संपादने
Marathi

मनोरंजनाबरोबरच फोटोकॉपीमधून नवनवे ट्रेंड सुरु करण्याचा प्रयत्न - निर्माती नेहा राजपाल

9th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

गायिका नेहा राजपाल निर्माती बनलीये, ही बातमी नाही. गेले वर्षभर याची चर्चा विविध चॅनल्स आणि सोशल नेटवर्किंग साईटसवरुन नेहा आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन टीमकडून जोरदार सुरु आहे. गेल्या वर्षी बरोब्बर सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी नेहानं एका सोशल साईटवर या सिनेमाचं डमी पोस्टर टाकले होते. आणि आता बरोबर वर्षानंतर गणेशोत्सवादरम्यान नेहा आणि तिच्या टीमने या सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च केलं. सोशल नेटवर्किंग साईटवरुन या पोस्टरला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहिला तर आपल्या या नव्या प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेली प्रेक्षकांमधील उत्सुकता नेहा आणि आकाश राजपाल टीमसाठी नक्कीच यशस्वी ठरतेय.

image


फोटोकॉपीच्या या अनोख्या पोस्टरबद्दल नेहा सांगते की, “कुठल्याही सिनेमाबद्दलची उत्सुकता त्याचे लूक अँड फिल हे त्याच्या पोस्टरवरुन लोकांपर्यंत पोहचतं शिवाय आमच्या सिनेमात कोणताही प्रसिद्ध ग्लॅमरस चेहरा नाहीये. तेव्हा हे पहिलं पोस्टर लॉन्च करताना काहीतरी धमाकेदार करणं आवश्यक होते. खुप विचारानंतर आम्ही ठरवलं की कलाकारांचे चेहरे नाही तरी त्यांचे लूक्स या पोस्टरवरुन उघड करायचे. या सिनेमासाठी कलाकार निवडताना आम्ही त्यांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या, शिवाय निवडलेल्या कलाकारांचे सिनेमा सुरु होण्याआधी लूक टेस्ट केली होती ते फोटोज आम्ही पाहिले आणि त्यातनं निवडून या तीन मुख्य व्यक्तिरेखांचे लूक्स पोस्टरवर टाकले.

image


यातही तुम्ही बघाल तर त्यांचे चेहरे खुप स्मार्टली कट केलेत. म्हणजे तुम्ही जेव्हा फोटोज स्कॅन करतात तेव्हा स्कॅनर एका कागदानंतर दुसऱ्या कागदावर न थांबता स्कॅनिंग करत राहतं तेव्हा जो इफेक्ट दिसतो तसा इफेक्ट आम्ही या पोस्टरवर त्यांचे चेहरे दडवताना दिलाय. शिवाय फोटोकॉपीचा फॉन्टही खुप आधुनिक आणि आत्तापर्यंत न वापरला गेलेला आहे. मराठी आणि इंग्रजी भाषा मिश्रित हा फॉन्ट आहे. कारण आमच्या सिनेमात आमचे तीनही कलाकार तरुण असल्यानं इंग्रजीमिश्रित मराठी बोलतायत अगदी आजच्या महाविद्यालयातल्यया तरुण तरुणींसारखं.”

फोटोकॉपीच्या संकल्पनेबद्दल नेहा सांगते, “ही कथा सुचली तेव्हाच नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळा सिनेमा बनवायचा असे मी आणि माझे पति आकाश राजपाल यांनी ठरवले होते. ही दोन जुळ्या बहिणींची कथा आहे, उच्चमध्यमवर्गीय घरातल्या या मुली लहानपणापासून एकत्र वाढल्यात, त्यांचे चेहरे एकसारखे असले तरी त्याच्या आवडीनिवडी, शिक्षण, त्यांचे वागणे, स्वभाव हे खुप वेगळे आहेत. अशा या दोघी बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडतात मग पुढे काय होते ते म्हणजे हा सिनेमा. यात जुळ्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री पर्ण पेठे दिसते, तर लव्हरबॉयच्या भूमिकेत नवा चेहरा चेतन चिटणीस दिसेल, याशिवाय अभिनेत्री वंदना गुप्तेही यात महत्वाची भूमिका साकारत आहेत.”

image


फोटोकॉपी हा सिनेमा संपूर्णपणे लवासामध्ये चित्रित झालाय. पूर्ण चित्रित होणारा लवासामधला हा पहिलाच सिनेमा आहे असे नेहा सांगते. “फोटोकॉपीच्या सुरुवातीपासूनच जे आत्तापर्यंत मराठी सिनेमात झाले नाही ते करण्याचा किंवा आणण्याचा आमचा प्रयत्न होता. ज्याची सुरुवात अर्थातच लोकेशन हंटींगपासून करण्यात आली होती लवासा हे नक्कीच या निकषांमध्ये परफेक्ट बसणारी जागा होती. आत्तापर्यंत सिनेमात न दिसलेल्या या जागेत चित्रिकरण करताना आम्हालाच निसर्गाची नवनवी रुपं दिसत होती जी यानिमित्ताने आमच्या सिनेमात प्रेक्षकांना पहायला मिळतील.”

याबरोबरच सिनेमातल्या पोशाखांसाठी आम्ही सध्याचा आघाडीचा आणि घराघरातला ब्रँड म्हणजेच एफबीबीशी टाय अप केल्याचं नेहाने सांगितलं. “फॅशन बिग बाझार हा तेवढाच ट्रेंडी, फॅशनेबल पण महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारा असा कपडयांचा ब्रँड मानला जातो. फोटोकॉपी सिनेमा ही एक कौटुंबिक कथा असली तरी यात कॉलेज, कॉलेज कट्टा, पार्टीज, कॉपी शॉप्स सारखे आजच्या तरुणांशी संबंधित गोष्टी दिसतात ज्याला अनुरुप असे कपडे एफबीबीमध्ये आम्हाला मिळाले, सिनेमा रिलीज झाला की या निमित्ताने फोटोकॉपीचं स्वतःचं कलेक्शनही आम्हाला लॉन्च करता येईल.

image


म़ॉन्जिनीज् हा आणखी एक ब्रँड फोटोकॉपीमध्ये दिसेल. प्रेक्षकांना आवडेल, भावेल असा सिनेमा बनवताना तो नावीन्यपूर्ण आणि ट्रेंड सेटर असावा हाही आमचा प्रयत्न होता.” फोटोकॉपीमधून असाच कॉर्पोरेट ब्रँडिंगचा ट्रेंड आम्ही सुरु केल्याचं नेहा सांगते.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags