संपादने
Marathi

सिल्लीगुडीपासून सुरू झालेल्या व्यवसायाचा जगभर विस्तार कौशल यांच्या ʻटीबॉक्सʼची यशोगाथा

Ranjita Parab
8th Nov 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

ई-कॉमर्ससाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ म्हणजे ʻईस्पार्क्सʼ. ʻटीबॉक्सʼ हे याच ईस्पार्क्स २०१३चे विजेते घोषित करण्यात आले होते. त्याकाळी ते ʻदार्जिलिंग टीएक्सप्रेसʼ नावाने ओळखले जात. या टीबॉक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सॅण्डबॉक्स नेटवर्कचे फेलो सभासद कौशल डुगर यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा करण्याची आम्हाला संधी मिळाली. तेव्हा सिल्लीगुडीपासून सुरू झालेल्या या व्यवसायाचा ६५ देशांमध्ये विस्तार कसा झाला, याबाबत त्यांनी आम्हाला माहिती दिली. उत्तर-पूर्व भारतातून व्यवसाय सुरू करणे, किती आव्हानात्मक होते, तसेच सुरुवातीच्या दिवसातील त्यांचा संघर्ष याबाबत कौशल यांनी सांगितले. मात्र ग्राहक आधार तसेच महिना दर महिन्यांत होणाऱ्या महसूल वृद्धीने त्यांना सांभाळून घेतले, असे कौशल यांनी सांगितले. ही जवळपास एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे.

२०१४ या वर्षात प्रवेश करताच त्यांनी पाच लाख कपपेक्षा अधिक चहा बाहेरगावी पाठवला. ६५पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांनी भारतातील चहा निर्यात केला आहे. तसेच ग्राहक आधार आणि महसूल वृद्धीच्या स्थिर विकासाला कायम ठेवले आहे. ज्यापैकी ९९ टक्के महसूल परदेशातून येतो. कदाचित ʻटीबॉक्सʼ भारतातील पहिला ई-कॉमर्स व्यवसाय आहे, ज्यांचा संपूर्ण महसूल परदेशातून येतो. जागतिक चहा व्यवसायात त्यांनी ४० कोटी डॉलर्सचा व्यवसाय केला असून, दोन अंकी आकड्यांमध्ये महसूल वृद्धी नोंदवली आहे. ʻटीब़ॉक्सʼने एस्सेल पार्टनर्स आणि हॉरीजेन वेंचर्स यांच्याकडून जवळपास एक लाख डॉलर्स निधी वाढवला असल्याची त्यांनी नुकतीच घोषणा केली आहे. ʻटीब़ॉक्सʼ एक अशी कंपनी आहे जी ऑनलाईन चहाची विक्री करत आहे. तीदेखील अशा ग्राहकांना जे भारताबाहेर वास्तव्यास आहेत. ʻटीब़ॉक्सʼचा आतापर्यंतचा प्रवास हा असा असल्याचे कौशल डुगर यांनी सांगितले.

image


कौशल सांगतात की, ʻसिल्लीगुडी येथुन ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करणे आव्हानात्मक काम होते. एक नावाजलेले उत्पादन जसे की स्मार्टफोन ऑनलाईन विकणे सोपे आहे. कारण ग्राहकांना त्या उत्पादनाबद्दल बरीच माहिती असते. मात्र मला चहाची विक्री करायची होती, असे उत्पादन ज्याची विक्री रंग-रूप, अनुभव आणि सुगंध यांच्यावर अवलंबून आहे. आपल्या स्टार्टअपमध्ये फार पूर्वी मला या गोष्टी जाणवल्या होत्या.ʼ त्यानंतर दोन महत्वाच्या बाबींसोबत कौशल यांनी पुढे जाण्याचे ठरविले, ज्या त्यांना सफल करू शकत होत्या.

१. इन्वेन्ट्री आणि लॉजिस्टीक व्यवस्थापनाकरिता एक प्रक्रिया

२. ती मिळण्यासाठी एका प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करणे

आपल्या उत्पादनाकरिता सर्वात चांगली चहापत्ती ओळखण्याकरिता आणि शुद्धीकरणाकरिता त्यांनी चहाच्या मळ्याच्या मालकांसोबत काम करणे सुरू केले. एक सुदृढ तसेच सक्षम प्रक्रिया आणि पॅकेजिंग प्रक्रियेची स्थापना केली. त्यानंतर वितरण सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या जसे की, डीएचएल, फेडएक्स, ईएमएस (भारतीय डाक) आणि एयर मेल यांना आपल्या ग्राहकांकडे कमीतकमी वेळेत आपले उत्पादन पोहोचवण्यासाठी प्रत्येक देशाकरिता सर्वश्रेष्ठ आणि सक्षम सेवा कोणती, याचा अभ्यास केला.

image


कौशल सांगतात की, सद्यस्थितीला त्यांच्या व्यवसायात एवढी वाढ झाली आहे की, त्यांना प्रत्येक देशाचा पिनकोडदेखील माहीत आहे. त्याशिवाय कोणत्या देशात कोणती कंपनी सर्वात जलद सेवा पुरवू शकते, याचीदेखील त्यांना पुरेपुर कल्पना आहे. त्यांनी प्रत्येक देशाकरिता सर्वात विश्वसनीय सेवा कोणती, याचादेखील अभ्यास केला आहे. वर्ल्डपे, पेपाल, पेयू आणि अन्य यांना त्यांनी आपल्या संचालक मंडळात भागीदार बनविले आहे. जेणेकरुन ग्राहक या सेवा वापरताना तणावविरहित राहू शकेल. कारण ʻटीब़ॉक्सʼची मागणी ते ऑनलाईन करत असतात.

ही संपूर्ण प्रक्रिया सर्वश्रेष्ठ चहापत्तीची निवड, शुद्धीकरण, प्रक्रिया करणे आणि पॅकेजिंगपर्यंत आहे. त्यानंतर ʻटीब़ॉक्सʼचे उत्पादन एका आठवड्याच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येते. यावरुन आपल्या लक्षात येऊ शकते की, रशिया आणि कॅनडामधील एक चहाप्रेमी भारतातील एक किलो उत्कृष्ट चहा पावडरकरिता १०० डॉलर्स ते १५०० डॉलर्स मोजायला का तयार असतो.

प्रसिद्ध अशा बड्या शहरांपासून दूर असलेल्या सिल्लीगुडीसारख्या एका छोट्या शहरातून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन स्टार्टअप आधारित कंपनीसाठी पैसे गोळा करणे, आव्हानात्मक होते. कौशल सांगतात की, ʻमी कित्येक दिवस अनेक गुंतवणुकदारांमध्ये फुकट घालवले. त्यांना भेटणे, फोन करणे, ई-मेल द्वारे त्यांच्या संपर्कात राहणे, अशी कामे केली. मात्र त्यांनी गुंतवणुकीत काही रस दाखवला नाही. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला.ʼ त्यानंतर कौशल यांनी गुंतवणुकदारांशी थेट चर्चा करण्याचे ठरविले. जेणेकरुन ते गुंतवणुकदारांना ʻटीब़ॉक्सʼच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगू शकतील. ते दिल्ली, मुंबई, बंगळूरू आणि हैदराबाद येथे देखील गेले, जेथे त्यांनी ʻटीब़ॉक्सʼबाबत गुंतवणुकदारांशी चर्चा केली. यावेळेस काही गुंतवणुकदारांनी त्यांच्या या उत्पादनात रस दाखवला आणि त्यांना संधी देऊ केली. मात्र अद्यापही काही गुंतवणुकदार समाधानी नव्हते. एस्सेल पार्टनर्स यांनी त्यांच्याबाबत रस दाखवला मात्र काही गुंतवणुक कऱण्यात आली नाही. ईस्पार्क्स २०१३ संपन्न झाल्यानंतर हे साध्य झाले. कौशल सांगतात की, ʻईस्पार्क्स २०१३मध्ये विजयी झाल्यामुळे वास्तवात मी आकर्षणाचा केंद्रबिंदू झालो होतो. यामुळे मला मानसिक बळ मिळाले होते आणि मला लोकांकडे, गुंतवणुकदारांकडे पोहोचण्याची संधी दिली होती. जर मला हा पुरस्कार मिळाला नसता, तर गुंतवणुकदार माझ्याकडे आकर्षित झाले नसते. कारण मी महानगरांपासून दूर उत्तर बंगालमध्ये स्थायिक होतो.ʼ

image


ईस्पार्क्समध्ये विजयी झाल्यानंतर लगेचच एस्सेल पार्टनर्ससोबतच्या चर्चांना वेग आला आणि अखेरीस २०१३च्या शेवटी एस्सेल लीडिंग आणि होरिजन वेंचर्स यांच्यासोबत व्यवहार झाला. एस्सेलच्या प्रशांत प्रकाश यांनी सल्लागार म्हणून त्यांच्या संचालक मंडळात पदभार स्वीकारला. सध्या सर्व प्रक्रिया आणि व्यवस्था योग्य स्थानी स्थापित करण्यात आले आहेत. कौशल सांगतात की, पुढील १२ महिन्यात ते आपले ग्राहक आणि महसूल ३ ते ५ पट वाढवू इच्छितात. त्यांचा विश्वास आहे की, ही वाटचाल मजबूत विपणन, खरेदी कौशल्य तसेच संचालन अनुभव यासोबतच कुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती या माध्यमांद्वारे साध्य करता येऊ शकते. सध्या ʻटीब़ॉक्सʼची २१ सदस्यीय ( ९ बंगळूरू येथे आणि १२ सिल्लीगुडी येथे) टीम आहे. लवकरच ते गुवाहाटी, कोच्ची/निलगिरी येथे ʻटीब़ॉक्सʼचा विस्तार करणार आहेत. बॅकवर्ड लिंकेजेज आणि अन्य चहा उत्पादन क्षेत्रासाठी संरचना तयार करून त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार लवकरच ते रशिया, अमेरिका, जपान, चीन, जर्मनी, फ्रान्स आणि पश्चिम युरोप येथे व्यवसायाचा विस्तार करणार आहेत. ʻटीब़ॉक्सʼच्या दीर्घकालीन ध्येयाबद्दल विचारले असता कौशल सांगतात की, ʻचहा तर फक्त सुरुवातीचे उत्पादन आहे. आम्हाला ʻप्लग-एन-प्लेʼचा एक प्रकल्प तयार करायचा आहे. मसाले, धान्य तसेच अन्य वस्तुंचा सशक्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुरवठा करण्याचा साखळी व्यापार आम्हाला करायचा आहे. आम्हाला अजून फार मोठा प्रवास करायचा आहे.ʼ

ʻटीब़ॉक्सʼमध्ये एस्सेलने केलेली गुंतवणुक त्यांच्या फायद्याची असल्याचे संकेत देते. या क्षेत्रातील आपला अनुभव आणि उत्पादनांमध्ये विशेषज्ञता असल्याकारणाने ʻटीब़ॉक्सʼला ते जागतिक स्तरावर विस्तारित करू शकतात. तसेच त्यांच्या अन्य पोर्टफोलियो कंपन्यांकडून शिकण्यासारखे बरेच काही असल्याचे कौशल सांगतात.

कौशल सांगतात की, ʻमी अद्यापही सामना करत असलेले मुख्य आव्हान म्हणजे माझ्या कर्मचाऱ्यांना हे समजाविणे की, मी माझ्या लहानशा शहरातून सिल्लीगुडी येथून एक जागतिक स्तरावरचा व्यवसाय निर्माण करत आहे.ʼ कौशल आणि त्यांची टीम स्थानिक संघटनांसोबत सकारात्मक प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. काही चहाच्या मळ्याच्या मालकांच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. चर्चा समाप्त होताना कौशल सांगतात की, ʻसर्व स्टार्टअप संस्थापकांना मी एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो की, फंड गोळा करतानाच्या अनुभवादरम्यान आपण अनेक गोष्टी शिकतो. विशेष करुन त्या वेळेस जेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या महानगरातून किंवा स्टार्टअप हबमधुन येत नाही. मात्र घाबरायचे काही कारण नसते. आपले विचार, टीम, यंत्रणा आणि प्रक्रिया जो तुम्ही तयार केला आहे, त्यावर विश्वास ठेवा आणि बाजारावर विश्वास ठेवा. एकदा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि तुम्ही तुमच्या उत्पादनाबद्दल आश्वस्त झालात की, तुम्हाला तुमचे उत्पादन दुसऱ्यांना समजावणेदेखील सोपे जाऊ शकते. मग ते व्यवसायातील भागीदार असोत किंवा गुंतवणूकदार. सर्वात पहिला तुमचा स्वतःवर विश्वास हवा.ʼ, असे कौशल सांगतात.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags