संपादने
Marathi

मेफिल्डकडून २१ कोटी मिळवून मुंबईच्या ‘बॉक्स8’ने रचला इतिहास

24th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

हल्लीच्या काळात खाद्यतंत्र हाच एक बाजार असा आहे, ज्यात सध्या सर्वाधिक तेजी आहे. सतत चर्चेत तर हा बाजार असतोच, त्यासह गुंतवणूकदारांना आपल्या दिशेने खुणावण्यातही याच बाजाराची आघाडी आहे. अगदी अलीकडे मुंबईतल्या ‘बॉक्स8’ या खाद्य कंपनीने तर कमालच केली. कंपनी ऑन डिमांड म्हणजे मागणीनुसार जेवण तयार करून ते पोहोचवण्यापर्यंतचे काम करते. ‘बॉक्स8’च्या स्वादाची सरशी तेव्हा झालीच जेव्हा सिलिकॉन व्हॅलीतील एक बडे नाव असलेल्या ‘मेफिल्ड’ कंपनीने गुंतवणूक म्हणून तब्बल २१ कोटी रुपये ‘बॉक्स8’च्या खात्यात वळवले. एवढी मोठी रक्कम वळली म्हटल्यावर सर्वांच्याच नजरा ‘बॉक्स8’कडे वळल्या. अनेकांच्या तर चक्क खिळल्या आहेत!

२०११ मध्ये ही कंपनी काय करत होती?...तर ‘पोंचो’ या नावाने मेक्सिकन पदार्थ खिलवत होती. अर्थात कंपनीने चवीच्या बळावर बाजारातील आपली हजेरी नोंदवलेली होतीच. खवय्यांना दखल घ्यायला भाग पाडलेच होते. पुढे वर्षभरातच म्हणजे २०१२ मध्ये कंपनीने आपल्या पदार्थांची यादी तर वाढवलीच वाढवली, त्यासह ‘बॉक्स8’ या नावाने जगासमोर स्वत:ला सादर केले. कंपनीचे सहसंस्थापक आणि आयआयटीचे पदवीधर अमित राज आणि अंशुल गुप्ता यांनी ही कंपनी प्रत्येक प्रकारच्या खाद्यशौकिनांसाठी सुरू केलेली होती. स्वादिष्ट पदार्थांच्या दुनियेचा मुकुटमणी बनणे, हे त्यांचे पहिले उद्दिष्ट होते.

image


‘बॉक्स8’ची सध्या मुंबईत २२ वितरण केंद्रे आहेत. गत १६ महिन्यांत दहापट व्यवसाय वाढलेला आहे. दररोज दोन हजारांहून अधिक जेवणांची ऑर्डर वेळेत पूर्ण केली जात आहे. कंपनीने आपले लक्ष मुख्यत्वे चव, नावीन्य, नेटकेपणा, टापटीप यावर केंद्रित केलेले आहे. चविष्ट जेवणाचा पर्याय म्हणून ‘बॉक्स 8’ला ग्राहकांमध्ये कमालीचा नावलौकिक मिळालेला आहे. कंपनीकडे जेवणाला येणारे ८० टक्के ग्राहक हे नेहमीचे आहेत, यावरून ही बाब प्रकर्षाने सिद्ध होते. वाजवी दरात ग्राहकाच्या पसंतीचे जेवण, हे आणखी एक वैशिष्ट्य ‘बॉक्स8’ चे आहे. इथे उपलब्ध भारतीय पदार्थांच्या बळावर अत्यंत कमी कालावधीत ‘बॉक्स8’ तरुणांची पहिली पसंती बनलेले आहे.

संलग्न सुविधा वाढवण्यासह उपलब्ध सुविधा अद्ययावत करण्यासह कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ तसेच स्वत:ला बाजारात खोलवर रुजवणे, या कामांसाठी नव्या गुंतवणुकीचा वापर करण्याचे कंपनीने ठरवलेले आहे. शिवाय नव्या अन्य शहरांतूनही ‘बॉक्स8’ ची दमदार पाउले पडावीत, हा कंपनीचा प्रयत्न असेल. सध्या कंपनीशी ३० हून अधिक आयआयटी पदवीधर एक टीम म्हणून जुळलेले आहेत. अन्य पार्श्वभूमींतून आलेल्या प्रतिभावंतांनाही लवकरच आपल्यासमवेत घेण्यास कंपनी उत्सुक आहे. आपल्या मोबाईल आणि वेब व्यासपीठाचा वापर करत असलेल्या ग्राहकांना अधिक सोयीचे व्हावे म्हणूनही काही खर्च कंपनी करणार आहे. सध्या ‘बॉक्स8’ ला निम्म्याहून जास्त ऑर्डर मोबाईल फोनच्या माध्यमातून मिळतात. प्रत्येक ग्राहकाला गरमागरम जेवण उपलब्ध होण्यात कॉल्सची एकिकृत प्रणाली उपयोगात आणली जाते.

image


अंशुल म्हणतात, ‘‘नुसता विचार करून चालत नाही. ठरवावे लागते आणि जे ठरवले त्याची अंमलबजावणी करावी लागते. या व्यवसायात तर हे अधिकच आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत काम तडीला जायलाच हवे, हेच लक्ष्य असलेली टीम तयार करण्याच्या तयारीत आम्ही सध्या आहोत.’’

अमित म्हणतात, ‘‘जेवण बनवताना आम्ही एकच गोष्ट लक्षात घेतो आणि ती म्हणजे आम्ही जेवायला बसलो तर आम्हाला काय काय आणि कसे कसे आवडेल. हे खरंच एक कठीण काम आहे. कितीतरी गोष्टी यात आहेत. एकतर हृदयापर्यंतचा रस्ता पोटाच्या माध्यमातून जातो. म्हणजे पोटाच्या माध्यमातून ग्राहकांच्या हृदयापर्यंत भिडायचे असते. रोज भिडायचे असते. आणि आम्ही असे रोज भिडत राहिलो तरच ग्राहकही आमच्याकडे रोज येत राहतील.’’

‘बॉक्स8’ने कितीतरी प्रकारच्या जेवणांचे मिश्रण करून एक ‘ऑल इन वन मिल बॉक्स’ तयार केला. हा बॉक्स या कंपनीची सध्या सर्वांत जास्त विकली जाणारी वस्तू आहे. ग्राहकाच्या व्यग्र दैनंदिन कामकाजाची पद्धत लक्षात घेऊन हा बॉक्स अशा पद्धतीच्या भारतीय पदार्थांनी भरलेला असतो, की त्याला खाण्यात कुठलीही अडचण येत नाही आणि मस्त पोटही भरते!

image


तोंडी लावायच्या पदार्थांत नेहमीच नावीन्य आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. उदाहरणार्थ सँडविच आणि अन्य पदार्थांना स्वादाचा एक विशेष भारतीय स्पर्श दिलेला असतो. आणि मग ही ठरतेच ‘बॉक्स8’च्या लज्जतीतली एक खासियत. कंपनीची शक्ती म्हणजे कंपनीची मजबूत टीम. आयटीसी आणि मेरिएट हॉटेलचे अनुभवी स्वयंपाकी (शेफ) या टीममध्ये आहेत.

मेफिल्डची गुंतवणूक होण्याआधी ‘ॲव्हेंडर कॅपिटल’चे कौशल अग्रवाल, ‘मुसिग्मा’चे आनंद राजाराम यांच्यासह ‘इंडियन अँजल नेटवर्क’कडूनही ‘बाँक्स८’ला आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले होते. व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी बराच काळ या मंडळींची मदत ‘बॉक्स8’ला झाली.

‘मेफिल्ड’चे निखिल खट्टू म्हणतात, ‘‘उत्पादन आणि प्रौद्योगिक क्षेत्राकडे पाहण्याचा ‘बॉक्स8 ’चा दृष्टिकोन अगदी नवा आहे. ‘बॉक्स8 ’चे संस्थापक तरुण आणि उत्साही आहेत. हुशार आहेत. मजबूत टीम म्हणून ते समोर आलेले आहेत. त्यांच्या जेवणात परंपरेसह नवता आहे. प्रयोगांच्या पातळीवर तर ते पहिले आहेत. एका वाक्यात सांगायचे तर या क्षेत्रातील अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या आताच ते फार पुढे निघून गेलेले आहेत.’’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags