संपादने
Marathi

उडिसामधील १४ वर्षांच्या मुलीने विकसित केली पाणी शुध्द करण्याची ‘चिपमेथड’!

Team YS Marathi
22nd Jun 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

केवळ निरिक्षण शक्तीचा वापर केला तर अगदी रोजच्या जीवनातील वस्तुंचा वापरही कौशल्यपूर्ण पध्दतीने करता येतो. याचेच उदाहरण घालून दिले आहे ललिता प्रासिदा श्रीपाद श्रीसाई, या नवव्या वर्गात शिकणा-या मुलीने. उडिसाच्या दमनजोडी गावात कोरपात जिल्ह्यात राहणाऱ्या तिने कँलिफोर्निया मध्ये झालेल्या गुगल सायन्स फेअर २०१५ मध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'कम्युनिटी इम्पँक्ट पुरस्कार' मिळवला आहे. वापरलेले पाणी शुध्द करण्यासाठी तिने तयार केलेल्या चिपमेथड बद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला. ज्यामध्ये मक्याच्या कणसाच्या धाटांचा उपयोग पाण्यातील घटकांना शुध्द करण्यासाठी मुलभूत घटक म्हणून करण्यात आला आहे. मक्याच्या कणसाच्या वेगवेगळ्या थरातून जाऊन पाणी स्वच्छ होऊन बाहेर पडते अशी ही पद्धती विकसित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया कमी खर्चाची आणि सरळसोप्या पध्दतीची झाली आहे. तिचा उपयोग पाणीसाठे शुध्द करण्यासाठी, पाण्याच्या टाक्यातील पाणी संवंर्धनासाठी होणार आहे. तिला दहा हजार डॉलर्सचा पुरस्कार देण्यात आला आणि गुगलने हा प्रकल्प तयार करण्यासाठी मदत केली.

image


प्रकल्पाचा भाग म्हणून ललिता प्रासिदा हिने मक्याच्या कणसाच्या धाटांचा उपयोग स्थानिक आणि व्यापारी दोन्ही वापराच्या पाण्यासाठी प्युरिफायर सारखा करून घेतला आहे. यासाठी ‘शोष’ तत्वाचा वापर करण्यात आला. याबाबत चा प्रयोग करताना ललिता प्रासिदा यांना दिसून आले की मक्याच्या रिकाम्या कणसांमध्येही शोषून घेण्याची क्षमता असते. जसे की क्षार तत्व, प्रक्षालके, काढून टाकलेली सत्वे,रंगीत द्रावणे, तेल, ग्रिस, आणि काही प्रकारचे धातू देखील.

“ मला आजुबाजुच्या खेड्यात जावून तेथील लोकांच्या राहणीमानाचे निरिक्षण करण्याची आवड आहे. गावक-याचे जीवन शेती, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करणे यात व्यतीत होते. त्यातूनच मला प्रेरणा मिळाली, आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून काहीतरी नवे करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. जे शेतीशी संबंधीत असेल” ललिता प्रसिदा यांनी सांगितले.

कहाणी सौजन्य : थिंक चेंज इंडिया

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात जीवशास्त्रीय संशोधनासाठी ‘मिनीपीसीआर’

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय 'अंतराळ वीरांगना'

जंगलबुकच्या मोगलीकडून प्रेरणा घेतलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘निखिल मोगली’ची प्रत्यक्ष कथा; वाघांच्या संवर्धनासाठी कार्यरत!

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags