घरी फक्त एकच गाडी आहे त्यामुळे त्यांना सुद्धा प्रवासात अडचणी येऊ शकतात. त्याच बरोबर त्यांच्या डोक्यात विचार आला की अशा अनेक लोकांना या अडचणीचा त्रास होणार आहे म्हणून त्यांनी या वेबसाईटची निर्मिती केली.’


image


अक्षत यांनी तयार केलेल्या या वेबसाईटला लोकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे व दिल्ली आणि एनसीआर भागातील अनेक लोक याचा उपयोग करीत आहेत.

या वेबसाईटच्या कार्यप्रणालीच्या बाबतीत अक्षत युअर स्टोरीला सांगतात, ‘या साईटवर आपली अधिकृत नोंदणी करून उपयोगकर्ता आपले नाव, वय, मोबाईल नंबर आणि त्यांच्याजवळ जर स्वतःची गाडी असेल तर तिची माहिती भरावी लागते. यानंतर तुम्ही एका वेळेसच्या प्रवासासाठी किंवा दोन्ही वेळेसाठी कारपूलिंग करू इच्छिता याचा पर्याय आपल्या समोर असेल. यानंतर ग्राहकांनी आपल्या प्रवासाचा प्रारंभ आणि शेवटचे ठिकाण याची माहिती भरावी. त्या माहितीच्या आधारे वेबसाईट इतर ग्राहकांच्या नोंदणीनुसार त्यांचा अनुकूल सहप्रवासी शोधून त्याची माहिती आणि मोबाईल नंबर इ. स्क्रीनवर दाखवेल. यानंतर प्रवासी फोनवरून संपर्क करून आपल्या सहप्रवाशाबरोबरचा प्रवास निश्चित करू शकतो’.


image


अक्षत सांगतात की त्यांच्या या वेबसाईटचा प्रयोग करणे खूप सोपे आहे. कोणतीही व्यक्ती अगदी सहज याच्या मदतीने आपल्या सहप्रवाशाची निवड करू शकतो. याशिवाय या वेबसाईटची विशेषता ही आहे की सुरक्षेच्या दृष्टीने कारपूलिंगसाठी तुम्ही स्त्री किंवा पुरुष सहप्रवाशाची निवड करू शकतात. जसे एखाद्या महिलेला कारपूलिंगसाठी सहप्रवाशी एखादी महिलाच हवी असेल तर वेबसाईटवर या पर्यायाला प्राधान्य देऊ शकते. अक्षत पुढे सांगतात की, ‘आजच्या काळात विशेषकरून महिलांसाठी प्रवासादरम्यान असणारी सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी मी आपल्या वेबसाईटवर असा पर्याय दिला आहे की कोणताही प्रवासी कारपूलिंगसाठी आपल्या सोयीच्या सहप्रवाशाची निवड करून त्याचे वय व इतर माहिती जाणून घेऊ शकतो.’

अक्षत पुढे सांगतात की, ‘ही वेबसाईट लोकांनी दिलेली माहिती निरखून व पारखून त्यांच्या सोयीनुसार एकच स्थान व एकच दिशा निश्चित करणाऱ्या लोकांना एकमेकांशी जोडून कारपूलिंगचा उत्तम पर्याय प्रदान करते. मी जी वेबसाईट तयार केली आहे ती एल्गोरीदम च्या आधारावर काम करेल. ही वय, लिंग, व्यवसाय आणि प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन कारपुलिंगचा पर्याय सुचवेल.’

वेबसाईटच्या यशानंतर अक्षत यांचा विचार याच्याशी संबंधित एक मोबाईल अॅप तयार करण्याचा आहे.

अक्षत पुढे सांगतात की प्रदूषणाच्या वाढत्या पातळीने दिल्लीची स्थिती अशी झाली आहे की सरकारला या प्रकारचा कठोर निर्णय घ्यावा लागला. या योजनेअंतर्गत आता दिल्लीच्या रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांवर काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे बऱ्याच लोकांना आपल्यासाठी असा सहप्रवाशी शोधून त्याचाशी कारपूलिंग करून आपल्या स्थानावर सुरक्षित पोहचवू शकतील. अक्षत पुढे सांगतात की, ‘या वेबसाईटची विशेषता म्हणजे ती सम व विषम तारखेनुसार कारपूलिंगची सेवा उपलब्ध करून देईल.

अक्षतद्वारा तयार केलेली ही वेबसाईट फक्त १ ते १५ जानेवारी पर्यंतच या योजनेच्या प्रभावी असण्यापर्यंतच काम करणार नाही तर दैनंदिन व्यवहारात पण प्रवासासाठी लोक कारपूलिंगच्या या प्रयोगानंतरही वापर करू शकतात. आजच्या क्षणाला कारपूलिंगचे अनेक पर्याय उपलब्ध करणारी वेबसाईट लोकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत पण फक्त १५ वर्षीय अक्षतद्वारा तयार केलेली ही वेबसाईट कमीत कमी वेळेत दिल्लीतल्या लोकांमध्ये बरीच लोकप्रिय आणि यशस्वी झाली आहे. सध्यातरी ही वेबसाईट लोकांना फक्त एका बिंदुपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत कारपूलिंगची सुविधा प्रदान करीत आहे पण लवकरच भविष्यात अधिक विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे.

लेखक :निशांत गोयल

अनुवाद :किरण ठाकरे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags