संपादने
Marathi

जितक्या वेळात मॅगी तयार होते त्यापेक्षा कमी वेळात किर्ती जैन गरजूंना कोणत्याही तारण आणि हमीदारांशिवाय कर्ज देतात

घटनाक्रम सन २०००चा आहे. किर्ती जैन पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या ‘बॅचलर ऑफ इंजिनिअरीग’ च्या अभ्यासाचे हे अखेरचे वर्ष होते. किर्ती यांचे मन उत्साही आणि आशावान होते त्यांनी नवीन आणि सुंदर स्वप्न पाहिली होती. त्यांना विश्वास होता की अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच छान नोकरी मिळेल आणि आपल्या आयुष्याला सावरता येईल परंतू त्याचवर्षी त्यांच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. तब्येत इतकी बिघडली की ते अंथरुणाला खिळले. वडिलांचा छोटासा व्यवसाय होता तो देखील बंद झाला. त्याचवर्षी किर्ती यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचे नियोजन होते. लग्नाची तारीखसुध्दा नक्की झाली होती, पण वडील आजारी पडले आणि कुटूंबावर संकटांचा डोंगरच कोसळला होता. वडिलांचे आजारपण, बहिनीच्या लग्नाची चिंता आणि स्वत:च्या शिक्षणाचा बोजा याने किर्ती तणावग्रस्त झाले आणि घाबरले. अशावेळी त्यांना सर्वात चकीत करणारी गोष्ट म्हणजे वाईट काळ आला तेंव्हा सारे सगेसंबंधी नातेवाईक परागंदा झाले. किर्ती सांगतात की, “ त्यावेळी मी अनुभवले की काळ वाईट असला की चांगल्या काळात आजुबाजूला असणारे सारे दूर जातात. अशावेळी आपण हजार रुपये जरी कुणाला मागितले तरी कुणी देत नाही.” संकटातून बाहेर पडण्यासाठी किर्तीच्या आई-वडिलांना कर्ज घ्यावे लागले. ही तीच वेळ होती ज्यावेळी किर्ती यांना समजले की गरजूंना कर्जासाठी किती अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना हे देखील समजले की अशावेळी कर्ज घेणा-यांना किती अपमान सहन करावे लागतात. काही सावकार या विवशतेचा गैरफायदा घेऊन अवाजवी व्याजही उकळतात. बँकेच्या कर्जालाही इतका उशीर लागतो की गरजवंताच्या समस्या आणखी वाढू शकतात. कागदपत्रात इतका वेळ जातो की बाहेरून सावकारी कर्ज घेणेच भल्याचे वाटू लागते. संकटांच्या त्या दिवसांत किर्ती यांनी बरेच काही अनुभवले. ते या संकटाना तोंड देताना हा विचार करू लागले होते की, तंत्रज्ञानाच्या मदतीने वाईट काळात कुणाला त्याचे सोने गहाण ठेवायला लागू नये यासाठी काय करता येईल, त्याला आपली इभ्रत पणाला लावायला लागू नये, त्याला कुणाच्या समोर हात पसरून भिक मागायला लागू नये किंवा वाईट स्थितीतून बाहेर पडण्यासाठी घर विकावे लागू नये. सहजपणाने कर्ज देणा-या उपायांना शोधण्यात किर्ती यांचे मन बुडून गेले. त्याच दरम्यान त्यांनी असे उत्पादन बाजारात आणण्याचे ठरविले की, ज्याच्या माध्यमातून वाईट काळात लोकांना आर्थिक मदत मिळू शकेल. जीवनाच्या वाईट काळातच किर्ती जैन यांनी असा संकल्प केला की ते पुढे जाऊन लोकांना त्यांच्या गरजांसाठी सहजपणे कर्ज उपलब्ध करून देतील. संकल्प केल्यानंतर १४वर्षात किर्ती जैन यशस्वी झाले. या चौदा वर्षात किर्ती यांनी आयसीआयसी आय, येस बँक आणि नागार्जुना कंस्ट्रक्शन कंपनी सारख्या संस्थांसोबत काम करून पैसा आणि प्रतिष्ठा मिळवली. अखेर फेब्रुवारी २०१४मध्ये किर्ती नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये काम करत होते तेंव्हा त्यांना असे वाटले की संकल्प पूर्ण करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

2nd Aug 2016
Add to
Shares
9
Comments
Share This
Add to
Shares
9
Comments
Share

२०१४मध्य‍े आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या कीर्ती जैन इतके सक्षम झाले होते की, त्यांनी उद्यमी होताना येणा-या जोखीम पेलण्याची तयारी केली होती. आवश्यक पुंजी जमा होताच त्यांनी उद्यमाची सुरूवात केली आणि गरजूंना कमी व्याजावर, कमी वेळात, कोणत्याही प्रकारच्या कटकटीशिवाय कर्ज देण्यास सुरुवात केली. हैद्राबादच्या किर्ती यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये 'एनीटाईम लोन' सेवा सुरू केली. त्यांनी 'वोट फॉर कँश डॉट इन' ची सुरुवात करत जगातील ऑनलाईन पहिले व्यासपीठ तयार केले जेथे कोणत्याही कागदपत्रे, तारण जामीन किंवा सत्यापनाशिवाय कुणीही कर्ज घेऊ शकत होता. एका गोष्टीचा विशेष विचार केला जातो की कोणत्याही स्थितीत कर्जासाठी अर्ज करताना कुणाही व्यक्तीला अपमानीत व्हावे लागू नये. या शिवाय किर्ती जैन ‘ एसएमइबँक डॉट इन च्या माध्यमातून गरजवंत व्यक्तींना ३० हजार पासून ३० लाख पर्यंतचे कर्ज देत आहेत. जेणे करून उद्यमी होण्याचे त्यांचेही स्वप्न पूर्ण व्हावे. मोठी गोष्ट ही आहे की, वोट फॉर कॅश डॉट इन पीअर टू पीअरच्या क्षेत्रातील देशातील क्रमांक एकची कंपनी आहे. किर्ती यांची ही कंपनी आज एक हजार रुपयांपासून तीस लाख रूपयांपर्यत कर्ज देते. कर्ज देण्यासाठी किर्ती यांची कंपनी प्रिडिक्टिव सायन्स च्या एका खास टुल बिम्सचा वापर करते. कर्जासाठी अर्ज देणा-या व्यक्तीची मनोवृत्ती समजण्यासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्सच्या तंत्राचाही वापर केला जातो. किर्ती सांगतात की, “ या तंत्राच्या मदतीने छायाचित्र पाहून हे माहिती होऊ शकते की कर्जाचा अर्ज देणारी व्यक्ती जाणिवपूर्वक कर्ज बुडवेल की नाही.” इतकेच नाही किर्ती यांचा दावा आहे की, त्यांची कंपनी केवळ दोन मिनिटांत कर्ज देते. मात्र अर्जदाराने सारे मापदंड पूर्ण करावेत. सर्वात महत्वाची बाब ही आहे की अर्जदाराला कर्ज घेताना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही.

image


किर्ती यांच्या कंपनीची एक नाही अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कंपनी केवळ कर्ज देत नाही तर जर कुणाला हवी असेल तर त्यांच्या कंपनीत गुंतवणूक देखील करता येते, त्यासाठी इच्छुकांना वीस हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे गुंतविता येतात. किर्ती यांचा दावा आहे की लोकांना त्यांच्याकडे साडेसहा कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गुंतवणूकदारांना विचार करण्याची, जाणून घेण्याची किंवा समजण्याची गरज नाही की कर्जदारांची पार्श्वभूमी काय आहे? कर्ज घेणारे ते परत करतील किंवा नाही? याप्रकारचे सारे प्रश्न सांभाळण्याची जबाबदारी कंपनी स्वत: सांभाळते.

कंपनी तीन प्रकारची कर्ज देते. व्यक्तिगत कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, तसेच सुक्ष्म आणि मध्यम प्रकारच्या उद्योगांसाठी कर्ज ही देशातील पहिलीच कंपनी आहे जी उच्च शिक्षणाऐवजी प्राथमिक शिक्षणासाठी कर्ज देते. किर्ती जैन सांगतात की, “ देशातील कोणत्याही संस्थेत केजी ते दहावी पर्यंत कर्ज दिले जात नाही. वस्तुस्थिती मात्र अशी अहे की शाळेच्या शुल्कात इतकी वाढ झाली आहे की,अनेकांना त्यासाठी कर्ज घ्यावी लागतात. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लोकांना चिंता राहू नये यासाठी आम्ही शाळेच्या शुल्कासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली.” लोकांना कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणारे किर्ती जैन अनेक वर्ष नोकरी करून उद्यमी झाले आहेत. हे त्यांच्या महाविद्यालयीन काळापासूनचे स्वप्न होते, पण निधी अभावी त्यांना ते पूर्ण करता आले नाही. सुमारे चौदा वर्षे नोकरी केल्यावर जेंव्हा ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले त्यावेळी त्यांनी आपली कंपनी सुरू केली आणि उद्यमी बनले. त्यासाठी असलेल्या सा-या अडचणी आणि जबाबदा-या ते चांगल्या प्रकारे समजतात. हेच कारण आहे की त्यांनी उद्यमीना चालना देण्यात कोणतीच कमी ठेवली नाही. ते मध्यम आणि लघु उद्यमींना खूपच कमी व्याजात कर्ज देतात आणि ते सुध्दा कोणत्याही सुरक्षेशिवाय हमीदारांशिवाय आणि कोणत्याही अटी न घालता एसएमई कर्ज देतात. किर्ती यांनी सांगितले की त्यांची कंपनी ०.०५च्या व्याजदराने कर्ज देते. त्यांचा दावा आहे की बाजारातील ते सर्वात स्वस्त कर्ज आहे.

image


किेर्ती यांनी हैद्राबादमधून आपल्या उद्योगाची सुरुवात केली आणि कमी वेळात मोठे यश मिळवले. त्यांच्या यशाचा अंदाज यावरून सहज घेता येतो की, वोट फॉर कॅश डॉट इनने गेल्या १९ महिन्यात २०हजार जणांना ३४ कोटी रुपयांची कर्ज दिली आहेत. महत्वाचे हे सुध्दा आहे की यासाठी त्यांना कोणतेही मार्केटिंग करावे लागले नाही, केवळ मौखीक प्रचार केला. त्यांच्याकडे कर्ज घेणारे इंतरांना आपला अनुभव सांगतात आणि नवे ग्राहक येत राहतात. त्यातून त्यांना लोकप्रियता मिळत राहिली आहे. किर्ती यांच्या कंपनीची इतकी ख्याती झाली आहे की सध्या प्रत्येक महिन्यात ते तीन कोटी रुपयाची कर्ज देत आहेत. भविष्याच्या योजनांबाबत सांगताना ते म्हणतात की, सध्या आम्ही महिन्याला तीन कोटीची कर्जे देतो आणि भविष्यात हा आकडा हजार कोटी करण्याची अपेक्षा आहे. याशिवाय आमचा विचार आहे की वोट फॉर कॅश डॉट इनला देशातील सर्वात अभिनव गतीमान आणि स्वस्त कर्ज देणारी कंपनी बनवायचे आहे.”


image


किर्ती सांगतात की, येणा-या जानेवारी २०१७पासून गरजूंचा अर्ज आला की लगेच कर्ज देणारी योजना सुरु करायची आहे. याचा अर्थ असा की जानेवारी २०१७नंतर त्याच्याकडे कर्ज देण्यास दोन मिनिटे वेळही लागणार नाही. तात्काळ कर्ज मिळेल. या तरूण उद्योजकाच्या स्वपनांना बळ देण्यात टि हबची देखील मोठी भूमिका आहे. त्यांच्या मदतीने किर्ती जैन नवीन योजना साकारत आहेत. यामध्ये आता संशय नाही की आपल्या या स्टार्टअपच्या माध्यमातून किर्ती यांनी देशभरात खूपच नाव मिळवले आहे. त्याच्या एका संकल्पाने त्यांना विचार करण्यास भाग पाडले की त्यातून ते अभिनव पध्दतीचे उद्यमी झाले. मेहनत ,प्रामाणिकपणा आणि गरजूंना मदत करण्याची तीव्र इच्छा यातून त्यांना हे यश मिळवता आले.अडचणीच्या काळात पैसा मिळवण्याच्या प्रयत्नातून हताश लोकांना कर्ज देणारे किर्ती त्यांच्यासाठी देवदूत बनले आहेत. आपल्या अनोख्या कल्पनांचे विक्रम साकारणे त्यांच्यासाठी आता नवे राहिले नाही. एका अर्थाने ते विक्रम वीर झाले आहेत. नोकरीची सुरुवात करतानाच त्यांनी हे विक्रम करण्यास सुरुवात केली. पुण्यात के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असल्यापासून त्यांच्यात या अभिनव उद्यमाची बीजे रुजत गेलीं. त्यातील बारकावे त्यांना शिकायचे होते. त्यासाठी त्यांनी कॅटच्या परिक्षेची तयारी सुरु केली. परंतू त्यांच्या कामगिरीनुसार आय आय एम कोझीकोड येथे प्रवेश मिळाला तेथे त्यांनी उद्यमातील बारकावे समजुन घेतले. येथे शिकताना त्यांना देशाच्या यशस्वी उद्योजकांचा अभ्यास करता आला.

किर्ती यांनी आयसीआयसीआय बँकेतून आपल्या नोकरीची सुरुवात केली होती. तेथे साडेतीन वर्ष नोकरी करताना त्यांनी १७ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते, त्यामुळे इतर कुणा कर्मचा-याला जे शक्य नव्हते अशा गोष्टी त्यांनी मिळवल्या होत्या. बँकेच्या कार्यकाळात त्यांनी अनेक अभिनव निर्णय घेतले आणि ते यशस्वीपणे राबविले. त्यातून बँकेच्या मालमत्ता व्यवस्थापनाला नवे मापदंड मिळाले. केवळ १७ पुरस्कार मिळवून किर्ती थांबले नाहीत तर त्यांचे नाव गिनीज बुक मध्येदेखील नोंद झाले. २७मार्च २०१५रोजी त्यांनी ७.९३ कोटी रुपयांच्या विमा पॉलिसी केल्या आणि जागतिक विक्रम स्थापित केला.

image


आयसीआयसीआय बँकेनंतर त्यांनी येस बँकेत नोकरी केली. तेथेही त्यांच्या नावे नवे ‘किर्तीमान’ करण्यात ते यशस्वी झाले. हैद्राबाद मध्ये ते येस बँकेचे पहिले कर्मचारी होते. त्यांच्याच प्रयत्नातून भारतात प्रथमच रिवर्स बँकिंगची सुरुवात झाली त्याचे श्रेय येस बँकेला मिळाले. येस बँकेत त्यांनी एटीएम आणि किरकोळ बँकींगची सुरुवात केली. किर्ती यांची कामगिरी पाहून येस बँकेने त्यांना दक्षिण आणि पश्चिम विभागात प्रभारीपद बहाल केले. मग किर्ती यांनी त्यांच्या पध्दतीने बँकेचा या क्षेत्रात विस्तार केला. तीन वर्ष तीन महिने काम करुन त्यांनी बँकेला रामराम केला.

बँकींग क्षेत्रात विक्रमांची धमाल केल्यावर किर्ती यांनी कंस्ट्रक्शन क्षेत्रात पाऊल टाकले. हैद्राबाद येथील नागार्जुन कंस्ट्रक्शन कंपनीत त्यांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन त्यावेळी केले जेंव्हा त्यांना रांची येथील क्रीडाग्रामचे काम देण्यात आले. क्रीडाग्राम तयार करताना त्यांनी देशातील बांधकाम व्यवसायाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. यासाठी योजना होती, ‘घर खरेदी करा आणि पहिल्याच महिन्यात भाडे मिळवा’ झारखंडच्या राजधानीत राष्ट्रीय खेळांसाठी क्रीडाग्राम तयार करण्यात येत होते. त्यामुळे खेळाडू आणि कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्था तयार करण्यात येत होती. मात्र काही कारणाने राष्ट्रीय स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. क्रीडाग्राम ही योजना केवळ देशाची नाही तर आशियातील खाजगी भागीदारीतून तयार करण्यात येत होती. त्यामध्ये घरे तयार झाली होती. मात्र स्पर्धा स्थगित झाल्याने ती घरे बनविणा-या नागार्जुन कंपनीला नुकसान होणार होते. घरे रिकामी पडली होती आणि स्पर्धा संपल्यावर ती विकली जाणार होती. त्यासाठी कंपनीने कर्ज घेतली होती.

image


स्पर्धा झाल्या नाहीत त्यामुळे घरे विकली जात नव्हती आणि कंपनीला कर्ज झाले होते. त्यातुन नुकसान वाढत जात होते. त्यातून बाहेर येण्याची जबाबदारी किर्ती यांना देण्यात आली. मग किर्ती यांनी आपल्या बुध्दीतून अभिनव योजना आणली. कंपनीनेही त्याला मंजूरी दिली. क्रीडाग्राम मधील घरे खरदेी करणा-यांना घरे मिळाली नाहीत पण पहिल्याच महिन्यापासून भाडे मिळू लागले. घरे घेणा-यांशी हा करार करण्यात आला की स्पर्धा पूर्ण झाल्या की, त्यांना घरे ताब्यात मिळतील तोपर्यंत भाडे मिऴत राहिल. या योजनेला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि सारी घरे विकली गेली. किर्ती यांच्या योजनेमुळे कंपनीचे मोठे नुकसान टळले. अशा पध्दतीने त्यांनी आपल्या बुध्दीची चमक या क्षेत्रातही दाखविली.

२०१४मध्ये कीर्ती यांनी उद्यमिता स्वीकारली. स्टार्टअपच्या दुनियेत त्यांनी आपली बुध्दीमत्ता कामी आणली. जितकी अनोखी त्यांची बुध्दीमत्ता आहे, तितकेच त्या़चे जीवनानुभव वेगळे आहेत. लहानपणी ते शिक्षणात सुमार होते मात्र अतिरिक्त बाबीवर त्यांचा नेहमी ओढा असे. अभिनय गायन इत्यादी त्यांना आवडे. मात्र वडिलांनी त्यांना बहिणीच्या नेहमी अव्वल असलेल्या कामगिरीबाबात जाणिव दिली त्यांना सुवर्ण पदक मिळत होते, तसेच मुलानेही केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. मात्र त्यानंतर त्यांनी निश्चय केला आणि अव्वल विद्यार्थी म्हणून नाव मिळवले.

टि हब मध्ये झालेल्या भेटीत किर्ती म्हणाले की, त्यांच्या डोक्यात अनेक कल्पना आहेत. मात्र सध्या त्या त्यांच्या मनातच आहेत. पुढील दहा वर्ष त्यांना त्यासाठी वेळ मिळणार नाही कारण सध्याच्या योजना त्यांना पूर्ण करायच्या आहेत. त्यांच्या पत्नी सनदी लेखापाल आहेत त्यामुळेच ते सारी आर्थिक जोखमीची कामे करण्याच्या स्थितीत आहेत. त्यांन दोन मुले आहेत मोठा मुलगा तिसरीत आहे तर छोटा अजून बालवाडीत आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

लहानपणी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करणारे करुणाकर रेड्डी आज ७५ लाख लोकांना उपलब्ध करून देत आहे शुद्ध पिण्याचे पाणी

ऑपरेशन थिएटरच्या प्रकाशात मेंदूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रंगनाथम कंदिलाच्या प्रकाशात करत होते अभ्यास

भारताचे नाव जागतिक पटलावर नेणाऱ्या वरप्रसाद रेड्डी यांची प्रेरणादायक कहाणी

Add to
Shares
9
Comments
Share This
Add to
Shares
9
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

    Latest Stories

    आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा