संपादने
Marathi

महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Team YS Marathi
1st Sep 2017
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रवासी भारतीय भवन येथे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री कृष्णाराज, सचिव राकेश श्रीवास्तव, अपर सचिव अजय टिक्री आणि संयुक्त सचिव राकेश कुमार उपस्थित होते.


image


केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील ५१ अंगणवाडी सेविकांना यावेळी श्रीमती गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर जिल्हयातील गोपालपूर येथील केंद्राच्या चंद्रकला झुरमुरे ,परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका लताबाई वांईगडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पैंडाखले अंगणवाडी केंद्राच्या सेविका चंद्रकला चव्हाण यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.


image


चंद्रकला झुरमुरे गोपालपूर अंगणवाडी केंद्रात १९९१ पासून कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६ कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेच, प्रत्येक बालक व त्यांच्या आई-वडीलांजवळ आधार कार्ड असावे हा ध्यास घेऊन त्यांनी जनजागृती केली, परिणामी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी १०० टक्के आधार कार्ड बनवून घेतले. शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेच्या विविध प्रश्नांसंबंधी जनजागृती केली. श्रीमती झुरमुरे यांनी दारूबंदी साठी केलेल्या जागरुकतेमुळे आज गोपालपूर गाव पूर्णपणे दारूमुक्त झाले आहे.


image


लताबाई वांईगडे या पडेगांव अंगणवाडी केंद्रात १९९६ पासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६ कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेच, ‘पल्स पोलिओ कार्यक्रम’, ‘कृमी नाशक दिन’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात सक्रीय सहभाग घेऊन उत्तम कार्य केले आहे. एड्स आणि कुष्ठ रोग जनजागृतीच्या कार्यातही श्रीमती वांईगडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

चंद्रकला चव्हाण या पैंडाखले अंगणवाडी केंद्रात वर्ष २००० पासून कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६ कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेच, पल्स पोलिओ कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान आणि निर्मलग्राम अभियानात सक्रीय सहभाग घेतला.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags