संपादने
Marathi

समाजाच्या कटू वाक्यांनी बदलले आयुष्य, आज दोनशे मुलांसाठी ‘आई’ आहेत सविता...

Team YS Marathi
14th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आयुष्य बदलत आहे. बदलाच्या या वा-याच्या झुळकेने लोकांचा दृष्टीकोनच बदलला आहे. कालपर्यंत ज्यांना विवश आणि असमर्थ समजले जात होते, आज ते यशाचे नवे शिखर गाठत आहेत. आपल्या कलेच्या आणि मनौधैर्याच्या बळावर त्यांनी हे सांगितले की, ते मजबूर नाहीत तर मजबूत आहेत. आम्ही बोलत आहोत, शारीरिकदृष्ट्या अक्षम अपंगांबाबत. काशी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारीरिकदृष्ट्या असमर्थ लोकांना नवे नाव दिले आणि त्यांच्या प्रती सरकारची सहानुभूती दाखविली, तर त्याचा परिणाम देखील आता दिसायला लागला आहे. समाजात अनेक असे लोक आहेत, जे अपंगांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच आहेत, गाजीपुरा जिल्ह्यात राहणा-या सविता सिंह. महसूल विभागात लेखाधिकारी पदावर काम करणा-या सविता सिंह आज दोनशे अपंग मुलांसाठी ‘आई’ सारख्याच आहेत. सविता सिंह यांनी या मुलांना जन्म दिलेला नाही, मात्र जन्म देणा-या आईपेक्षा खूप मोठ्या आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या अपंग मुलांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुलेच आता सविता यांचे आयुष्य आहे. सविता जगतात तर, केवळ या मुलांसाठी. दोन पैसे कमवतात तर, या मुलांसाठी. मुलांचे हे आयुष्यच आता त्यांना आवडते. 

image


सविता यांनी कसे सावरले अपंगांचे आयुष्य

अपंग मुलांचे मनौधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांना मजबूत बनविण्यासाठी सविता आज खूप मेहनत घेत आहेत. गाजीपूरच्या शास्त्रीनगर भागात या मुलांसाठी सविता एक शाळा चालवत आहेत, जेणेकरून मुले शिकून आपल्या पायावर उभे राहू शकतील. सविता यांच्या शाळेत सध्या दोनशेहून अधिक मुले आहेत, जे प्रत्येक दिवशी शिक्षणासाठी त्यांच्या शाळेत येतात. मुलांच्या शिक्षणासोबतच सविता त्यांना रोजगार उपलब्ध करून देणा-या अभ्यासक्रमाचे देखील प्रशिक्षण देतात. जेणेकरून शिक्षणानंतर ही मुले स्वतःचा रोजगार मिळवू शकतील. सविता यांच्या शाळेत संगणकासोबतच शिवणकाम देखील शिकविले जाते. सविता यांना माहित आहे की, जर या मुलांना मानसिकरित्या मजबूत बनवायचे असेल तर, त्यांना साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एका शाळेची गरज होती. जेथे ही मुले शिक्षण घेऊ शकतील. मात्र, दुर्देवाने पूर्वेकडील जिल्ह्यात असलेल्या गाजीपुरा मध्ये अपंगांसाठी कुठलीही शाळा नव्हती. अपंग मुलांच्या या गरजेला सविता यांनी समजले आणि एक शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. असे असूनही हे इतके सहज सोपे नव्हते. परंतु सविता यांनी देखील हार पत्करली नाही. अपंग मुलांसाठी सविता गल्लोगल्ली फिरत होत्या. लोकांकडून निधी मागितला. काहींनी पुढे येऊन त्यांची मदत केली, तर काही अपंगांचे नाव ऐकूनएकून तोंड फिरवून घ्यायचे. अपंगांची शाळा उघडण्यासाठी सविता यांनी आयुष्यभराची जमापुंजी लावली. अनेक वर्षांच्या मेहनती नंतर आज शास्त्रीनगर भागात मुलांची शाळा उघडण्यात यश आले. या शाळेत मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था देखील आहे. आज सविता या मुलांसोबत खूप खुश आहे... 

image


अपंग मुलांसोबत का सामील झाल्या सविता

अपंगांसोबत सविता ज्याप्रकारे सामील झाल्या, ती कहाणी देखील मनोरंजक आहे. झाले असे की, सविता स्वतः देखील अपंग आहेत. सविता यांचा एक पाय लहानपणापासूनच निकामी आहे. सविता सामान्य मुलींप्रमाणे धावू शकत नव्हत्या आणि नृत्य देखील करू शकत नव्हत्या. मात्र या दरम्यान एक अशी गोष्ट झाली, ज्यामुळे सविता यांचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला. सविता युवर स्टोरीला सांगतात की,

“जेव्हा त्या शाळेत जात होत्या, तेव्हा त्यांचे मित्र त्यांची थट्टा करायचे. कटू गोष्टी बोलत होते. सामान्य मुलांसोबत शिक्षण घेण्यासाठी मला खूप समस्या येत होत्या. मी हे काम यासाठी सुरु केले, जेणेकरून पुन्हा कधी मुलांना माझ्यासारखा अपमान सहन करावा लागणार नाही.” 

image


आपल्या या नव्या जीवनात आज सविता खूप खुश आहेत. सरकारी कर्मचारी असूनही सविता अपंगांसाठी वेळ काढतच असत. आपल्या कमाईचा एक मोठा भाग सविता या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. जेणेकरून ही मुले हुशार बनतील. त्यांना दुस-यांच्या मदतीची गरज पडू नये. दिलदारनगर भागात राहणा-या सविता सहा भाऊ बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. सविता जेव्हा सहा महिन्यांच्या होत्या, तेव्हा त्यांना पोलियो झाला. पोलियोमुळे त्यांचा एक पाय निकामी झाला. एक तर अपंग आणि दुसरीकडे मुलगी. हे सर्वकाही सहज सोपे नव्हते. सविता सांगतात की, जवळपासचे लोक आणि नातेवाईक केवळ हेच म्हणायचे की, या मुलीचे काय होईल. कोण हिच्यासोबत लग्न करेल. समाजातील लोकांचे कटू बोल सविता यांच्या मनात घर करून जायचे. मात्र त्यांनी कधी पराभव पत्करला नाही. सुरुवातीला शिक्षणानंतर गाजीपूर पीजी महाविद्यालयातून पदवी घेतली आणि स्पर्धात्मक परीक्षादेखील दिल्या. आज त्या एका सन्मानकारक पदावर रुजू आहेत. सविता यांची इच्छा आहे की, शाळेत येणाऱ्या मुलांनी केवळ शिक्षणच करू नयेत तर त्यांनी स्वावलंबीदेखील बनावे. त्यामुळे सविता यांचे संपूर्ण लक्ष या मुलांच्या कलागुणाकडे देखील आहे. सविता यांच्या शाळेत संगणक, चादारांची छपाई, फुलांची अगरबत्ती, फ्लॉवर पॉट्स, पेंटिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. इतकेच नव्हे तर, या मुलांच्या कलेला समाजाच्या समोर आणण्यासाठी आता सविता सूर संग्राम नावाने संगीताचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. जेणेकरून अपंग मुलांमध्ये जी कला आहे, त्याला जग ओळखू शकेल. या कार्यक्रमात केवळ अपंग मुलेच सहभागी होतील. कार्यक्रम जिंकणा-या मुलाला गौरन्वित केले जाईल. संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमाची खूप चर्चा होताना दिसत आहे.


image


image


सविता यांनी वर्ष २००४-२००५ मध्ये अपंग मुलांसाठी ‘समर्पण’ नावाची जी संस्था सुरु केली होती, आज ती खूप मोठी झाली आहे. मात्र सविता यांना दु:ख आहे की, सरकार या चांगल्या कामासाठी त्यांची मदत करत नाही. सविता सांगतात की, जवळपास १० वर्षांच्या कडव्या संघर्षानंतर सरकार या मुलांसाठी अनुदान देण्यासाठी तयार तर झाले ते देखील उंटाच्या तोंडात जीरा असल्यासारखी. सविता म्हणतात की, हे शक्य आहे का की या काळात मुलांची एका वेळेची फी सहा रुपये असेल. सविता यांच्या शाळेतून शिक्षण घेतलेली मुले देखील आता आपल्या आयुष्यात खुश आहेत. अनेक अशी मुले आहेत, ज्यांनी स्वतः व्यवसाय सुरु केला आहे. या मुलांना सविता यांच्या संस्थेकडून बँकेकडून कर्ज काढून दिले. इतकेच नव्हे तर, सविता प्रत्येक टप्प्यावर या मुलांसोबत उभ्या राहतात. त्यांच्या सुख दु:खात सविताच त्यांच्या सोबत राहतात. सविता यांच्या शाळेत शिकणारा आकाश सांगतो की, “जेव्हापासून मी मँडमच्या शाळेत आलो, कधीच मला एकटेपणा जाणवला नाही. जगण्याची मी आशा सोडली होती. मात्र, आता ती पुन्हा एकदा जागली आहे.” 

image


अपंग मुलांसाठी काहीतरी करण्याची जिद्दच आहे की, सविता यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. सविता यांच्या चांगल्या कामासाठी त्यांना अनेक सम्मान देखील मिळालेले आहेत. अपंग मुलांसाठी करण्यात येणा-या विशेष कामासाठी त्यांना केविन केयर ऍबिलीटी अवॉर्ड फॉर एनीमेंस नेशनल अवॉर्ड २०१५ ने गौरविण्यात आले आहे. त्यांचा हा पुरस्कार ऑस्कर पुरस्कार विजेता सुप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी चेन्नईत आयोजित एका कार्यक्रमात दिला. सामाजिक आणि अपंगत्वाच्या क्षेत्रात काम करणा-या एकमेव अपंग महिला सविता यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

गाजीपूरला आपल्या या मुलीवर गर्व आहे. संपूर्ण आयुष्य दुस-यांसाठी जगण्याची जिद्द आणि कुठल्याही परिस्थितीत न हरण्याच्या जिद्दीने सविता यांना आज त्या शिखरावर पोहचविले आहे, जेथे पोहोचणे प्रत्येकाला शक्य नसते. आपल्या मनोधैर्याने सविता यांनी हे सिद्ध केले आहे की, जर मनात काहीतरी करण्याची इच्छा असेल तर, कुठलेही काम अशक्य नसते.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

बनारसमध्ये भीक मागणाऱ्या स्त्रियांना आत्मनिर्भर बनवले परदेशातील भगिनींनी 

आशेवर दुनिया कायम आहे, अपंगत्वावर मात करणा-या लजरिना बजाज!

दिव्यांग मुलांचे आयुष्य आनंदमय होण्यासाठी सोनाली यांनी सोडली पत्रकारितेची नोकरी !

लेखक : आशुतोष सिंह

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags