संपादने
Marathi

23 वर्षीय युवक हैद्राबादची वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नात

11th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

उद्योजकांची ही कथा जरा वेगळी आहे. या २३ वर्षीय युवकांनी आकर्षक कॉर्पोरेट नोकऱ्यांना पाठ दाखवत आपली स्वप्न आणि आकांक्षा साकारायचं ठरवलं. आपण नेहमी स्वतःला विचारत असतो, “माझ्या आयुष्यात मी काय करत आहे?” आणि या युवकांनी याचंच उत्तर द्यायचं ठरवलं.

कम्युटचे संस्थापक

कम्युटचे संस्थापक


कम्युटचा एक सहसंस्थापक प्रशांतचं आपल्या मित्रांसोबत याच विषयावर बोलणं सुरू होतं.

या संवादादरम्यान कम्युटचा आणखी सहसंस्थापक हेमंत जोनांलगद्दानी यानं (२३ ) सुचवलं की, आपण काहीतरी सुरू करणं हाच आपल्या आयुष्यातल्या अडचणींवरचा उपाय असू शकतो. हैद्राबादच्या हायटेकसिटी ते दिलखुशनगरच्या प्रवासात त्याला दीर्घकाळ बसची प्रतिक्षा, कॅबचे अव्वाच्यासव्वा दर या अडचणींना सामोरं जावं लागतं होतं.

त्यांचे सहसंस्थापक आणि आयआयआयटी हैद्राबादचे बॅचमेटस् संदीप कचावरपू, चरण थोटा, सृजय वारिकुटी यांनाही याच समस्येला तोंड द्यावं लागत होतं. या सर्वांनी मिळून मग मोबाईल वर मिनीबस शटल सेवेचं कम्युट (Commut) एप सुरू केलं. सप्टेंबर २०१५ पासून ऑफिसला जाणाऱ्या लोकांकरता रोज ही सेवा कार्यान्वित आहे.

संस्थापक कार-फ्रि गुरूवार आणि कम्युटची हैद्राबादमध्ये जाहिरात करताना

संस्थापक कार-फ्रि गुरूवार आणि कम्युटची हैद्राबादमध्ये जाहिरात करताना


पहिलीच भाग्यवान वेळ

त्यांच्या या पहिल्याच उद्योगात केवळ ७५ दिवसांत तीन हजारांहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. आतापर्यंत चार हजार बुकिंग्स नोंदवण्यात आली आहेत.

सध्या ते हैद्राबादच्या १२ भागांमध्ये १७ बसद्वारे आपली सेवा पुरवत आहेत. एल बी नगर, उप्पल, इसीआयएल, सिकंदराबाद आणि कुकाटपल्ली या भागातून मुख्य वाहतूकीचा पूर असतो. प्रशांत दावा करतात की, त्यांच्या ८-९ बसेस प्रवाशांनी १०० टक्के भरल्या जातात आणि बाकीच्या बसेस ७३ टक्के उपयोगात येतात. या सेवेला रोज २५० रिक्वेस्टस् मिळतात. यात खासकरून आयटी क्षेत्रातल्या प्रवाशांचा जास्त भरणा आहे. यातही ६० टक्के महिला प्रवासी आहेत.

प्रशांत सांगतात, या सेवेला महिलांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यावर आम्ही सर्वजण आश्चर्यचकीत झालो. मग आम्ही या बसेसना लाईव्ह ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याचं ठरवलं. धोक्याच्या/अडचणीच्या प्रसंगी जवळच्या नातेवाईकांना आणि जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ संदेश पोहचवण्याकरता इन-एप पॅनिक बटणची सोय करण्याचंही त्यांनी ठरवलं आहे.

टीमच्या भाषेत त्यांच्या ‘व्हॅनिटी मेट्रीक्स’नुसार ही सेवा ३,५०० हून अधिक लोकांनी डाऊनलोड केली आहे. या एपचं iOS रुपांतरण आणि वेब बुकींगही या आठवड्यात सुरू होणार आहे.

ठिकठिकाणांहून (point to point pick up) प्रवाशांना दर किलोमीटर ३ रुपये दराने ही सेवा उपलब्ध आहे. वातानुकुलीत प्रवास, बसायला जागेची हमी,स्थिर दर आणि लाईव्ह ट्रॅकिंग या सुविधांसोबत ही सेवा प्रवाशांना मिळते. या सेवेकरता रोख पैसे भरायला लागत नाहीत. ऑनलाईन व्यवहाराने आपली देयक द्यावी लागतात.

या सेवेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मार्गांचा वापर. या बसेस कमी ट्रॅफिक असणाऱ्या पण जवळच्या मार्गाचा अवलंब करत असल्याने इच्छित स्थळी जलद पोहचतात. त्यांची सर्वात मोठी स्पर्धक कंपनी झीपगोही स्वतःचे नकाशे बनवून जलद सेवा देण्याचा प्रयत्न करतेय. यामध्ये वाहतुकीच्या रस्त्यांसोबतच हुशारी असणंही तेवढचं महत्त्वाचं आहे. याकरता बसेसची पुरेशी संख्या आणि फेऱ्या असणंही आवश्यक आहे.

वाहनचालकांसोबत कम्युटची टीम

वाहनचालकांसोबत कम्युटची टीम


भविष्यातल्या योजना

बहुराष्ट्रीय आयटी कंपन्या आणि इतर लघु-मध्यम उद्योग क्षेत्रातल्या कामगारांमध्ये या सेवेबाबत माहिती आणि वापर होण्याकरता या कंपन्यांशी कम्युटची चर्चा सुरू आहे. सध्या त्यांची डेलॉइट सोबत बोलणी सुरू आहेत. तिथून महिन्याला ४० टक्के व्यापार त्यांना मिळतो. ही काटेकोर भागीदारी नसेल पण जाहिरातीद्वारे कंपनी आपले प्रवासी-ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न करतेय.

प्रशांतने सांगितलं की, पुढील तीन महिन्यात ते हैद्राबादमध्ये त्यांची सेवा वाढवणार आहेत. आणखी बसेस घेऊन शहरातल्या २४ भागांमध्ये दर १५ मिनिटाला एक बस अशा प्रकारे सेवा वाढवण्याचा त्यांचा उद्देश आहे.

दर आठवड्याला नविन १० बसेस घेऊन बसेसची संख्या १५० पर्यंत ते नेणार आहेत. त्यासोबतच त्यांची सेवा इतर शहरांमध्येही नेण्याचा त्यांचा विचार आहे. काही भागीदारांना सोबत घेऊन ते महानगरांमध्येही सेवा घेऊन जाणार आहेत.

यासोबतच, एक वैशिष्ट्यपूर्ण बाब ते आणणार आहेत. एकाच मार्गावरून जाणाऱ्या महिला प्रवाशांना एकाच शटलमधून जाता येईल. प्रशांत म्हणतात, बसेसची संख्या वाढल्यावर ही योजना चांगली यशस्वी होईल. त्यांची प्रतिस्पर्धी झीपगोने महिलांकरता विशेष सेवा याआधीच द्यायला सुरूवात केली आहे.

फेब्रुवारी अखेरीपर्यंत त्यांना प्रसिद्ध गुंतवणूक कंपनी एंजल इन्व्हेस्टर्सकडून वित्तसहाय्य मिळण्याची शक्यता आहे.

तेलंगणाचे आयटी सचिव जयेश रंजन यांच्यासोबत कम्युटची टीम

तेलंगणाचे आयटी सचिव जयेश रंजन यांच्यासोबत कम्युटची टीम


युअरस्टोरीचं मत

बस शटलिंग ही काही नवी कल्पना नाही. झीपगो, शटल आणि ओला शटल या कंपन्या याआधीच या सेवा क्षेत्रात आहेत. तरीही नव्यानेच उदय झालेल्या या क्षेत्रात कार्यप्रणालीत असंमजसपणाही आहे.

डिसेंबरमध्ये आपण या क्षेत्रातल्या नवनवीन कंपन्या पाहिल्या आणि दुसऱ्या बाजूला नियम उल्लंघन प्रकरणी गुडगाव सरकारने शटल आणि ओलाची वाहन जप्त केलेलीही पाहिली.

बेंगळुरू परिवहन विभागानेही झीपगोच्या कार्यालयावर याच प्रकरणी धाड घातली आणि त्यांची सर्व वाहन जप्त करण्यात येतील असं धमकावलं.

कम्युटच्या सहसंस्थापकांच म्हणणं आहे की, सरकारसोबत स्पर्धा करण्यापेक्षा ते त्यांना मदत करण्याच्या प्रयत्न करत आहेत. पायाभूत सुविधा पुरवण्याकरता सरकारची मदत करत आहेत. सरकारसोबत सुसंवादाकरता ते राज्य परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नेहमी संपर्कात असतात.

पण जर का परवानग्या मिळाल्या तर या क्षेत्रात यायला खूप जण प्रयत्न करत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या वाढत्या खर्चामुळे त्यांची प्रवाससुविधा कमी करत आहेत. एकमेकांवर अवलंबून असणारे उद्योग या बाबतीत मोठे खेळाडू ठरतील. कम्युट सोबत ओला शटलही साधारण याच मॉडेलवर काम करत आहे. लोकांना या सेवांची खूप आवश्यकता असल्याचं कम्युटच्या यशाची आकडेवारी दर्शवतं. ग्राहकांच्या नजरेतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा खाजगी बस व्यवस्था जास्त आरामदायी आणि महिलांकरता सुरक्षित आहे.

ग्राहकांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद, वाढती मागणी असली तरी या सेवेचं भवितव्य सरकारी धोरणांवरच अवलंबून आहे. जर सरकारने कायद्याच्या चौकटीत चालणाऱ्या बस शटल सेवेला हिरवा कंदिल दाखवला तर मोठ्या प्रमाणात ही सेवा यशस्वी होईल.

वेबसाईट- www.commut.co

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

पवईच्या झुमोटने आणलीय स्वस्त आणि आरामदायी ‘राईड शेअरींग’

महानगरांतर्गत प्रवासासाठी बाइक-टॅक्सीचा पर्याय?

दिल्लीमधील सम विषम योजना ही पर्यावरणासाठी ठरू शकते एक वरदान


लेखक – तरूष भल्ला

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags