संपादने
Marathi

एका क्लिकवर मिळवा अनोळखी शहरातही कार किंवा टू व्हीलर - झिपहॉप

Team YS Marathi
21st Apr 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

सध्याच्या जगात वाढत्या ट्रॅफिकवर मात करायची म्हणून किंवा अगदी एखादा छोटासा प्रवास असेल तरीही तुम्हाला तुमचं वाहन असण्याची गरज वाढत आहे. तुम्ही एखादा चालक किंवा कॅब भाड्यानं घेऊ शकता किंवा स्वत: गाडी चालवू शकता. जवळपास ६० ते ७० टक्के भारतीय लोक स्वत: गाडी चालवणं पसंत करतात, असं अहवालातून स्पष्ट झालं आहे. हीच संधी मानून लोकांना गाडी बुक करण्यासाठी किंवा त्यांचं स्वत: चं वाहन चालवणं सोपं होण्यासाठी कार्टिझन, झूम कार आणि लेट मी ड्राईव्ह यासारखी स्टार्टअप्स सुरु झाली आहेत.

अशाच प्रकारचं एक स्टार्टअप म्हणजे 'झिपहॉप'...स्वत: चालवण्यासाठी कार किंवा बाईक बुक करण्यासाठीचं हे ऑनलाईन व्यासपीठ आहे. गेल्या डिसेंबरमध्ये याची सुरुवात गोव्यामधून झाली. आता त्यांच्या बंगळुरु, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, कोचीन आणि मुन्नार इथंही शाखा आहेत. त्यांच्या यादीमध्ये हार्डले डेव्हिडसन ते होंडा एक्टीव्हा पर्यंतचे तुमच्या गरजांनुसार विविध पर्याय उपलबध आहेत. तसंच अगदी हॅचबॅकपासून ते एसयूव्हीपर्यंत अनेक पर्याय आहेत.

गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये या संस्थापकांपैकी एक अपूर्व अग्रवाल यांना ही कल्पना सुचली. कामानिमित्त ते जालंधरहून मुंबईला स्थलांतरित झाले होते. आणि घरापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा प्रवासाचं अन्य साधन मिळविणे अत्यंत अवघड गोष्ट आहे हे त्यांच्या लक्षात आले. एके दिवशी त्यांनी बऱ्याच जणांना बाईकवरून प्रवास करताना पाहिले, तेव्हाच प्रवासासाठी वाहन भाड्याने देणे ही एक अत्यंत गरजेची गोष्ट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फक्त रोजच्या प्रवासासाठी आणि घरापर्यंत पोहोण्यासाठी नाही तर विकएंडला एखादी छोटी ट्रीप ठरवणाऱ्यांसाठीही हा उत्तम पर्याय असू शकतो हे त्यांच्या लक्षात आले. अपूर्व यांनी टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एशियन पेंट्ससाठी काम केले होते.

त्यानंतर अपूर्व यांनी अंकित चतुर्वेदी यांच्याशी याबद्दल चर्चा केली. अंकित चतुर्वेदी त्यावेळेस एशियन पेंट्समध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत होते. त्या दोघांनीही स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांची टीम तयार होण्यासाठी काही महिने जावे लागले. अंकित यांना त्यांचे लहानपणाचे मित्र सुमित हबलानी यांची साथ मिळाली. सुमित रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करत होते. तर अपूर्व यांनी त्याचे मित्र दुष्यंत सिंग यांना बोलावले. दुष्यंत यांना ग्रोफर्स, ट्रायटन ग्रुप आणि टीसीएसमध्ये कामाचा अनुभव होता. त्याशिवाय तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी सुमित यांना त्यांचे महाविद्यालयातले मित्र सुधांशू सक्सेना यांचीही साथ मिळाली. सुमित यांनी टाटा टेक्नॉलॉजीज, सॅफ्रान एमबीडी आणि टाटा एचएएल या कंपन्यांमध्ये काम केले होते. 

imageझिपहॉपची टीम

सगळीकडे विखुरलेले मार्केटची सुरळीत व्यवस्था लावणे तसेच वेळोवेळी वाहनांची उपलब्धता तपासणे आणि वेबसाईटवर सतत ते अपडेट करीत राहणे हे या सगळ्यांपुढचे सर्वांत मोठे आव्हान होते. हॉटेल्समध्ये त्यांच्या रूम्स उपलब्ध आहेत का तसेच कधी उपलब्ध होऊ शकतील हे ऑनलाईन बुकींगवरून तपासले जाऊ शकते. पण आमचे भागीदार अशा प्रकारची कोणतीही ऑनलाईन आरक्षण व्यवस्था वापरत नव्हते, असे २६ वर्षांचे अंकित सांगतात.

त्यामुळे जेव्हा एखादा ग्राहक एखादे वाहन निवडीत असे, तेव्हा त्याबद्दलची सर्व माहिती म्हणजे वाहनाचे मॉडेल, त्याचा नोंदणी क्रमांक, वापरकर्त्याचे नाव आणि पत्ता हे सर्वकाही हाताने वहीमध्ये लिहीले जात असे. त्यामुळे उर्वरित टीमला त्याबद्दलचा पाठपुरावा करणे आणि त्याचे अपडेट्स वेबसाईट्सवर टाकणे अत्यंत अवघड होते, अंकित सांगतात. एक भागीदार अॅप तयार करून त्यांनी या अडचणीवर मात केली. या अॅपमुळे वाहनांची सद्यस्थिती वेबसाईटवर दाखवली जाते आणि ते तपासूनही पाहिले जाऊ शकते. यासाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नाही.

थोडक्यात सांगायचे तर एखाद्या ग्राहकाने विक्रेत्याकडचे एखादे वाहन बुक केले, तर विक्रेता ते वाहन अॅपवर ब्लॉक करतो, त्याचवेळेस ते वाहन वेबसाईटवर लगेचच ब्लॉक होते. सर्व भागीदारांसाठी एकच व्यासपीठ वापरण्याच्या या प्रयोगामुळे बाजारपेठेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते, असं टीमचे म्हणणे आहे. अशा प्रत्येक व्यवहारावर टीम त्यांच्या भागीदारांकडून कमिशन वसूल करते. त्याशिवाय जॅकेट्स, हेड-गिअर किंवा सामान ठेवण्यासाठी जागा भाड्याने देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा टीमचा विचार सुरु आहे.

वापरकर्त्याने त्याचे शहर आणि त्याला किंवा तिला कोणत्या प्रकारचे वाहन (कार किंवा बाईक) भाड्याने हवे आहे त्याची निवड करायची. त्यानंतर सर्व वापरकर्त्यांना त्यांची ट्रीप कोणत्या तारखेपासून सुरु होते आणि कोणत्या तारखेला संपते त्याची तसेच वेळेची निवड करावी लागते. त्यानंतर बुक बटण दाबायचे. वाहन कुठून घ्यायचे आहे त्या स्थळासह वाहनांची यादी समोर येते. त्यासोबत विक्रेत्याच्या अटीही असतात. स्थळ किंवा वाहनानुसार ग्राहक त्याच्या पर्यायाची फेरनिवड करू शकतो.

एकदा का वाहनाची निवड झाली की मग वापरकर्ता डिलीव्हरीचे पर्याय आणि डिलीव्हरी कुठे मिळू शकते ते तपासू शकतो. समजा मित्रांचा एखादा ग्रुप सहलीसाठी चालला असेल आणि त्यांना वेगवेगळी वाहनं हवी असतील तर या वेबसाईटवर कार्टचाही पर्याय आहे. यामुळे वापरकर्त्याचा वेळ वाचू शकतो.

यानंतर वापरकर्ता पैसे भरू शकतो आणि एसएमएस आणि ईमलद्वारे बुकींगद्वारे त्याला सविस्तर माहिती मिळू शकते.आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी पेपलद्वारे पैसे भरण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

सध्या आम्ही सहा शहरांमधल्या २० भागीदारांसोबत करार केला आहे. यामधून जवळपास ९०० बाईक्स आणि १०० कार उपलब्ध आहेत, असं अंकित सांगतात. सध्या जवळपास ३०० नवीन ग्राहक दररोज बेवसाईटला भेट देतात तसेच जवळपास ८०० बुकींग दिवसांमध्ये २५० बुकींग्ज होतात,असे टीमचे म्हणणे आहे. दर आठवड्याला साधारणपणे २० टक्के वाढ होत आहे. सध्या या टीमचे उत्पन्न चार लाखांपेक्षा जास्त असल्याचा टीमचा दावा आहे. सध्या काम सुरू असलेल्या शहरांमध्ये आणखी चांगलं काम करण्याचं टीमचं ध्येय आहे.

ज्यांच्याकडे कार नाही पण ज्यांना कार चालवायची हौस आहे अशांसाठी भाड्यानं कार घेण्याचा उत्तम पर्याय आता उपलब्ध आहे. सध्या कारझोनरेन्ट, कार्टिसन आणि लेट मी ड्राईव्ह यांच्या झूमकार, जस्टराईड, रेव्ही, व्होलर कार्स आणि माईल्स या कंपन्या आहेत. कार भाड्यानं घेऊन स्वत: चालवण्याचा ट्रेंड अमेरिका आणि चीनमध्ये सध्या लोकप्रिय आहे. यासाठी तिथं हर्ट्झ, झिपकार, इएचाय आणि इतर कंपन्या निर्माण झाल्या आहेत.

गेल्या वर्षात गाड्यांच्या ऑनलाईन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालीये. वापरलेल्या कार, भाड्यानं कार घेऊन चालवण्यापासून गाड्यांच्या क्षेत्रातले सेवा पुरवठादार यांनी यातून चांगलंच उत्पन्न मिळवलंय. जून २०१५ मध्ये वापरलेल्या कारचे व्यवहार करणाऱ्या ट्रयूबिलनं के कॅपिटल आणि अनुपम मित्तल यांच्या माध्यमातून ५० हजार अमेरिकन डॉलरची गुंतवणूक मिळवली आहे. तर या महिन्यात गाड्यांच्या छोट्या जाहिरातींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ड्रूमनं एक कोटी साठ लाख अमेरिकन डॉलरची गुंतवणूक मिळवली आहे.

वेबसाईट : http://www.ziphop.in

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

पवईच्या झुमोटने आणलीय स्वस्त आणि आरामदायी ‘राईड शेअरींग’

महानगरांतर्गत प्रवासासाठी बाइक-टॅक्सीचा पर्याय?

मुंबईतले ‘कार’वाले 'ब्रोकर दलाल'

लेखक- सिंधु कश्यप

अनुवाद – सचिन जोशी

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags