संपादने
Marathi

दार्जिलिंगचा पायथा ते केनिया, एकोम माणिकला सापडलेली स्टार्टअपची अनोखी कल्पना !

Team YS Marathi
2nd Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
" आपण आपल्या हृदयाचं नेहमी का ऐकावं ? " मुलानं विचारलं !
" कारण जिथे कुठे तुमचं हृदय असेल, तिथेच तुम्हाला तुमचा खजिना मिळेल,"
- पावलो कोएलो - द अल्केमिस्ट

एकोमच्या आयुष्यानं एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण केलं. दार्जीलिंगच्या चहाच्या मळ्यात सुरु झालेला तिचा प्रवास तिला पुन्हा त्याच जागी घेऊन आला आणि अशा एका गोष्टीची तिला जाणीव करून दिली की जी गोष्ट तिला अगदी तोंडपाठ होती पण त्याचं महत्त्व मात्र ठाऊक नव्हतं.

image


दार्जिलिंगच्या पायथ्याशी असलेल्या गावात तिचा जन्म झाला. लहानाची मोठीही ती तिथेच झाली. आयुष्याचा अर्थ शोधण्याच्या तिच्या प्रवासात तिला मोरिंगा सापडलं. आणि आता एका छोट्या प्रेस युनिटची मालकीण असणारी एकोम 'मोरिंगव्हॉट ' याबद्दल जगाला शिकवते आहे.

तिची कहाणी

पर्वताची बेटी :

२७ वर्षांच्या या उद्योजिकेचं लहानपण गेलं ते या दार्जीलिंगच्या पायथ्यावर आणि उर्वरित तामिळनाडूमधल्या उटकमंड इथल्या लवडेल शाळेत आणि बोर्डिंग मध्ये. ९ वर्षांची असताना ती या शाळेत आली. लहानपणीच्या आठवणी सांगताना ती म्हणते ," बालपण म्हणजे नुसती धमाल! या आठवणीचा मी सौदा करणं अशक्य आहे . सायकल घेऊन नुसतं निरर्थक भटकणं, भटकता चित्ता किंवा चालणारा हत्ती अशा नावाच्या जागेवर काहीही खेळ खेळणं, दूरवर पसरलेलं विस्तीर्ण kक्षितीज, विविध पशु प्राणी आणि फुलांचे ताटवे या जागेवर कुणीही प्रेम करेल ."

तर दुसरीकडे बोर्डिंग शाळेतलं जीवन एकोमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊन गेलं.

" इथे कुटुंब म्हणजे आपण निवडलेले मित्र मैत्रिणी, ज्यामुळे नातेसंबंधांचा पाया मजबूत व्हायला मदत होते, मला वाटत यशस्वी होण्यामागे हे एक कारण असावं की आपल्या आयुष्यात ज्या वेगवेगळ्या भूमिका आपण निभावतो , त्या या पायामुळे भक्कमपणे निभावल्या जातात. मोरिंगाव्हॉट सुरु करताना माझ्या डोक्यात सतत हेच विचार घोळत होते."

अर्थ शोध:

पदवी मिळवल्यानंतर एकोमची इंटर्नशिप सुरु झाली आणि पुढे त्याचं रुपांतर नोकरीत झालं. गोल्डमन सॅकमध्ये! काही वर्षांनी तिला जाणवलं की ती रोज जे करतेय त्यात काही प्रभावशील असं नाही. स्पर्धात्मक युगात तिला स्वत:साठी वेळच नव्हता किंवा नातेवाईकांसाठी ना नात्यांसाठी ! एकोमच्या मते, उद्दिष्ट्य म्हणजे निव्वळ व्यावसायिक यश नव्हे तर तिला वाटते की लोक व्यावसायिक उद्दिष्ट्यांच्या मागे लागताना स्वत:ची ध्येय विसरून जातात आणि ती ध्येय म्हणजे स्वत:च्या माणसांबरोबर वेळ घालवणे किंवा आपली आवड जपणे, स्वप्न पूर्ण करणे. आणि हे सर्व ती आपल्या नोकरीत असताना करू शकत नव्हती. म्हणून मग तिने नोकरी सोडायची ठरवलं. आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी तिनं भटकंती करायचं ठरवलं ती केनियाला गेली. पण त्याआधी तिने आपल्या नातेवाईकांसोबत वेळ घालवला.

" गवत नेहमी हिरवंगार आहे असं आपल्याला वाटतं. आपण जे निर्णय घेतो, ते भोवतालच्या परिस्थितीवर , आपल्या गरजांवर , आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. न घाबरता किंवा तोट्याचा विचार न करता काहीतरी मिळवण्याची इच्छा ! हे सोपं नाही ! जगात स्वत:साठी काही करणं म्हणजे स्वत:कडूनच खूप काही अपेक्षा ठेवणं, पूर्णपणे स्वत:कडून आणि तेही प्रत्येकवेळी ! मी जेव्हा नोकरी सोडली, तेव्हा मला वाटलं की हे मी स्वत:साठी करणार आहे , त्या छोट्या -छोट्या स्वप्नांसाठी जी कुठेतरी हरवून जाण्यापूर्वी "
image


लहान असताना तिने आफ्रिका खंडाविषयी वाचलं होत, नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर पाहिलं होत आणि थोडंफार संशोधनसुद्धा तिने या देशाविषयी केलं होतं. त्यामुळे कोणीतरी एका प्रवास करणाऱ्यानं , केनियाचं नाव घेतलं, एकोमला ही नाळ जुळतेय असं वाटलं आणि ती तिथल्या एका गावात काम करायला निघून गेली. तिथे तिला एका गावात काम करायची संधी मिळाली ज्या गावात एचआयव्हीग्रस्त पालकांची अनाथ मुलं आणि त्यांचे आजी-आजोबा यांना रहायला जागा देण्यात आली होती. अन्य पालकांप्रमाणेच तिच्या आईनं या कामासाठी जायला हरकत घेतली पण तिचे वडील तिच्या सोबत ठाम उभे राहिले.

केनियामध्ये सापडली मोरिंगाची जादू

आफ्रिकेचा प्रवास हा एकोमचं आयुष्य बदलणारा ठरला. ती काहीतरी शोधत होती आणि तिचा शोध केनिया मध्ये संपला ." तो एक निर्णय , मोरिंगाव्हॉटच्या संकल्पनेला कारणीभूत ठरला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोरिंगा ओलेयफेरा वनस्पतीचा लोकांच्या आयुष्यात किती दीर्घकाळ उपयोग होऊ शकतो, या कल्पनेनं मला अगदी भारावून गेल्यासारखं वाटलं."

image


मोरिंगा

मोरिंगा या वनस्पतीला भारतात ड्रमस्टिक्स किंवा हिंदीत सहजन फळी आणि मराठीत शेवग्याच्या शेंगा म्हटलं जातं. सांबरमध्ये हमखास आढळणारी, सांबर म्हणजे डाळीच आणि भाजीचं दक्षिणेकडे केला जाणारा पदार्थ.

एकोम सांगते की मोरिंगा ओलेयफेरा, कुपोषणाची समस्या बऱ्याच अंशी दूर करू शकते . " या वनस्पतीचे फायदे, आपल्या लोककथांमधून सांगितले गेले आहेत आणि युगानुयुगे याची महती लोकांना ठाऊक आहे. या वनस्पतीत अत्यंत पोषक तत्व आहेत जी त्वचेसाठी किंवा शरीरातील अन्य गरजांसाठी अत्यंत लाभदायी ठरतात. जिथे औषधांची गरज असते तिथे ही वनस्पती चमत्कार घडवू शकते." एकोम सांगत होती .

तिला या झाडाची अगदी लहानपणापासून माहिती होती. पण त्याची महती आणि माहिती मात्र तिला केनियात कळली. तिथे तिने व्यतीत केलेल्या काळात तिच्या उद्यमाची मुळंच रोवली गेली असं नाही तर तिला एक उद्दिष्ट्य मिळालं. एकोम आपला केनियातला अनुभव एकाच शब्दात मांडते ," संपूर्ण समाधान".

image


मोरिंगाव्हॉट

"मोरिंगा ओलेयफेराचं हे झाड जगातल्या दुष्काळग्रस्त भागात वाढतं आणि २०० विविध नावांनी ते ओळ्खलं जातं. सुरुवातीला मला आश्चर्य वाटायचं की ते पहाडाच्या पायथ्याशी सुद्धा छान वाढतं."

अनेक महिने संशोधन केल्यावर ती परतली आणि दार्जीलिंगमधल्या पायथ्याशी राहणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांशी तिने करार केला. यातल्या अनेकांबरोबर ती लहानपणी खेळायची. करार होता तो म्हणजे मोरिंगा ओलेयफेरा झाडांसाठी त्यांच्या शेतातला काही भाग वापरू द्यायचा आणि या वनस्पतीच्या पोषक तत्वांचा प्रसार करायचा. " माझ्यासमोरचं आव्हान म्हणजे 'विश्वास '. विश्वासानं नाती तयार करणं, ज्याचा दोन्ही बाजूला फायदा असेल, मला ही नाती जोडायला मेहनत घ्यावी लागली, कारण मी जे करणार आहे त्यावर त्यांचा विश्वास बसणे आणि त्यांना हे पटवून देणं महत्त्वाचं होतं."

१७ एप्रिल २०१५ रोजी या व्यवसायाची अधिकृत नोंद झाली आणि जुलै महिन्याच्या शेवटी तिचा व्यवसाय ऑनलाइन पण सुरु झाला. तिनं तेल काढणीचा एक छोटासा शीत दाब विभाग सुरु केला. दीड एकरावर पसरलेल्या या विभागात, कापणीच्या हंगामानंतर बियांमधून तेल काढलं जातं. शीत दाब पद्धतीने तेल काढणी सुरु होते . तळाशी घट्ट बसल्यावर, तेल शुद्धीकरण केलं जातं.

तीन वर्षांची मुदत असलेलं हे तेल काचेच्या बाटलीत मिळतं जे पर्यावरण पोषक आहेत. एकोमच्या मते तुम्ही सेंद्रिय उत्पादन प्लास्टिकच्या बाटलीतून विकलत तर त्या सेंद्रिय उत्पादनाची किंमत आपसूक कमी होते.

एकोम एक चांगला प्रश्न विचारते तो म्हणजे आपण आरोग्याला चांगलं आणि ज्यातून पौष्टिक तत्व मिळतील असंच जेवण जेवतो. पण आपल्या त्वचेतून आणि बाहेरील आवरणातून जे आपल्या शरीरात जातं ते सुद्धा पोषक नको का? आपण त्यावर भर देत नाही. मोरिंगाव्हॉटनं हे सर्व बदलेल अशी तिची अपेक्षा आहे.

" एकदा तुम्हाला मोरिंगाचे फायदे कळले तर तुम्ही नक्कीच त्यासाठी परत परत याल."

मोरिंगाची जादू तिला जगाला दाखवून द्यायची आहे. ज्यांना कळली आहे, ते पुन्हा पुन्हा तीच उत्पादनं वापरतात.

कला आणि संगीत : उद्यमीचा दुसरा चेहरा

एक उद्यमी असणारी एकोम कलाप्रेमी आणि संगीतवेडीसुद्धा आहे. लहान असताना तिनं आपल्या आईला आणि आजीला चित्र रंगवताना पाहिलंय. कोणतंही प्रशिक्षण न घेता एकोम तैलचित्र रंगवते. " माझ्या मनात जेव्हा प्रचंड उलथापालथ चालू असते किंवा अशा गडद खोल क्षणात आपण हरवलेलो असतो तेव्हा चित्र माझ्या आयुष्यात मोठी कामगिरी बजावतात आणि माझ्या गोंधळलेल्या मनाला सावरतं.”

चित्रकलेबरोबरच संगीतानंही तिचं आयुष्य लहानपणापासून व्यापलंय. " संगीत खूप महत्वाचं आहे . गरज म्हणा ना ! मी त्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत ." काही महिन्यांपूर्वीच तिनं बेंगळूरूमधल्या किश्त मंदी इथं एक मोठा शो केला आणि दुसराही बेंगळूरू मधल्या हमिंग ट्री इथं केला.

image


व्यवसाय म्हणजे प्रामाणिकपणा

आव्हान हा एकोमच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आणि यापैकी अनेक आव्हानं ही तिच्या स्वत:च्या मनातल्या असुरक्षिततेमुळे आलेली होती आणि या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी प्रामाणिक असणं किती गरजेचं आहे, हे शिकवून गेली .

" असुरक्षितता मग त्या अनेक प्रकारच्या असतात आणि विविध पद्धतीने त्या समोर येत राहतात, कधी मानसिक तर कधी शारीरिक. यावर मत करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, स्वत:शी प्रामाणिक रहाणे हेच सर्वात मोठं आव्हान आहे . व्यवसाय म्हणजे नाती बांधणं आणि तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असल्याशिवाय चांगली नाती निर्माण होत नाहीत. "

निरंतर पाठलाग :

" तुम्ही एखाद्या स्वप्नाचा किंवा ध्येयाचा पाठलाग करत असाल तर त्या पाठलागापासून स्वत:ला अलिप्त ठेवून हे शक्य नाही. कधीतरी आपण विसरतो, आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, आपल्या जीवलगांशी गप्पा, निरर्थक केलेली भटकंती, भावंडाबरोबरची मस्ती, कधी प्रेमात पडणं …। आपण हे सगळं बाजूला ठेवून नुसतं पळत राहतो, जे अत्यंत महत्वाचं असतं आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यात ध्येय प्राप्तअधिक कठीण होतं. प्रवास महत्त्वाचा आहे आणि तो कसा करतो हेही तितकंच महत्त्वाचं."

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : प्रेरणा भराडे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags