संपादने
Marathi

शाकाहारातून तंदूरुस्तीचा नवा मंत्र ‘वेजीस फिटनेस’

Narendra Bandabe
18th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आजचं सर्व जगच धावपळीचं झालंय. त्यामुळं स्वतःकडे पहायला ही वेळ नाही. सततचा तणाव, दगदग यामुळं आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय. फिट राहणंही गरजेचं आहे. यावर उपाय म्हणजे योग्य आहार आणि नियमित व्यायाम. या दोन्ही गोष्टींसाठी अनेकजण वाट धरतात ती जिमची. इथं तुमच्या शरीराला किती व्यायामाची गरज आहे इथपासून तुम्हाला काय खायला हवं असा एक तपशीलवार आराखडा तयार केला जातो. यात प्रामुख्यानं एक भाग असतो तो मांसाहाराचा. तुमच्या शरीराला अधिकाधिक प्रोटीन्स हवे असतील तर मांसाहाराला पर्याय नाही असा सर्वसाधारण समज असतो. मग अंड्यापासून ते मटनापर्यंत सर्व गोष्टींच्या सेवनावर भर दिला जातो. पण मांसाहाराशिवाय आवश्यक प्रोटीन्स मिळूच शकत नाही का? याचं उत्तर आहे होय. मिळू शकतात. शाकाहारी वस्तूंचं सेवन करुनही आपण अगदी फिट आणि फाईन राहू शकता. यासाठीच प्रसाद आंजर्लेकर या तरुण फिटनेस ट्रेनरनं शाकाहारी खा आणि फिट रहा, असा नवीन मंत्र दिलाय. त्यानं वेजीस फिटनेस सुरु केलंय. यातून तुम्हाला शाकाहारी राहूनही फिटनेस कसा राखता येईल याच ट्रेनिग प्रसाद देतोय.

image


प्रसाद सांगतो, “ चांगल्या फिटनेससाठी नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार केलाच पाहिजे हा चुकीचा समज पसरवला जातोय. फिटनेससाठी मांसाहाराची नव्हे तर प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याची गरज आहे. चांगला फिटनेस शाकाहारी राहूनही मिळवता येतो. मांसाहाराला पर्याय आहे.”

प्रसाद गेल्या पाच वर्षांपासून जिम ट्रेनर आहे. यावेळी त्याचे मित्र आणि जिममध्ये येणाऱ्या लोकांशी केलेल्या संभाषणातून एक गोष्ट लक्षात आली की फिटनेस आणि मांसाहाराबद्दलच्या गैरसमजातून अनेक लोक जिमकडे येत नाहीत. त्यांना खरं तर नियमित व्यायामाची गरज असते . अशा शाकाहारी लोकांसाठी काही पर्याय असू शकतो का यावर प्रसादनं विचार केला आणि त्यातूनच वेजीस फिटनेसची संकल्पना पुढे आली.

image


प्रसाद सांगतो, “ जिममध्ये तुम्हाला थेट चिकन किंवा मटन खायचं नसेल तर कमीत कमी अंडीतरी खायला हवी असं सांगितलं जातं. खरंतर फिटनेसचं नातं फक्त प्रोटीनशी आहे. शरीराला योग्य प्रोटीन मिळायला हवं. मग तो सोयाबीन, ब्रोकोली, पनीर, मशरुम आणि कडधान्यातूनही मिळू शकतं. माझं म्हणणं हेच आहे की प्रोटीन युक्त शाकाहारी पदार्थ मिळत असताना मांसाहाराची काय गरज? ”

फक्त शाकाहार आणि फिटनेसची सांगड घालणं आणि त्यासाठी लोकांना तयार करणं हे साधंसोप्पं काम नव्हतं . प्रसादला यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. एकतर लोकांना शाकाहार आणि त्यापासून मिळणाऱ्या प्रोटीन्सचं महत्व पटवून देणं हे फार कठिण जातं. एक-एका व्यक्तीला हे पटवून देण्यासाठी चार-चार तास त्याच्याशी बोलावं लागतं. त्यानंतरच त्यांचं समाधान होतं आणि ते वेजीस फिटनेसचा मार्ग स्वीकारतात.

image


प्रसाद म्हणतो, “ लोकांना अगोदर ही गोष्ट पटत नव्हती. कारण इतकी वर्षे मनावर बिंबवलेलं होतं. यातून त्यांच्या एका-एका प्रश्नाचा व्यवस्थित उलगडा करत आम्ही वेजीस फिटनेसची आखणी करतोय. आता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. शिवाय मांसाहारामुळे जिम किंवा फिटनेस ट्रेनिंगकडे पाठ फिरवणारा एक मोठा गट वेजीस फिटनेसमुळे फिटनेसकडे वळला आहे, याचं मला समाधान आहे.“

वेजीस फिटनेस घराघरात जावून लोकांना ट्रेनिंग देतं. या लोकांची शारिरीक तपासणी केल्यानंतर त्यांना आवश्यक असलेल्या व्यायामाची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना केलं जातं. त्याच्या शाकाहारी आहाराचं वेळापत्रक तयार केलं जातं. त्यातून त्यांचा फिटनेस राखला जातो. प्रसाद म्हणतो, “ आता लोकांना वेजीस फिटनेसचं महत्व समजू लागलं आहे. एखाद महिन्याच्या ट्रेनिंगनंतर त्यांनाही समजतं की खूप फरक पडू लागलाय. शाकाहार आणि फिटनेस दोन्ही गोष्टी साधता येतायत. यामुळं ते जास्त आनंदी असतात.”

वेजीस फिटनेसचं आणखी एक महत्वाचं कार्य आहे. ते म्हणजे विविध व्याधीग्रस्त असलेल्या लोकांना व्यायामासाठी मानसिकदृष्ट्या तयार करणं. खासकरुन जे सततच्या आजारानं त्रस्त असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणणं. त्यांना व्यायामासाठी तयार करणं हे काम सध्या वेजीस फिटनेस करत आहेत. “ मणक्याचा आजार असलेले, कमरेचा आजार असलेले अनेक जण आपल्या शारीरिक अक्षमतेमुळं व्यायाम करु शकत नाहीत. अशांना आम्ही वेजीस फिटनेसतर्फे साधे व्यायाम शिकवतो. सावकाश सावकाश त्याचं मनोबळ वाढतं. शास्त्रसुध्द व्यायामामुळं त्यांना फिट वाटतं. यातूनच मग एक दिवस ते पूर्णपणे फिट होतात.” असं प्रसाद सांगतो.

image


धावपळ आणि दगदगीच्या आयुष्यात व्यायामाची गरज तर आहेच. पण कुठल्याही प्रकारच्या मांसाहाराशिवाय पूर्णपणे शाकाहारी व्यायाम पध्दती विकसित करण्यासाठी वेजीस फिटनेस प्रयत्नशील आहे. आणि त्यांना त्यात यश येत आहे. हे विशेष. 8879290351/ 8655500070 या क्रमांकावर तसंच veggiesfitness@gmail.com ईमेल आयडीवर आपण वेजीस फिटनेसशी संपर्क साधू शकता.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags