आकाशात पतंगबाजीतून उड्डाण घेणाऱ्या मोहितची बहुराष्ट्रीय कंपनीक्षेत्रात झेप : 'इनमोबी'
उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे वाढलेल्या मोहित यांनी ८० च्या दशकात आपले बालपण गोट्या आणि क्रिकेट खेळण्यात घालवले. त्यांना पतंग उडवण्याचाही छंद होता आणि यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवत काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या जिंकल्याही होत्या. मोहित यांचे वडील उत्तरप्रदेश सरकारच्या आरोग्य विभागात काम करत आणि ते नोकरी निमित्त अधिकतर फिरतीवर असत. मोहित यांनी आपला वेळ आई सोबतच घालवला आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या आईचा खूप प्रभाव आहे. मोहित लहानपणा पासूनच इंजिनिअर बनू इच्छित होते, मात्र कोणत्या शाखेतून शिक्षण घ्यावे या बाबतीत त्यांची काही निश्चिती नव्हती.
आपल्या लहानपणीच्या इंजीनियरिंगच्या वेडाशी संबधित आठवणी सांगताना ते एक जुना किस्सा सांगतात, त्यांनी सायकल कशाप्रकारे काम करते हे पाहण्यासाठी सायकलचे सगळे हिस्से खोलून वेगळे केले मात्र जेव्हा त्याला परत जोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांना काही ते जमेना. त्यांनी त्या खोलून ठेवलेल्या सायकलीला एका चादरीत गुंडाळून सायकल दुरुस्त करणाऱ्याकडे नेले आणि तिथे तिला पूर्ववत रूप प्राप्त झाले. त्यांनी त्यांच्या आईला त्यांनी केलेल्या उलाढालीची थांगपत्ता लागू दिला नाही.
जेईई ची परीक्षा पास झाल्यावर त्यांना रूडकी आणि बीएचयु तेथील प्रतिष्ठित आयआयटी मध्ये निवडण्यात आले. त्यांना जरी मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कंप्यूटर विज्ञान या पारंपारिक ज्ञानशाखांमध्ये प्रवेश मिळाला नव्हता तरी त्यांनी निराश न होता त्याच वर्षी रूडकी येथे धातु आणि सामग्री विज्ञान इंजिनियरिंग(Metallurgical and Material Sciences engineering) साठी प्रवेश घेतला. त्यांचे आयआयटी मधील पहिले वर्ष बरेचसे शांततेत गेले मात्र लवकरच परिस्थिती एक अनोखे वळण घेणार होती.
त्यांचे बहुतांश मित्र आणि सोबती संगणक विज्ञान आणि आयटीच्या वर्गातील होते. त्यांच्या सोबत राहण्यासाठी मोहित यांनी दुसर्या वर्षी वैकल्पिक विषय म्हणून C++ ची निवड केली. ते यात पूर्णपणे रमले. यात आणखी एक फायदा असा ही होता की कम्प्युटर लॅब एका नव्या इमारती मध्ये होते, जे वातानुकूलित होते, लॅबची जागा झोपण्यासाठी एक छान पर्याय म्हणून वापरता येत असे. एकूणच त्यांचा हा निर्णय त्यांचे आयुष्य बदलणारा ठरला.
शिक्षण पूर्ण करताच मोहित यांना टाटा स्टील मध्ये नोकरी मिळाली. तिथे ही मोहित यांनी व्यावसायिक विभागात काम करण्यापेक्षा कंप्यूटर विभागात काम करण्याला प्राधान्य दिले. तिथे गोष्टीना अधिक योग्य प्रकारे चालवण्या साठी त्यांना स्वयंचलित करण्याच्या प्रकल्पावर काम चालू होते. यामुळे कामगार संगठनांना त्यांच्या नोकरीवरच गदा येईल अशी भीती वाटत होती. नऊ महिन्यांच्या आपल्या छोट्याशा कार्यकाळात तिथल्या संघर्षपूर्ण वातावरणात काम करण्याने मोहित यांना बरेच काही शिकायला मिळाले. या नंतर मोहित यांनी 'एटीएण्डटी पॅकबैल लॅब्स' मध्ये नोकरी केली आणि १९९८ मधील नाताळच्या पूर्वसंध्येस ते आपल्या पहिल्या अमेरिका प्रवासाला निघाले. 'एटीएण्डटी' नंतर मोहित यांनी अमेरिकेत नव्यानेच प्रवेश केलेल्या 'वर्जिन मोबाइल' कंपनीत काम केले. एटीएण्डटी च्या विरुद्ध, येथील वातावरण अगदीच स्टार्टअप सारखे होते आणि सोडवण्यासाठी समस्यांचे डोंगर उभे ठाकायचे. वर्जिन मोबाइल ची अमेरिका टीम सुरवातीला अगदी लहान होती आणि मोहित, संचालन पाहणाऱ्या टीमला सांभाळत होते. येथेच त्यांनी सिस्टीम स्केलिंग मध्ये लक्ष घातले ज्याने त्यांना जो अनुभव मिळाला तो पुढे 'इनमोबी' च्या प्रवासात खूप कामी आला.
ते २००७ चे वर्ष होते जेव्हा मोहित यांची भेट नवीन तिवारी, अमित गुप्ता आणि अभय सिंघल यांच्या सोबत झाली. त्यांनी एकत्र येऊन मोबाईलच्या उदयाला येणाऱ्या बाजारात एक नवा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'एमखोज' या नावाने एका कंपनीची स्थापना केली आणि जेव्हा त्यांनी अॅप्लीकेशन च्या बाजाराला वाढताना पहिले तेव्हा त्यांनी जाहिरातीच्या कामाला आपला प्रमुख आधार बनवले.
यानंतर त्यांनी भारतीय बाजाराला लक्ष करत मुंबई कडे प्रयाण केले. अमेरिकेतून मुंबईला येऊन इथे स्वतःचे कार्यालय स्थापित करायला मोहित यांनी केवळ १५ दिवसांचा वेळ घेतला. लवकरच ही टीम बेंगळूरू येथे आली जिथे या प्रकारच्या तांत्रिक स्टार्टअप्स करता खूप चांगले वातावरण आणि आधार व्यवस्था उपलब्ध होती. मोहित यांनी 'इनमोबी' साठी पहिला अॅड सर्वर कोड लिहिला आणि तेव्हा पासून ते या तंत्रज्ञानाच्या अग्रभागी कायम राहिले आहेत. ते क्लिष्ट संरचनांच्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या रूपरेषेला बनवण्यात प्रवीण आहेत. जेव्हा की ते स्वतःला सामान्य म्हणवून घेणेच पसंत करतात, मात्र लगेचच ते हे पण स्पष्ट करतात की, हा शब्द सगळ्यांनाच लागू पडत नाही.
जेव्हा इनमोबी मध्ये तांत्रिक पदांच्या नियुक्तीची गोष्ट येते तेव्हा मोहित म्हणतात की निवडलेल्या प्रत्येक सदस्याला ते स्वतः भेटतात आणि ही ८ ते ९ टप्प्यांची चांगलीच कठीण प्रक्रिया आहे, ते गंमतीत म्हणतात, "माझ्या मते जर मी या कंपनीचा सहसंस्थापक नसतो तर माझ्या साठी सुद्धा मुलाखतीचा टप्पा पार करणे अशक्य असते."
सध्या सॉफ्टवेअर इंजीनिअर्स मॅनेजर बनण्याच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकत मोहित सांगतात, "एमबीए करणे कधीच माझी प्राथमिकता बनली नाही. मी नेहमीच काही तांत्रिक काम करत वेगवेगळ्या प्रणालींचा विकास करू इच्छित होतो. जेव्हाही मला एमबीए ची आवश्यकता भासेल मी माझी गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना कामावर ठेऊन घेईन. माझ्या कडे अशी माणसे आहेत जी मागच्या १२ वर्षांपासून कोडींग करत आहेत आणि अजूनही थकलेले नाहीत. माझ्या नजरेत एक चांगला सॉफ्टवेयर इंजिनिअर कुणा सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. मी आयुष्यात कोडींग वर सगळ्यात अधिक प्रेम करणाऱ्या इंजिनिअरला माझे सारे काही अत्यंत आनंदाने देणे पसंत करेन."
'इनमोबी' व्यतिरिक्त मोहित कर्करोग उपचार पुरवणार्या संस्था सोबतही जोडले आहेत. हे सगळे २०१२ साली त्या वेळी सुरु झाले जेव्हा त्यांना आपल्या आईला स्तनाचा चौथ्या स्थराचा कर्करोग असल्याचे कळले. ते सांगतात, "आम्ही स्वतःला सुशिक्षित मूर्खां प्रमाणे समजू लागलो, या बद्दल माहिती असूनही मी माझ्या जवळच्या व्यक्तींना नियमित चाचण्यांना नाही घेऊन जाऊ शकलो."
नशिबाने वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्या या आजारातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या. मात्र तो काळ संपूर्ण कुटुंबाकरिता खूपच तणावाचा होता. आता मोहित नियमित रूपाने लोकांची सेवा करतात. या सोबतच 'इनमोबी' कर्करोग इस्पितळासाठी आपल्या पातळीवरही पैसे जमा करते.
भविष्याविषयी बोलताना मोहित म्हणतात की, ते 'इनमोबी' ला जगातील सगळ्यात मोठी तांत्रिक कंपनी बनवू इच्छितात आणि हे लक्ष्य गाठण्या करता ते प्रयत्नात जराही कसर बाकी ठेवणार नाहीत.