संपादने
Marathi

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ९ हजार ८९४ घरांना मंजूरी

Team YS Marathi
29th Aug 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरीविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) महाराष्ट्राला ९ हजार ८९४ परवडणारी घरे मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूरीसह महाराष्ट्राला एकूण १ लाख ४४ हजार १६५ घरे मंजूर करण्यात आली. यासाठी केंद्राकडून दोन हजार २२४ कोटीं रूपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्याव्यतिरीक्त १५ हजार ८६८ कोटी रूपयांच्या गुंतवणूकीस मंजूरी देण्यात आली आहे.


image


२० नोव्हेंबर २०१६ ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत सर्वांसाठी परवडणारे घरे बांधली जाणार आहेत. या योजनेचे ग्रामीण आणि शहरी असे दोन गट करण्यात आले. 


image


केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरीविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड या १० या राज्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या १० राज्यांसाठी एकूण २६ लाख १३ हजार ५६८ घरे मंजूर केलेली आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून एकूण ४० हजार ५९७ कोटींची आर्थिक सहाय्यतेला मंजूरी मिळाली आहे, तर १ लाख ३९ हजार ६१२ कोटी रूपयांच्या निधी गुतंवणूकीसही मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags