संपादने
Marathi

चंदा कोचर यांना प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन

27th May 2017
Add to
Shares
9
Comments
Share This
Add to
Shares
9
Comments
Share

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे वार्षिक वेतन गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ६४ टक्क्यांनी वाढले आहे. त्यांना दिवसाला २.१८ लाख पगार तर मूळ वेतनात १५ टक्के वाढ झाली आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांचे वेतन २०१६-१७ मध्ये १२ टक्क्यांनी वाढले आहे. चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७.८५ कोटी रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षांत ही रक्कम ४.७९ कोटी रुपये होती.


image


गेल्या आर्थिक वर्षांत कोचर यांना २.६७ कोटी रुपये मूळ वेतन मिळाले आहे. तर कामगिरी लाभांश म्हणून त्यांना २.२० कोटी रुपये मिळाले आहेत. उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न कमालीचे वाढले आहे.

आधीचे वित्त वर्ष २०१५-१६ मध्ये खासगी बँकेला फारसे आर्थिक यश न मिळाल्याने कोचर यांना त्या वर्षांत कामगिरी लाभांश मिळाला नव्हता. कोचर यांचे मूळ वेतन गेल्या आर्थिक वर्षांत १५ टक्क्यांनी वाढले आहे. (आयएएनएस)

Add to
Shares
9
Comments
Share This
Add to
Shares
9
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags