संपादने
Marathi

'कबाली'च्या निर्मात्यांना आहे पाचशे कोटीपेक्षा जास्त नव्या व्यावसायिक विक्रमाची खात्री! एअरएशिया सोबत अनोखे ब्रॅण्डिंग!!

Team YS Marathi
3rd Jul 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कबालीचे जोरदार ब्रँण्डिंग; एअर एशिया विमानासह कबाली सिनेमा, आणि त्याचे निर्माते कलाईपुली थानू म्हणतात, ‘कबाली बॉक्स ऑफिस गाजविणार आणि पाचशे कोटी रुपयांची कमाई करताना सर्व विक्रम मोडीत काढणार.’

त्यांची वाट पहात मला केबिनमध्ये बसण्यास सांगण्यात आले आणि मी ती सुंदर चित्र पहात होतो. कबाली आका रजनी यांचे पुतळे वेगवेगळ्या परिधानातील त्यांच्या टेबलवर ठेवलेले होते आणि त्याबाबत विचारणा केली असता त्यांच्या माणसाने मला सांगितले की ते सुध्दा सिनेमाच्या प्रसिध्दीचा भाग आहेत आणि लवकरच ऍमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. आता मला समजले की स्वत:च्या उद्योगासाठी झोकून देण्याची कोणत्या प्रकारची वृत्ती त्यांच्यात आहे, आणि विक्री आणि बाजारपेठेबाबतचे त्यांचे अमर्याद प्रयत्न ज्यांनी त्यांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले आहे. सिने उद्योगात वितरक म्हणून पाऊल टाकत, दिग्दर्शक आणि नंतर कॉलीवुडमध्ये तीस वर्षांपेक्षा जास्त काळ निर्माता, त्यांचे बहुतांश सिनेमे गाजले. होय, मी त्याच माणसाबाबत सांगतेय ज्याने रजनीकांत यांच्यासोबत बहुप्रतिक्षित सामाजिक सिनेमा 'कबाली' केला आहे जो जुलै महिन्यात सिनेगृहात झळकेल. कबालीच्या टिझरने वीस लाख व्हय़ुजमधून सारे विक्रम मागे टाकले आहेत आणि ऑडिओ हक्क थिंक म्युझीक इंडियाने घेतले आहेत. कबालीचे निर्माता कलाईपुली थानू यांनी त्यांच्या काही व्यावसायिक रहस्यांची चर्चा युअर स्टोरी सोबत केली आहे.

image


बालपणापासून मी एक ‘खूप कृतीशिल’ व्यक्ती आहे, थानू यांनी बोलण्यास सुरुवात केली ज्यांनी त्यांच्या शालेय जीवनात संगीतासाठी भाषणांसाठी आणि अनेक स्पर्धांसाठी बक्षीसे मिळवली. त्यांच्या सिनेमा प्रेमाने कलेची गोडी लावली आणि त्यातूनच तमिळ सिनेसृष्टीत लहान वयातच त्यांचा वितरक म्हणून प्रवेश झाला आणि चांगली पत निर्माण करत त्यांनी त्यात वाटचाल केली.

सुरुवातीच्या त्या दिवसांबाबत थानू सांगतात, “ मी सिनेमासाठी गाणी लिहिली, प्रसिध्द सिनेमांना आकर्षक नावे दिली, पटकथासुध्दा लिहिली, संवाद आणि संहिता देखील काही सिनेमांना दिली. १९७८मध्ये मी वितरक होतो त्यावेळी भैरवी सिनेमा झळकला त्यावेळी रजनीकांत यांच्या छबी झळकवण्याचे माझ्या मनावर खोल प्रभाव झाले, आणि त्यांच्या भित्तीपत्रकांवर मी सुपरस्टार असे लिहून ती शहरभर झळकावली.”

image


त्यांच्या नव्या धोरणांबाबत आणि कल्पनांबाबत बोलताना थानू म्हणाले की, “ जेंव्हा मी सिनेमात सहभागी असतो त्यावेळी त्याचाच विचार करत असतो, आणि मी परिणामकारक गोष्टी निर्माण करण्यास सुरुवात करतो ज्या लोकांच्या मनात घोळत राहतील आणि त्यांना सिनेमा पाहण्यास प्रवृत्त करतील. जाहिराती आणि वितरणाला माझ्या उद्योगात खूप महत्वाचे स्थान आहे. माझ्यात असलेल्या कृतीशील गोष्टी आणि ज्या पध्दतीने त्या मी करतो त्या मागे नियोजनबध्दता असतेच मात्र ती उपलब्ध आर्थिक शक्ती पाहून करावी लागतात ज्यातून मोठा प्रभाव पडतो.

तीस वर्षापासून सिनेजगताचा आधारस्तंभ असलेल्या थानू यांनी वाटचाल करताना आलेल्या आव्हानांबाबत सांगितले की, “ सध्या माझ्या सिनेमा समोरचे आव्हान हे आहे की तो एकाचवेळी प्रदर्शित होत आहे त्यामुळे त्यावर विचार करावा लागतो की तो कसा उभा करता येईल. माझा मुख्य कटाक्ष हा आहे की, या उद्योगात असलेल्या सगळ्यांना तोटा होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतो की क्रांतीकारक पध्दतीने माझ्या जाहिराती करताना सगळ्यांना सिनेमाचा फायदा कसा होईल ते पाहतो.”

image


अधिकाधिक सिनेमे करण्याच्या आपल्या प्रेरणांबाबत ते म्हणाले की, मी वितरक म्हणून कारकिर्द सुरू केली, या उद्योगातील सुक्ष्मभेद ओळखले ज्यातून मला फायदा होईल आणि निर्मितीच्या क्षेत्रात आलो आणि स्वत:चा दर्जा टिकवून आहे. नव्याने या उद्योगात येऊ पाहणाऱ्याना त्यांनी सल्ला दिला की आधीच या उद्योगातील बारकावे जाणून घ्या.

मी त्यांना यशाचे रहस्य काय? विचारले, आणि ते म्हणाले, “मी सकाळी सहाला उठतो आणि माझ्या दैनंदिन कामाला सुरुवात करतो आणि सारी शक्ती फक्त माझ्या कामात लावतो त्यावेळी त्यात मी हरवून जातो. माझ्या सा-या क्षमता त्यात झोकून देतो आणि रात्री एक वाजेपर्यंत काम करतो.

कांडुकोडियनच्या निर्मितीमधील ब्रँण्डिंग आणि प्रचारावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी राजीव मेनन यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात एेश्वर्या राय यांच्यासह अनेक कलाकार होते. त्यांनी फेअर ऍण्ड लवली सोबत करार केला आणि त्यांनीच नाव त्यांच्या टॅगलाइन प्रमाणे निश्चित केले. ‘ हे तेच रहस्य आहे की, मी ब्रँण्डींग लक्षात घेऊन माझ्या सिनेमाला त्या पध्दतीने साकारतो’. ते म्हणाले.

image


खूपवेळ वाट पाहून मी माझ्या महत्वाच्या मुद्द्याला हात घातला, ‘कबाली’ आणि या भव्य दिव्य सिनेमाबाबतच्या अनुभवाकडे ते उद्योगाच्या नजरेतून कसे बघतात.

रजनी यांच्यासोबत थानू यांची मैत्री ३५ वर्षांपासूनची आहे त्यामुळे त्यांची नकळत दोघांची खास शैली तयार झाली आहे जिला नाळ जुळली आहे असे म्हणता येईल. थानू यांनीच सुपरस्टारच्या अलिकडच्या सिनेमाची निर्मिती केली असती पण ते सारे काही कारणांनी होता होता राहिले, ते म्हणाले. पण खूपच संयत आणि शांत थानू यांनी इतर सिनेमासाठी काम केले आणि आजही त्यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. थलाईवरसाठी केवळ एक दिवसांचा अवधी होता. त्याचवेळी रजनी यांनी त्यांना बोलावले आणि त्यांच्या निर्मितीच्या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कबाली जन्माला आला. कबालीचा टिझर आणि दोनशे कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करू शकतो या शक्यतेबाबत बोलताना थानू म्हणाले की, “ सिनेमाची ब्रँण्डिंग पूर्णत: त्याच्या सुरुवातीवर अवलंबून असते आणि अर्थात तुम्ही कोणत्या वेगळ्या कल्पना घेऊन येता ज्यातून प्रभावी प्रचार करता येऊ शकतो आणि हे सारे जेंव्हा सिनेमात सुपरस्टार असेल त्यावेळी सहजपणे घडते.”

इतिहासात प्रथमच, एअर आशियाने कबालीसाठी अधिकृत एअरलाईन भागिदार म्हणून करार केला आहे आणि विमान प्रवासात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवा मेन्यू जाहीर केला आहे आणि सिनेमात देखील देण्यास मान्य केले आहे. “ सुपरस्टार सारखे उड्डाण करा” ही ऑफर देत ७८६रुपयांत बंगळूरू ते नवी दिल्ली असा देशांतर्गत प्रवास करण्याची सुविधा एअर एशिया इंडियाने दिली आहे.

भारतीय सिनेमातील रजनीकांत यांच्या असामान्य कामगिरीचा सन्मान म्हणून एअर एशियाने ही खास सवलत त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. त्यासाठी या वर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमा कबालीसाठी एअर एशियाने आपल्या सा-या नव्या विमानांना सेवेसाठी सज्ज कले आहे.

कबाली सिनेमात रजनी यांच्या सुपरस्टार प्रतिमेला साजेश्या सजावटीने ही विमाने नटली आहेत. ही विमाने एअर एशियाच्या भारतीय नेटवर्कमधील बंगळुरू, नवी दिल्ली, गोवा, पुणे, चंदीगड, जयपूर, गुवाहाटी, इंफाळ, विझाग आणि कोची या ठिकाणी उपलब्ध असतील. हा प्रयोग इथेच संपत नाही! रजनीकांत यांच्या भूमिका असलेल्या कबाली सिनेमाचे अधिकृत एअरलाईन भागीदार म्हणून चाहत्यांना बंगळुरू ते चेन्नई असा प्रवास करून त्यांचा सिनेमा पाहता येईल. आय५ (i5) ने त्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था बंगळूर ते चेन्नई अशी केली आहे कबाली प्रदर्शित होईल त्या पहिल्या दिवशी! ज्या चाहत्यांना या विशेष विमानाने जायचे असेल त्यांनी ९१ ८० ४१ १५८४९२/८४९३ या क्रमांकावरून नोंदणी आणि तपशिल जाणून घ्यावा.

“हे नव्या प्रकारचे प्रमोशन असेल जे कधीही कुणीही कुठेही केले नाही.” निर्माते सांगतात.

मिडियातून दोनशे कोटींचा व्यवसाय होणार अशा बातम्या आताच आल्याने थानू म्हणतात, “ व्यवसाय नुकताच सुरू झाला आहे. आम्ही या चित्रपटाचे हक्क अमेरिकेला अविश्वसनिय अश्या ८.५ कोटींना विकले आहेत आणि ऑस्ट्रेलियाला ६५ कोटींना आणि आणखी देश तसेच राज्यांशी चर्चा सुरू आहेत. आणि माझे बॉक्स ऑफिस वर कबालीचे लक्ष्य आहे पाचशे कोटींचे. . . ते म्हणाले. जेंव्हा रजनीकांत यांचा सिनेमा आहे आणि तो अपेक्षेपेक्षा छान झाला आहे. कबाली लक्ष्य गाठेल अणि पुन्हा सारे विक्रम मोडेल हीच माझी इच्छा आहे.” ते म्हणाले.

संभाषणाच्या अंती जाता जाता त्यांनी नवोदीत सिनेव्यावसायिकांना सल्ला दिला की, “ ज्यांना कुणाला या व्यवसायात यायचे असेल त्यांनी आधी याचे स्वरुप समजून घ्या आणि शिका, त्यानंतर त्यांच्या मागे लागा. केवळ पैश्याने या उद्योगात यश मिळवता येत नाही, तर मेहनत आणि बांधिलकी असेल तरच नुकसान टाळता येते”

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

जातीवंत ‘सैराट’ कलाविष्कार साकारणा-या नागराज यांच्या कामगिरीची 'फोर्ब्स'नेही घेतली दखल

वाजीद खान – विश्वविक्रमांना गवसणी घालणारा प्रयोगशील कलाकार

नटसम्राट सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर येणं ही स्वप्नपूर्ती..- दिग्दर्शक महेश मांजरेकर

लेखिका : इंदुजा रघुनाथन -संपादक, तामिळ, युअर स्टोरी.

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags