महाकिसान... एक पाऊल शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाकडे

महाकिसान... एक पाऊल शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाकडे

Saturday January 23, 2016,

3 min Read

भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारताच्या एकूण देशांतर्गंत उत्पन्नात ६०टक्के हून जास्त शेती उत्पादनच आहे. पण तरीही भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त होत आहे. यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही. महाराष्ट्रात विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. निसर्गाचा लहरी कारभार आणि सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी विविध सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या पातळीवर विविध कार्यक्रम हाती घेतले जातायत. पण त्याला हवं तसं यश मिळालेलं नाही. यामुळंच आता तंत्रज्ञान आणि माहितीचा वापर करुन शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यावर भर देण्यात येतोय. यासाठीच महाकिसान हे कृषीमित्र तंत्रज्ञान सबलीकरण मोबाईल एपची संकल्पना पुढे आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषय माहितीचा खजाना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शिवाय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शहरातल्या ग्राहकांशी थेट जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. महा-किसान हे एप विनामुल्य डाऊनलोड करण्यात येते.

image


या अॅपमध्ये महाराष्ट्रातील सर्व कृषी बाजार समितीमधील अद्यावत तसं १९१४ पासूनचे बाजारभाव उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील शेतजमीन त्यात येणारी पिके, खते, अवजारे, औषधे, बी-बियाणे, कृषी तंत्रज्ञान, व्यापारी बाजार समित्या आणि कृषी वाहतुकदार या विषयीची माहिती रोजच्या रोज अद्यावत केलीय जातेय. तसंच महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक, समितीवरील विद्यमान कार्यकारणीची माहिती, बाजार समितीत कोणत्या पीकांचे व्यवहार झाले, बाजारसमितीशी संलग्न असणारे व्यापारी, त्याचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक ही माहिती उपबल्ध आहे. महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका निहाय कृषी औषधे, खते, औजारे, बी-बियाण्यांच्या विक्रेत्यांची माहिती उपलब्ध करुण देण्यात आली आहे.

image


महा किसान एपमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज उपबल्ध होणार आहे. यामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ याची माहिती आधीच उपलब्ध झाल्यानं शेतकरी आपलं नुकसान कमी करु शकतात किंवा टाळू शकतात.

image


कृषी (पीक) दिनदर्शिकामध्ये प्रत्येक पीकाच्या पूर्व मशागतीपासून ते काढणीपश्चात पीकांचे वेळापत्रक तयार करण्याचे काम महाकिसान एप करणार आहे. दैनदिंन कामाची आणि खर्चाची नोंद शेतकऱ्याने या एपमध्ये केल्यास पीक काढणीनंतर एकूण खर्चाची माहिती देखील पुरवण्यात येईल. या एपद्वारे कृषी सल्लागार आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे जाळे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतकरी या तज्ज्ञांशी संपर्क साधू शकतात किंवा आपल्या पिकाचे फोटो अपलोड करुन तज्ज्ञांचा सल्ला मिळवू शकतात.

शेतकऱ्यांना थेट ग्राहक किंवा व्यापाऱ्यांशी जोडण्यासाठी महा किसान इ-कॉमर्सचे योगदान राहणार आहे. याचा थेट फायदा ग्राहक, किरकोळ व घाऊक विक्रेते, निर्यातदार, मॉल, अन्नप्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. यामुळे पिकाचे नियोजन करुन जास्तीत जास्त मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होऊ शकते. तसंच शेतकऱ्यांना सर्व मृदा परिक्षण (मातीचे परीक्षण) प्रयोगशाळांबरोबर जोडण्याचे अत्यंत महत्वाचे काम महा-किसान एपद्वारे केले जाणार आहे. मुख्य म्हणजे जे शेतकरी या महा-किसान एपशी जोडले गेले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना आपले अनुभव मांडण्यासाठी हे एप व्यासपीठाची भूमिका साकारणार आहे. त्याद्वारे शेतकरी आणि तज्ञ माहितीची आणि आपल्या विचारांची देवाण घेवाण करुन प्रगती साधू शकतात.

image


एकूणच काय तर शेतकऱ्यांना आधुनिक करण्याचा आणि त्याद्वारे आत्महत्या टाळण्याचा प्रयत्न महा-किसानतर्फे करण्यात येत आहे. महा-किसान एपसाठी 7875927750 या क्रमांकावर मिस कॉल देऊन डाऊनलोड लिंकचा एसएमएस मिळवता येईल. किंवा https://goo.gl/Lp58vc या लिंकवरुन थेट डाऊनलोड करता येऊ शकते.