संपादने
Marathi

खाजगी गुप्तहेर म्हणून भारतात काम करणे सोपे नाही

Team YS Marathi
15th Jun 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

रजनी पंडित, ज्या महिला शेरलॉक होल्मस् म्हणून प्रसिध्द आहेत, गुप्तहेर आहेत. या ५१ वर्षीय महिलेसाठी हा व्यवसाय निवडणे भारतात सहज शक्य नव्हते. इतकेच नाहीतर ज्यावेळी त्या त्यांच्या जीवनातील पहिल्या प्रकरणात काम करत होत्या त्यावेळी त्यांना ‘स्पाय’ म्हणजे काय ते सुध्दा नीट माहिती नव्हते.

रजनी ज्यावेळी महाविद्यालयात होत्या, त्यांच्या लक्षात आले की त्यांची मैत्रिण विचित्र वागत आहे, आणि त्यांनी ठरवले की हे शोधायचे की तिच्यासोबत काय वाईट घडले आहे. शोध घेतला आणि माग काढला तर लक्षात आले की ही मुलगी मोठ्या संकटात होती आणि त्यात तीची मदत करण्याची गरज होती. रजनीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, “ मी तिच्या पालकांशी याबाबत बोलले, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. मी तिच्या मागे सावलीसारखे राहण्याचे ठरविले, आणि तिची छायाचित्र घेण्याचे ठरविले. आणि तिच्या वडीलांना देण्याचे ठरविले, ज्यांनी मला सांगितले होते की, ‘ तू माझ्या मुलीला वाचविले आहेस’! 

ही त्यांच्या तीन दशकांच्या प्रवासाची सुरूवात होती, त्या भारतात गुप्तहेर म्हणून वावरल्या. पण रजनी यांना विना परवाना हे सारे काम करावे लागले. मात्र त्यामुळे त्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही, आणि त्या यशस्वीपणे धोकादायक आणि महत्वाच्या प्रकरणांचा शोध घेत राहिल्या.


Image: (L) – Times of India; (R) – iDiva

Image: (L) – Times of India; (R) – iDiva


खाजगी गुप्तहेर नियंत्रण कायदा विधेयक २००७ मध्ये राज्यसभेत सादर करण्यात आले, मात्र दशकापासून त्यावर धूळ साचली. त्यामुळे खाजगी गुप्तहेरांना सरकार दरबारी काहीच ओळख मिळू शकली नाही, आणि त्यांना नियंत्रीत करणारा कायदा होवू शकला नाही. ते वैध आणि अवैधतेच्या पुसट रेषेमध्येच काम करत राहिले आहेत.

त्यामुळेच भारतात खाजगी गुप्तहेर होणे सोपे राहिले नाही, आणि ज्यावेळी कुणी महिला हे करते त्यावेळी तर नाहीच. एका वृत्तानुसार रजनी म्हणतात, “ तपासकार्य करताना, आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात जसे की लोकांना दम भरणे किंवा दहशतीखाली ठेवणे ज्यातून पोलीसात गुन्हा नोंदवला जावू शकतो. पोलीस काही प्रमाणात खाजगी गुप्तहेर म्हणून आमच्या पासून जपून राहतात आणि अनेकदा आम्हाला त्रास देतात. जर येथे वैध कायदा असता आणि परवाना मिळाल्याने आम्हाला मोबाईल ट्रॅकींग वगैरे करता आले असते किंवा इतरही काही गोष्टी करता आल्या असत्या.”

सध्याच्या काळात जेंव्हा गुप्तहेर संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, मुख्यत: ज्यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी संस्था त्यात सहभागी होत आहेत, कवंर विक्रमसिंह अध्यक्ष एपीडीआय असे मानतात की त्यांना नियंत्रीत करणारा कायदा असायला हवा.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags