जगातील शक्तिशाली उद्यमींच्या यादीत ९व्या स्थानावर 'डेक्स्टरिटी' ग्लोबलचे संस्थापक शरद सागर

जगातील शक्तिशाली उद्यमींच्या यादीत ९व्या स्थानावर 'डेक्स्टरिटी' ग्लोबलचे संस्थापक शरद सागर

Tuesday April 05, 2016,

5 min Read

मनुष्याचे जीवन हे एखाद्या सारीपाटाप्रमाणे असते जिथे पावलोपावली त्याला आपल्या ‘चाली’ चा हिशोब ठेवावा लागतो. म्हणजेच जीवनातल्या खेळात आपल्या नशिबाचा ‘बादशाह’ तेच ठरतात जे आपली प्रत्येक ‘चाल’ विचारपूर्वक चालतात. यावर्षी प्रतिष्ठित फोर्ब्स पत्रिकेच्या ३० वर्षापेक्षा कमी असलेल्या जगातील प्रभावशाली तरुणांच्या यादीमध्ये सामील असलेले सामाजिक उद्यमी 'डेकस्टेरिटी' ग्लोबलचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) शरद सागर यांच्या गौरवपूर्ण यशाने या गोष्टीच्या सत्येची पूर्ती केली आहे. हा एक ‘विचार’च होता ज्यामुळे ‘डेकस्टेरिटी ग्लोबल’चा पाया रचला गेला. विचार होता सगळ्यांना ‘साक्षर’ बनवण्याचा, अश्या लोकांना शिक्षणाची संधी देण्याचा जे कोणत्या न कोणत्या कारणामुळे यापासून वंचित राहिले. आपण देशातील अनेक शैक्षणिक अभियानाबद्दल ऐकले असेल त्याच भूमीवर शरद यांची देशालाच नाही तर, संपूर्ण विश्वाला शिक्षित करण्याची ‘अभिलाषा’ आहे. त्यांच्या या अभियानाला तुम्ही ‘वैश्विक साक्षरता कार्यक्रम’ सुद्धा म्हणू शकता.

image


मोठे स्वप्न साकारण्याची सुरवात

शरद हे बिहारच्या एका छोट्या गावातील रहिवासी असून त्यांची जीवन यात्रा ही अतिशय प्रेरणादायक आहे. शरद यांनी युवर स्टोरीला सांगितले, "मी तुटपुंज्या साधनांद्वारे अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वप्नांची अशी भरारी घेतली ज्याने लाखो लोकांच्या स्वप्नांना साकार करण्याची एक निर्णायक भूमिका पार पाडली. माझे ध्येय जगातील शेवटच्या व्यक्तीला शिक्षणाने ‘सशक्त करण्याचे आहे, जे शिकण्यासाठी उत्सुक असूनही काही अपर्याप्त साधनांच्या अभावी पुढे जाऊ शकले नाही. मी बघितले की माझ्या आई-वडिलांना आयुष्यभर प्रथम स्वतःच्या शिक्षणासाठी व नंतर माझ्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला" ते म्हणाले की, " डेकस्टेरिटी ग्लोबल हे असे जग निर्माण करू इच्छितो जिथे शिक्षणाच्या वास्तविक रूपाचे लोकतांत्रिकीकरण करून प्रत्येक मुलापर्यंत शैक्षणिक यात्रा विना अडथळा पोहोचविणे शक्य होईल ,पालकांना आपल्या मुलांना कामासाठी शाळेत न पाठवण्याच्या सबबी पैकी कोणत्याही पर्यायाला झुकते माप द्यावे लागायचे नाही’’. या उद्देश्याच्या पूर्तीसाठीच डेकस्टेरिटी ग्लोबल यांनी आपली आर्थिक मदत निधी वाढवली आहे. ते सांगतात ‘’जर तुम्ही शिक्षणासाठी आर्थिक सबळ असाल तर उत्तम अन्यथा आम्ही तुमचा खर्च करू’’.

image


शरद सांगतात की या संस्थेच्या स्थापनेमागे त्यांचा मुख्य उद्देश हा होता की जसे त्यांच्या बाबतीत घडले तसेच कोणत्याही पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्या संदर्भात कोणत्याही परिस्थितीत अडथळा निर्माण होऊ नये. ते सांगतात की सगळ्यांना शिक्षणा संदर्भातील सगळ्या पर्यायासाठी समान संधी मिळाली पाहिजे.

डेक्स्टरिटी ग्लोबलची स्थापना

शरद यांनी २००८ मध्ये या संस्थेची स्थापना केली. जेव्हा ते महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. गेल्या आठ वर्षात डेक्स्टरिटी ग्लोबलने लोकांना शैक्षणिक व्यासपीठाद्वारे जगातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी देऊन सुमारे १.२ दशलक्ष विद्यार्थ्यांना प्रभावित केले. भविष्यातील आपल्या योजनेबद्दल शरद सांगतात, येणाऱ्या वर्षात डेक्स्टरिटी ग्लोबलची भरारी (प्रत्येक सार्क देशातून होऊन) २०० दशलक्ष आकडा पार करेल. याच नीतीला अनुसरून या संस्थेने १० दशलक्ष डॉलरची शिष्यवृत्ती व फी माफी प्रदान केली आहे. ते सांगतात की,’’आमचा उद्देश या व्यासपीठाला पश्चिम आफ्रिका व लॅटीन अमेरिका पर्यंत पोहचवण्याचा आहे तसेच जगातील प्रत्येक मुलाला उच्च शिक्षण देण्याचा मानस आहे मग तो किंवा त्याचे पालक कुठे रहातात व काय काम करतात याने काहीच फरक पडणार नाही’’.

image


शरद यांनी वयाच्या फक्त १६ व्या वर्षी एवढे महत्वपूर्ण पाऊल उचलले, डेक्स्टरिटी ग्लोबल ची टीम तयार करणे हे नक्कीच सोपे काम नव्हते. शरद सांगतात की त्यांच्यासाठी विद्यालयातील अभ्यासादरम्यान या टीम मध्ये लोकांना भरती करून वयाने १० ते १५ वर्ष मोठ्या व अनुभवी लोकांना सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. शरद सांगतात की,’’पालक ते अध्यापक, सरकार ते सामान्य तसेच वैश्विक संस्थानांपर्यंत आजच्या काळात विद्यालयातील विद्यार्थ्याला कोण गंभीरतेनं घेतं, परंतु जर तुमचा तुमच्या कामांवर पूर्ण विश्वास असेल तर लोकांना त्या ‘दृष्टीकोनातून’ विश्वास देण्यास पात्र ठराल.

डेक्स्टरिटी ग्लोबल चा विचार

डेक्स्टरिटी ग्लोबल ने २०१२ मध्ये डेस्क स्कूलची स्थापना केली, जिथे दक्षिण आशियाची पहिली अशी शाळा आहे जिथे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘नेतृत्व व व्यावसायिक शिक्षण दिले जाते. दक्षिण आशियाच्या भिन्न जागांवरून अंदाजे १२० विद्यार्थी इथून पदवीधर झाले व आज जगात मोठ्या पदावर कार्यरत आहे. इथल्या मुलांनी संयुक्त राष्ट्र युवा साहस पुरस्कार मिळवून अमेरिकेतील विद्यालयातील शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या शाळेतून शिकलेली मुलं आज उत्तम स्टार्टअप चालवत आहे. अनेक जण आज आपल्या देशाचे यूएन अॅम्बॅसेडर आहे. मागच्या आठ वर्षात डेक्स्टरिटी ग्लोबल नासा, युनिसे, युएस कॉन्सुलेट जनरल, खाजगी बँक, प्रतिष्ठित विश्वविद्यालय व मिडिया इ. बरोबर काम केलेले आहे. या शिवाय २०१५ मध्ये डेक्स्टरिटी ग्लोबलने बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवाल यांना ‘गुडविल- अॅम्बॅसेडर’ बनवले, ज्यामुळे गरजवंत मुलांना जरुरी शैक्षणिक मदत पुरवली जाते.

image


स्टार्टअपला सल्ला

तरुण उद्यमिंना संदेश देत शरद सांगतात की, "कोणतेही स्टार्टअप असो, त्यात फायदा असो किंवा नसो, पण तो जर जगातील समस्या निवारण्यासाठी समृद्ध असेल तर मग मान्य करा की ते रास्त आहे. तुम्ही औद्योगिक स्टार्टअप सुरु करा किंवा स्वस्थ दरातील आरोग्य सेवा, जर तुमचा ‘दृष्टीकोन’ व ‘उद्देश’ एखाद्या टीमला संघटीत करू शकतो तर तुम्ही नक्कीच एक यशस्वी उद्यमी ठराल. लोकांच्या सल्ल्याकडे लक्ष्य न देता व आपल्या अपयशाचा विचार न करता स्वतःच्या हिंमतीवर व नेतृत्व क्षमतेवरच्या दृढ विश्वासाने तुम्ही आपले ध्येय नक्कीच पूर्ण करू शकाल".

संपादन करणे

शरद यांचे सगळ्यात मोठे ध्येय अमेरिकेच्या मिशिगन स्टेट विश्वविद्यालयात उद्यमी पाठ्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आहे. शरद यांना चौथ्या 'ग्लोबल इकॉनॉमिक लीडर्स' शिखरसाठी विशेष आमंत्रित केले होते. त्यांना संयुक्त राष्ट्र जागतिक शिखर युवा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व बांगलादेश, भारत, दक्षिण कोरिया व श्रीलंकेमधील संयुक्त राष्ट्र शिखर सम्मेलनामध्ये केले आहे.

लहान वयातच शरद यांना अनेक वैश्विक संस्थांद्वारे पुरस्कृत करून सन्मानित केले आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये प्रकाशित झालेल्या फोर्ब्स च्या तिशीच्या आतील प्रभावशाली तरुणांच्या पहिल्या ३० जणांच्या यादीमध्ये शरद सामील आहे. या यादीमध्ये शरद व्यतिरिक्त फेसबुकचे संस्थापक मार्क जुकेगबर्ग, नोबेल पुरस्कारविजेत्या मलाला युसुफजई, इस्टगरम संस्थापक केविन सिक्टरोम सारखे मोठे नाव आहेत. रिच्टोपिया (डिजिटल व्यासपीठ) यादीनुसार जगातील १०० शक्तिशाली तरुण उद्यमीच्या यादीमध्ये शरद ९ व्या स्थानावर आहे. शेकफेल्लर फाउंडेशनच्या १०० ‘’ नैक्स्ट सेंच्युरी इन्नोवेटर्स’’च्या यादीत सुद्धा शरद यांचा समावेश आहे. जून २०१५, मध्ये तैवान सरकारने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. तैवानचे मंत्री यांनी मिलानच्या सोशल एंटरप्राईज वर्ल्ड फोरम मध्ये बोलतांना शरद यांचे नाव सामजिक उद्द्मींचे जनक बिल ड्रायटोन यांच्याबरोबर मानाने घेतले आहे.

डेक्स्टेरिटी अधिकृत वेबसाईट : http://www.dexglobal.org

शरद सागर यांचे फेसबुक पेज : http://www.facebook.com/sharadsagarofficial

फोर्ब्स यादी : http://www.forbes.com/30-under-30-2016/social-entrepreneurs/

जगातील १०० शक्तिशाली तरुण उद्यमींची यादी : http://richtopia.com/people/young-entrepreneurs

लेखक : रोहित श्रीवास्तव

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close