आकांक्षे पुढे आभाळही ठेंगणे
दिल्लीतील १६ वर्षीय तीन युवकांची ड्रोनच्या सहाय्याने प्रदूषण मुक्तीची कल्पना
असे म्हंटले जाते कि 'सोळावे वरीस धोक्याचे' तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे राहण्याचा हा काळ, सामाजिक बांधिलकी - पर्यावरण संरक्षण असे विषयही अशा काळात विचारात घेतले जात नाहीत. मात्र या प्रचलित धारणेला छेद देत दिल्लीतील तीन विद्यार्थ्यांनी एका अशा यंत्राचा विकास केला ज्याच्या सहाय्याने पर्यावरणाचे भान सामान्यांना येण्यास मदत होईल.
आपल्या वयाला आणि अनुभवहिनतेला अडसर न बनू देता संचित मिश्रा, त्र्यंबकेश जोशी आणि प्रणव कालरा या तीन विद्यार्थ्यांनी हवेतील प्रदूषण मापन करणारे यंत्र विकसित केले आहे. तसे पाहता हे यंत्र सहसा सुरक्षेच्या संदर्भात वापरले जाते मात्र या तीन मित्रांचा असा विश्वास आहे की यांचे हे ड्रोन पर्यावरण संरक्षणात एक मोठी भूमिका बजावेल. या यंत्राला बनवण्यामागची प्रेरणाच मुळात ही आहे की लोकांना कळावे की ते ज्या हवेत श्वास घेतात त्यामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण किती आहे. यांचे म्हणणे आहे की या यंत्राच्या सहाय्याने समाजात लोकांमध्ये पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण होईल आणि पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्याच्या दिशेने योग्य प्रयत्न सुरु करता येतील.
संचित आणि त्र्यंबक दोघेही सोळा वर्षांचे आहेत आणि याच वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा पास केली आहे तर प्रणव केवळ १५ वर्षांचा असून तो अद्याप इयत्ता दहावीत शिकत आहे
संचित सांगतो की तो आणि त्र्यंबक एकाच शाळेत शिकत होते आणि जेव्हा ते नववीत होते तेव्हा एका स्पर्धेकरिता दुसऱ्या शाळेत गेले तिथेच त्त्यांची ओळख प्रणव सोबत झाली आणि तिघांमध्ये चांगलेच मैत्र जुळून आले. तिघानाही तंत्रज्ञानात रुची होती आणि तिघेही आयुष्यात काही वेगळे करू इच्छित होते आणि आपल्या अभ्यास सोबतच आणखी काय वेगळे करता येईल याचे विचार त्यांच्या डोक्यात चालू असायचे.
याच सुमारास संचित ड्रोन वर संशोधन करीत होता तेव्हा प्रणव च्या मनात एक कल्पना स्फुरली की का नाही एक असे ड्रोन बनवावे जे पर्यावरणासाठी काही काम करू शकेल मग तिघेही मित्र या ड्रोन बनवण्याच्या तयारीला लागले. याच वर्षी (२०१५) फेब्रुवारीत त्यांनी आपल्या प्रोजेक्ट वर काम करणे सुरु केले आणि जुलै मध्ये त्यांचा ड्रोन बनून तयार होता. मात्र आजही हे तिघे याला अपग्रेड करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
त्र्यंबक सांगतो "आमचा ड्रोन पर्यावरणाची योग्य आकडेवारी देतो मात्र आज त्या आकड्याना केवळ पर्यावरण विशेषज्ञच समजू शकतात. आम्ही याला अजून अपग्रेड करत आहोत आणि याचे सुलभीकरण करून या प्रकारे बनवत आहोत की एक सामान्य व्यक्तीही याला समजू शकेल. सोबतच त्याला ही पण माहिती मिळेल की आता वातावरणात कोणता वायू किती प्रमाणात आहे" तिघांचा असा दावा आहे की त्यांचे यंत्र पर्यावरणातील सगळ्याच वायूंचे अचूक प्रमाण सांगते आहे. मात्र अजून या यंत्राला कोणत्याही संस्थेची मान्यता मिळालेली नाही पण हे तिघेही आपल्या या कल्पनेला अधिक विकसित करून मगच याला संबंधित संस्थे समोर वैधतेसाठी घेऊन जाऊ इच्छितात.
संचित, त्र्यंबक आणि प्रणवला विश्वास आहे की आता जरी ड्रोनवर बंदी असली तरी या कल्पनेला अजून विकसित करून सरकार समोर मांडतील आणि सांगतील की त्यांचा हा प्रकल्प सरकार आणि एका सामान्य माणसां करता किती महत्वाचा आहे.
हे यंत्र तयार करणे तिघांसाठीही सोपे नव्हते. कारण हे तिघेही अद्याप वि्द्यार्थीदशेत आहेत आणि या प्रकल्पावर फार खर्च ही आला. या शिवाय हे उपकरण बनविण्यासाठी यांना आपल्या घरापासून सुमारे दोन तासांचा प्रवास करून दिल्लीतील सुभाष पेलेस, पिताम पुरा येथील मेकर्स स्पेस येथे जावे लागत असे. इथे सर्वजण मिळून उपकरणाच्या विविध भागांवर काम करत. तेथील इतर लोकांनीही यांची या कामात फार मदत केली. उपकरण बनवताना या गोष्टीचीही विशेष काळजी घेतली गेली की ते इथून तिथे वाहून नेण्यास सोयीचे होईल.
संचित सांगतो - "आपल्या स्वप्नांना साकार करणे एवढेही सोपे नसते. आमच्या सारखेच अन्य ही विद्यार्थी आहेत जे काही करू इच्छितात. त्यां साठी सरकारने अधिकाधिक मेकर्स स्पेस बनवाव्यात ज्याने अशी मुले जी काही वेगळा विचार करतात आणि प्रयोग करू इच्छितात त्यांना एक व्यासपीठ मिळू शकेल."
भविष्यात या तंत्रज्ञानाला हे सामान्य माणसाशी जोडू इच्छितात. या तंत्रज्ञानाचा वापर करून हे एक असे उपकरण बनू इच्छितात जे शहरातील पार्किंगची समस्या, जी एक मोठी समस्या बनत चालली आहे त्यावर तोडगा काढू शकेल. भविष्यात हे एक असे अॅप विकसित करू इच्छितात जे या ड्रोन च्या सहाय्याने लोकांना त्यांच्या फोनवर ही माहिती देईल की त्यांची गाडी पार्क करण्याकरिता जवळपास कोठे मोकळी जागा शिल्लक आहे.
सुरवातीला यांनी विचार केला होता की या ड्रोन ला एखाद्या स्वयंसेवी संस्थेद्वारे सामोरे आणावे मात्र लवकरच त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की असे ड्रोन बनवण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज भासणार आहे आणि म्हणून स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यापेक्षा ते स्वतःच एक स्टार्टअप सुरु करतील. त्यानंतर त्यांनी 'फिनिक्स ड्रोन लाइव' या नावाने स्टार्टअप सुरु केले. ज्यासाठी हे आता गुंतवणूकदारांच्या शोधात आहेत.
आपला अभ्यास आणि या प्रयोगांव्यतिरिक्त त्र्यंबक जोशीला पिआनो वाजवणे आणि गाणे आवडते तर संचितला तंत्रज्ञान विषयक गोष्टीमध्ये रुची आहे. त्याचे म्हणणे आहे की ज्या गोष्टीत काही तंत्रज्ञान नाही त्यात त्याचे मनच रमत नाही. प्रणव ला नृत्याचा छंद असून तो स्वतःही एक चांगला नर्तक आहे.