संपादने
Marathi

संघर्षाच्या सुंदर गझलचं नाव आहे रणजीत रजवाडा!

Team YS Marathi
4th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एक वेळ अशी होती जेव्हा रंजित त्यांच्या गझल ऐकवायला घरोघरी जायचे. आज मात्र त्यांच्या मैफलीत गझल ऐकण्यासाठी लोक दूरवरून येऊन गर्दी करतात.

हे खरं आहे की, प्रतिभावान व्यक्ती कोणावरही विसंबून राहत नाहीत. जर प्रतिभासंपन्नता, अपार कष्ट आणि संघर्ष या तीनही गोष्टी एकत्रित आल्या तर यशाचे शिखर गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. फक्त गरज असते ती तुमच्यातल्या प्रतिभेला शोधण्याची. प्रत्येक यशस्वी मनुष्य हा त्याच्यात असलेल्या क्षमतेच्या बळावर यश संपादन करत असतो. पण गायन हे असे कला क्षेत्र आहे जिथे केवळ तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांनाच शोधून चालत नाही तर कठोर साधना देखील करावी लागते. अनेक गोष्टी सकारात्मक असतानाही एखादी छोटीशी नकारात्मक गोष्ट जरी घडली तरी सर्व साधना व्यर्थ ठरते. स्वतःची प्रतिमा राखण्यासाठी निरंतर साधना करणे आवश्यक आहे. हीच गोष्ट आपल्या झाकल्या मुठीत ठेवून रंजीत रजवाड़ा त्यांच्या गझल गायनात आपले नाव सर्वोत्तम पातळीवर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्यासारख्या महान शास्त्रीय संगीतकाराने सुद्धा तरुण रंजीत रजवाड़ा हे ग़ज़लचे भविष्य असल्याचे सांगितले. गायकी आणि गझललाच आपले सर्वस्व मानणारे रंजित हे राजस्थानच्या त्या मातीतील सुगंध घेत मोठे झाले, जो गायकीचा एक मोठा गढ मानला जातो.

काही अंशी तिथल्या मातीचे त्यांच्यावर संस्कार आहेत तर काही अंशी त्यांच्या घराणेशाही परंपरेचे. आज जगभरात गझल जिथे जिथे ऐकली जाते, तिथे तिथे रंजित यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, त्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. त्यांचे चाहते त्यांना राजकुमार म्हणून संबोधतात.


image


रंजित यांनी युवर स्टोरीला जेव्हा त्यांच्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या या यशामागे दडलेल्या संघर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांना गझल गायकीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी पायपीट करावी लागली. त्यांच्या प्रारंभिक जीवनाबद्दल बोलताना रंजित सांगतात की, “ संगीताचा वारसा लाभलेल्या घरात माझा जन्म झाल्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षीच मी गुणगुणायला सुरवात केली होती. गायन आणि वादन तर आमच्या घरात पिढीजातच होते. माझे वडील सकाळी साडेसहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत माझ्याकडून रियाज करवून घ्यायचे आणि त्यानंतर मला शाळेत सोडायचे. असा दिनक्रम अनेक वर्ष सुरु होता. वयाच्या सातव्या वर्षी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मला प्राप्त झाला. बारा वर्षापर्यंत अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले. मला ठाऊक होते की, प्रतिमा आणि प्रतिस्पर्धा या दोघांमध्ये त्यांच्या विचारांना आकार देण्याच्याही अधिक पुढे गेले पाहिजे, मी तुम्हाला एक शेर ऐकवतो,

जो अपनी फिक्र को ऊँची उडान देता है

खुदा उसको खुला आसमान देता है ...

जो आपल्या प्रयत्नांनी आकाशात उंच भरारी घेण्यास शक्तीपणाला लावतो, परमेश्वर त्याला संपूर्ण आकाश मोकळे देतो.


image


संगीत क्षेत्रात रिंअॅलिटी शोज् सुरु झाल्यानंतर या क्षेत्रातील अनेक प्रतिभावंत गायक नावारूपाला आलेत. यामध्ये प्रतिस्पर्धींच्या संख्येतही वाढ झाली आहे. अशात आपले स्थान कायम राखणे किंवा अस्तित्व टिकवणे आव्हानात्मक असते. याबद्दल रंजित सांगतात की “ मी स्वतःबरोबरच स्पर्धा करतो. मला वाटतं की येणारा प्रत्येक दिवस गेल्या दिवसापेक्षा अधिक चांगला असावा, इतर प्रतिस्पर्धी काय करत आहे किंवा त्याचे काम पाहण्यापेक्षा मला स्वतःमध्ये तल्लीन होऊन पुढे मार्गक्रमण करायला आवडते. मला असे वाटते की प्रत्येक कलाकाराची वेगळी शैली असते, वेगळेपण असतं, त्याचे वेगळेपणच त्या त्या कलाकाराची ओळख करून देतं”

.

image


सारेगामाच्या शेवटच्या पाच प्रतिस्पर्धींमध्ये स्थान प्राप्त करणारे रंजित सिंह राजवाडा हे रिअॅलिटी शोमध्ये झळकण्यापूर्वीच एक बालकलाकार म्हणून प्रसिद्ध होते. कितीतरी मैफिली त्यांनी गाजवल्या होत्या आकाशवाणीवर त्यांच्या अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले होते.

सारेगामा कार्यक्रमानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले ? असा प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणतात की, मी विचारही केला नव्हता की मी रिअॅलिटी शो मध्ये भाग घेईन म्हणून. कोलकत्ता आकाशवाणीवर गाण्याच्या सादरीकरणा दरम्यान मला रिअॅलिटी शो मध्ये बोलवण्यात आले आणि ऑडिशन नंतर माझी निवडही करण्यात आली. मला आठवतं की, अनेकजण गझल गायनाला रिअॅलिटी शो मध्ये निवड करण्याच्या विरोधात होते. लोकांचे म्हणणे होते की गझल ऐकणाऱ्यांची संख्या जास्त नाही, मात्र शोचे यशस्वीरित्या प्रक्षेपण होऊ लागल्यानंतर त्यांचे विचार बदलले आणि कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला जे मी शब्दात सांगू शकत नाही.”


image


रंजित यांची एक वेळ अशीही होती, जेव्हा गायन क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना बरीच पायपीट करावी लागली होती, यावर बोलताना ते सांगतात की, “ जेव्हा माझ्या वडिलांची राजस्थानवरून मुंबईला बदली झाली तेव्हा मुंबईमध्ये आमच्यासाठी सर्वकाही नवीन होतं. आम्ही अनोळखी होतो. तेव्हा आम्ही बाजा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायचो आणि लोकांना गाणी ऐकवायचो. अनेक दिवस हा संघर्ष सुरु होता. मात्र हळूहळू आमची ओळख निर्माण होऊ लागली. लोकांना आमचे गाणे आवडायला लागले. थोडक्यात लोकांनी आमचा स्वीकार केला. आमची लोकप्रियता वाढू लागली.

रंजित हे मान्य करतात की, संगीत क्षेत्रात टिकाव धरणे हे फार कठीण काम आहे, कारण यामध्ये सातत्य असणे अत्यावशक आहे. आयुष्यभर प्रत्येक दिवशी पहिल्या दिवसाप्रमाणे जगावे लागते. जर कधीतरी तुम्हाला असे वाटले की, बास पुरे झाले आता, मी भरपूर काही शिकलो आहे, त्यादिवशी तुमच्यातील कलेचा पूर्णविराम होतो. ते म्हणतात की, “ घराण्याची परंपरा राखण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांची भूमिका पार पाडावी लागते. लोकांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षा त्यांचा आशिर्वाद मानून मी पूर्ण करतो. ध्येयपूर्तीसाठी आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मी दररोज रियाज करतो, साधना करतो.”

असे म्हंटले जाते की, गायनक्षेत्रात कोणीही आपली कारकीर्द घडवू शकत नाही. याबद्दल बोलताना रंजित सांगतात की, ही कला शिकवली जात नाही. कठोर परिश्रमानंतर काही गोष्टी तुम्ही निश्चितच साध्य करू शकता, मात्र यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी परीश्रमाबरोबरच तुमच्या अंतर्मानातील सूरही प्रकटायला हवे. ते म्हणतात की, गायन या कलेचा मुख्य उद्देश आहे, आनंद प्राप्त करणे. यातून प्राप्त होणारा आनंदच कलाकार आणि कलाप्रेमींमधलं नातं मजबूत करतो. कलाकाराला हे कळलं पाहिजे की, जी शाबासकीची थाप त्याला मिळते आहे, ती खरखुरी आहे. यशोशिखरावर असताना गर्व न करता आशिर्वादाप्रमाणे घेतले पाहिजे”.


image


रंजित अजून तरुण आहे, त्यांना उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे. गुलाम अली, मेहंदी हसन आणि जगजीत सिंह यांना ते आपले आदर्श मानतात, मात्र हेही तितकेच महत्वाचे आहे की, गुलाम अली आणि जगजीत सिंह यांच्या पिढीनंतर चांगले गझल गायन करणाऱ्यांची विशेष कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत नवीन कलाकाराची जबाबदारी आणखी वाढते. यावर रंजित म्हणतात की, सातत्याने रियाज करत राहण्याबरोबरच मी हे समजतो की, संगीताच्या उगमस्थानाशी जोडून राहावे, गझलांचेच जिणे जगावे आणि शायरी करणाऱ्यांच्या विचारांना आपल्या गाण्याच्या माध्यमातून सादर करत राहावे”.

रंजित यांच्या ‘ तेरे ख्याल से ' या अल्बमनंतर आता ते त्यांच्या नवीन अल्बम ‘पैगाम’ ची तयारी करत आहे. त्यांच्यासमोर गझलप्रेमींचं एक मोठं जग उभं आहे.


लेखक : अरविंद यादव

अनुवाद : नंदिनी वानखडे - पाटील

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags