संपादने
Marathi

आवश्यक वस्तूंची घरपोच सेवा देणारे : 'अर्बनहॉपर्स' अॅप

Suyog Surve
20th Oct 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

एका यशस्वी मनुष्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे त्याची दृढ इच्छा शक्ती. छोट्या छोट्या गोष्टींना शिकण्याची इच्छा आणि त्यासाठी केला जाणारा संकल्प. कुणी व्यक्ती त्याच्या कामात कितीही निपुण असली तरी जर त्याच्यात काही नवं करण्याची आणि काही नवं शिकण्याची इच्छाच निघून गेली तर त्याच अधःपतन होणार. जर तुमच्यात नवं काही शिकण्याची लालसा असेल तर तुमच्या अवतीभवती असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही सहजपणे काहीतरी नवं शिकू शकता. तुमची इतरांशी असलेली वागणूक आणि तुमचा दृढनिश्चय तुम्हाला पुढे जाण्यास निश्चितच मदत करतो.

लक्ष्मी पिल्लई ही अशी स्त्री आहे जी प्रत्येक दिवशी काहीतरी नवं शिकत असते. जिच्यासाठी प्रत्येक दिवस एक आव्हान असतो आणि ती तेवढ्याच मेहनतीने आणि निष्ठेने काम करते. लक्ष्मी यांनी नुकतंच 'अर्बनहॉपर्स' (UrbanHopperz )नामक मोबाइल अॅपला बाजारात आणलं आहे ज्याला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ह्या मोबाइल अॅप मुळे दिल्ली, नोएड़ा आणि गुड़गांव इथले ग्राहक घरबसल्या आवश्यक वस्तू मागवू शकतात.

image


लक्ष्मी यांचा जन्म कोलकात्ता येथे झाला त्या नंतर त्या दिल्लीला आल्या. त्या मुळच्या मल्याळी आहेत. संशोधक असणारे लक्ष्मी चे वडील त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते. लक्ष्मी यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून इलेक्ट्रोनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये इंजिनियरिंगची पदवी मिळवली त्यानंतर इन्फोसिस कंपनी मधून आपल्या करिअरची सुरवात केली.

लक्ष्मी काहीतरी स्वतःचं काम सुरु करू इच्छित होत्या. इंफोसिस नंतर त्या एसएपी लॅब्स बंगळूरू ह्या कंपनीत आल्या. त्यानंतर २०१० मध्ये अटीरो कंपनी मध्ये आईटी आणि मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत झाल्या. लक्ष्मी त्यांचे तिथले अनुभव सांगतात की, तिथे त्यांची पाच जणांची टीम होती. काम फार आव्हानात्मक होतं पण त्यांच्या संपूर्ण टीमने ते काम उत्तम तऱ्हेने केलं आणि त्यांच्या ह्या अनुभवाने त्यांना खूप काही शिकवलं. 


२०१३ मध्ये लक्ष्मी यांना मुलगी झाली ज्यामुळे त्यांनी ८ महिने काम केलं नाही. ८ महिन्यानंतर जेव्हा त्या कामावर रुजू झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या केबिन ला असं काही बदललं की त्या तिथे त्यांच्या मुलीला सोबत आणू शकत होत्या आणि त्यांना आठवड्यातून ३ दिवसच यायचं होत बाकी २ दिवस त्या घरी राहूनच काम करायच्या. ह्या ८ महिन्याच्या ब्रेक मध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींच्या योजना आखल्या. त्यांनी बघितलं की दिल्ली सारख्या मोठ्या शहरात लास्ट माइल कनेक्टिविटी नाही आणि त्यां ह्यावरच काम करायचा विचार करू लागल्या. त्यांनी ठरवलं की एक असं मोबाइल अॅप तयार करायचा की ज्यामुळे दिल्ली च्या लोकांना त्या मोबाइल अॅप चा फायदा होऊ शकेल.

काही काळानंतर त्यांनी UrbanHopperz हे मोबाइल अॅप सुरु केले. अर्बनहॉपर्स मुळे लोक औषधे, बेबी फूड़, ग्रोसरी आइटम, स्टेशनरी, ब्यूटी प्रोडक्ट्स, इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स घरपोच मागवू शकता या व्यतिरिक्त तुम्ही या सर्व गोष्टीना अन्यत्र सूद्धा मागवू शकता. याचा वापर करणं फार सोपं आहे. हे काही ई-कामर्स अॅप नाही, तर हे अॅप ग्राहकांना फक्त त्यांच्या घरी समान पोहचवण्यास मदत करते. ग्राहकांना अधिक सुविधा प्राप्त व्हावी म्हणून लक्ष्मी आता आपल्या अॅपमध्ये पेमेंट गेटवे ही जोडू इच्छितात. अगदी अल्प कालावधीतच या अॅपला हजारो लोकांनी डाउनलोड केलेले आहे आणि याचा चांगला लाभ घेतला आहे. या प्रयोगा नंतर लोकांची प्रतिक्रिया ही खूपच सकारात्मक आहे ज्यामुळे लक्ष्मी आणि त्यांची टीम खूपच उत्साहात आहेत. अर्बनहॉपर्स ची अवघी चार जणांची टीम आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश दिल्ली, नोएडा येथे राहणाऱ्या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा देणे हा आहे. लक्ष्मी सांगतात की येणाऱ्या काळात आणखी काही शहरांमध्ये ही सेवासुविधा पुरवण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र त्यांना कोणत्याही गोष्टीची घाई नाही आणि विस्तार करण्याच्या नादात त्या देत असलेल्या सेवेच्या दर्जेमध्ये घसरण होऊ देणार नाहीत. लक्ष्मी यांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस त्या एक आव्हान म्हणून स्वीकारतात. प्रत्येक गेलेल्या दिवसाकडून त्या काही ना काही चांगले शिकून घेण्याचा प्रयत्न करतात.

image


लक्ष्मी यांनी ठरवले होते की काहीही झाले तरी त्या रविवारी नक्की सुट्टी घेतील मात्र आता स्वतःची कंपनी असून देखील त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. त्या ही आपल्या इतर साथीदारांसोबत काम करतात उलट वाढत्या जबाबदारी मुळे त्या स्वतःच रविवारी काम करतात.

लक्ष्मी साठी स्वतःची कंपनी चालू करणं हा फारच सुखद अनुभव होता. त्या सांगतात की इथे त्या स्वतः साठी काम करतात त्यांना कोणालाही उत्तर द्यायचे नसते आणि सारं काही स्वतःच्या मनाप्रमाणे करता येते. चांगले आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टींसाठी त्या स्वतःच जबाबदार असतात. महिला उद्योजिकांना त्या सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवा, असे कोणतेच काम नाही जे महिला नाही करू शकत नाही, फक्त गरज आहे ती आत्मविश्वास आणि संयमाची.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags