संपादने
Marathi

आयआयटी संशोधकानी तयार केलेल्या नोजॅकलने भारतीयांना सहजतेने श्वास घेण्यास मदत होणार!

17th Feb 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

देशभरात प्रदुषणाची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढत असताना, खासकरून मेट्रो शहरातून, लोक नाकाला रुमाल लावून वावरताना सहजपणे दिसू लागली आहेत, जेणे करून विषारी वायूंपासून त्यांचे रक्षण व्हावे. जरी हे त्यांच्या फायद्याचे असेल तरी, काहीवेळा हे मास्क या लोकांना गुदमरवून टाकतात. ही समस्या ओळखून, भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली येथील संशोधकांनी वेगळे नोजल शोधून काढले आहे,ज्यात सध्याच्या मास्क मध्ये काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्यात सर्वप्रकारच्या धोकादायक घटकांना शोषून स्वच्छ हवा देण्याची व्यवस्था केली आहे.

संशोधक देवायन साहा आणि शशी राजन यांनी हे करुन दाखवले. आकाराने लहान, हे नोजॅकल पुन्हा वापरायोग्य आहे. आणि त्याच्या चाचणीत हेच दिसून आले की ९०टक्के पर्यंत विषारी घटक यात अडकताता आणि शुध्द हवा तुम्हाला मिळते. या उपकरणात दोन नोजॅकल आहेत आणि हे झोपताना देखील वापरता येवू शकतात. यामध्ये असलेल्या कार्टेजला शुध्दिकरणानंतर बदलता येवू शकते. एकदा हे बाजारात आले की, ग्राहकांना दोन कार्टेजसह यामध्ये उपलब्ध केले जातील, ज्यावेळी ते हे विकत घेतील. चांगल्या आरामदायी परिणामांसाठी प्रत्येक आठ तासांनी हे कार्टेज बदलता येवू शकते.


image


देबायन साहा, संशोधकापैकी एक, म्हणाले की, “ चेह-यावर लावायच्या मास्कमध्ये गाळणीमध्ये लहान कण अडकतात ज्यामध्ये मोठे कण देखील असू शकतात, मात्र लहान कणांमुळे श्वास घेण्यास जास्त त्रास होतो, आणि कार्बनडायोक्साइड मुळे गुदमरल्यासारखे होते. आमच्या संयंत्रामध्ये, आम्ही गाळणी लावली नाही. त्यामुळे वापरकर्ते जास्तवेळ सहजतेने श्वास घेवू शकतात.”

ही अभिनव संकल्पना सुचली ज्यावेळी चमूच्या सदस्यांनी त्यांच्या स्टँन्फोर्ड इंडियाच्या बायोडिझाइन फेलोशिपसाठी तयारी केली. नंतर त्यांनी तिचा वापर त्यांच्या आयआयटी-डी मध्ये फायझर आयआयटी- डी संशोधनात तसेच आयपी कार्यक्रमात केला. त्यात दिसून आले की, या नोजॅकलमध्ये नव्वद टक्के चांगले परिणाम आहेत. लवकरात लवकर हया चमूने हे उत्पादन बाजारात आणायचे योजिले आहे. या नोजॅकलची किंमत सध्याच्या उपलब्ध नोजॅकलच्या तुलनेत एक तृतियांश असेल आणि अपेक्षा आहे की ते डिसेंबर २०१७ पर्यंत वेळेत बाजारात येतील.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags