आचारी आणि खवय्यांना एकाच छताखाली आणणारे ʻरेस्टोकिचʼ

आचारी आणि खवय्यांना एकाच छताखाली आणणारे ʻरेस्टोकिचʼ

Thursday December 17, 2015,

2 min Read

ʻआचारी म्हणजेच शेफ हे खरोखरचे नायक असतातʼ, हे उदगार आहेत आयआयटी रुरकी येथील अभियंते मुकुल शर्मा यांचे. ज्यांनी दोन वर्षे युआय अभियंता म्हणून कामदेखील पाहिले आहे. मुकुल यांना कायमच खाद्य क्षेत्राची आवड होती. मुकुल यांच्या या आवडीत त्यांच्या कॉलेजमधील ज्युनियर अमित कुमारदेखील जोडला गेला आणि त्या दोघांनी हरहुन्नरी आचारी आणि खवय्यांची एक सामुदायिक बाजारपेठ (कम्युनिटी मार्केटप्लेस) तयार केली. याबाबत बोलताना मुकुल सांगतात की, ʻअनेकदा लोक आपल्या घरी जवळच्या मित्रपरिवाराकरिता तसेच नातेवाईकांकरिता लहान स्वरुपातील मेजवानीचे आयोजन करतात. मात्र या मेजवानीत बहुतेकवेळा आयोजकाचा अधिक वेळ हा स्वयंपाकघरातच जातो.ʼ या अडचणीवर उपाय म्हणून ʻरेस्टोकिचʼचा जन्म झाला.

image


यासंबंधी बाजारात संशोधन केल्यानंतर या दुकडीसमोर अनेक सत्य उलगडली. त्यापैकी एक आणि महत्वाचे म्हणजेच स्थानिक कॅटरिंग सेवा पुरवणाऱ्यांवर ग्राहकांची नाराजी असते. तसेच चांगले आचारीदेखील अनेक ग्राहकांना सापडत नाहीत. ʻआमचे ध्येय हेच होते की, ग्राहक आणि चांगल्या आचाऱ्यांमध्ये असलेली ही दरी मिटवून टाकायचीʼ, असे मुकुल सांगतात. रेस्टोकिच ग्राहकांना अनेक प्रकारच्या जेवणपद्धतीच्या सुविधा पुरवते. त्यात रात्रीचे जेवण, दुपारचे जेवण, नाश्त्याचे प्रकार, कॉकटेल पार्टीचे मेन्यू, सहलीचे मेन्यू तसेच वनभोजन यांचा समावेश आहे. नावाजलेल्या रेस्तरॉ आणि पबमधील आचारी खरेदी, जेवण बनविणे आणि ते वाढणे, ही कामे करतात. एखाद्या ग्राहकाला असा आचारी शोधण्यास मदत करणे, जो त्याच्या घरी असलेल्या साहित्याचा वापर करुन उत्कृष्ट जेवण बनवेल, ही रेस्टोकिचची मूळ संकल्पना असल्याचे अमित सांगतात.

सध्या पुणे आणि मुंबईत रेस्टोकिचला आचाऱ्यांकरिता व्यासपीठ उपलब्ध करुन द्यायचे आहे, जेथे ते त्यांच्या स्वतःच्या ब्रॅण्डची निर्मिती करू शकतील. मुकुल सांगतात की, ʻआचाऱ्यांना व्यवसायाकरिता कधीही हे आवडेल. तसेच यामुळे त्यांना नवे ग्राहकदेखील मिळू शकतील.ʼ भविष्यकाळात रेस्टोकिचची संकल्पना ही दिल्ली, बंगळूरू, चंदीगढ, गोवा, अहमदाबाद आणि हैद्राबाद या शहरांमध्ये विस्तारण्याचा या दुकडीचा प्रयत्न असेल. आचारी आपल्या सेवेकरिता ग्राहकाला किती पैसे आकारतो, त्याच्या टक्केवारीत रेस्टोकिचचा फायदा असतो. तसेच मेजवानी संबंधीतील कार्य़क्रमातून देखील रेस्टोकिचला आर्थिक फायदा होतो. किचनसर्फिंग नावाचा अशाचप्रकारचा एक प्रयत्न जागतिक स्तरावर केला जातो, ज्याला युनियन स्क्वेयर वेन्चर आणि किटचिट यांचा पाठिंबा मिळतो. रेस्टोकिचने प्रामुख्याने ही पद्धती भारतात आणली. याशिवाय बंगळूरू येथे सुरू झालेले कुकुंबरटाऊन नावाच्या व्यासपीठाने अनेक पाककृती प्रकाशझोतात आणल्या. पुण्यात स्थित असलेले डिशुमिटदेखील याच पद्धतीवर कार्यरत आहे. मुकुल आणि अमित यांना हीच खवय्येगिरी जवळून अनुभवायला मिळाली. रेस्टोकिचचा प्रवास भलेही आता सुरु झाला असेल, मात्र खवय्यांमध्ये त्यांची किर्ती पसरू लागली आहे.

लेखक - जुबिन मेहता

अनुवाद - रंजिता परब