संपादने
Marathi

अलशिया मोन्टॅनोने पाच महिन्याची गर्भवती असतानाही आठशे मीटर्स स्पर्धेत धावून दाखवले

Team YS Marathi
6th Jul 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

३१ वर्षांच्या या महिलेने जी न्यूयॉर्क येथील आहे तिने ८०० मीटर धावण्याच्या यूएस जागतिक जेतेपदाच्या स्पर्धेत भाग घेतला.

अमेरिकेच्या ऍथलीट अलशिया मोन्टॅनो यांनी यूएसएच्या ट्रॅकवर आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सॅक्रेमॅन्टो येथे फिल्ड आऊटडोर जेतेपदाच्या सराव सामन्यात मागील सप्ताहात भाग घेतला. महत्वाचे म्हणजे त्या वेळी त्या त्यांच्या दुस-या वेळेस पाच महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांची व्हायरल झालेली छायाचित्रे सांगतात की त्यांच्या सोबतच्या स्पर्धकांसोबत धावत आहेत आणि त्यांनी जगभरातील दर्शकांना अचंबित करून टाकले. अलशिया यांनी त्यांच्या सामर्थ्याचे प्रतिक म्हणून केसात फूल खोवले आहे, ज्यात त्यांच्या स्त्रीपणावर त्यांनी मात केल्याचे त्यांना दाखवून द्यायचे आहे.


image


मागील सप्ताहात खरेतर अलशिया यांनी दुस-यांदा त्या गर्भवती असूनही या स्पर्धेत भाग घेतला. सन २०१४मध्ये देखील त्यांनी याच स्पर्धेत भाग घेतला होता त्यावेळी त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या,त्यांची कन्या ही आता दोन वर्षांची आहे. अलशिया यांनी शेवटी स्पर्धा पूर्ण केली, मात्र त्यांनी माध्यमांना सांगितले की, त्या स्पर्धा जिकंण्यासाठी आल्या नाहीत मात्र त्यांचा हेतू त्यांच्या सारख्या महिलांचे प्रतिनिधित्व करण्याचेच होते.

अलशिया म्हणाल्या, “ या ठिकाणी मी खरेतर स्पर्धा जिंकावी म्हणून आले नाही, खरेच मला जिंकायचे नव्हते मात्र आतापर्यंतच्या प्रवासात जे पाहिले त्यातून काय होते ते पहात होते. माझ्यासाठी सर्वात छान गोष्ट तीच होती. एक ट्रॅक आणि फिल्डवरील ऍथेलीट म्हणून मला ही संधी मिळाली, मला वाटले ज्या लोकांना ही संधी मिळू शकत नाही त्यांचे प्रतिनीधीत्व करावे ज्यांना त्यांचा आवाज नसतो तो मिळवून द्यावा.”


image


त्या असेही म्हणाल्या, “ मी खूप वेगळ्या लोकांचे प्रतिनीधित्व केले. मी महिलांचे प्रतिनिधित्व केले. मी कृष्णवर्णीय महिलांचे प्रतिनिधित्व केले. मी गर्भवती महिलांचे प्रतिनिधित्व केले. मला वाटते ही माझीच जबाबदारी होती की, मी त्यांचा आवाज बनावे आणि त्यांच्यासाठी वकीली करावी.”

अलशिया यांनी सांगितले की, गर्भवती असताना महिलांनी व्यायाम केला तरी त्याबाबत चर्चा होते. गर्भवती असताना महिलांचा व्यायाम हे त्यांच्या मते सर्वसाधारण आहे. भारतात, खासकरून आपण अति कष्ट करणा-या महिला पाहतो ज्या समाजाच्या खालच्या आर्थिक स्तरातून येतात त्या नेहमीच शाररीक कष्टाची कामे त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत म्हणून करताना दिसतात. मात्र ज्या महिलां आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्यात गरोदरपणात काम केल्याने त्यांना काही इजा होईल अशी भिती दिसून येते. असे असले तरी, ज्या मातांना आरोग्यदायी रहायचे आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेवून आदर्श असा व्यायाम केला पाहिजे.


image


अलशिया, या स्वत:च प्रेरित झाल्या ते वंडर विमेन स्टार गॅल गॅडोट यांच्यामुळे ज्या आणखी एका सर्वपरिचित वंडर विमेनला स्पर्धे दरम्यान भेटल्या. गॅल गॅडोट या पाच महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्यांनी सूपरहिरो सिनेमाच्या चित्रीकरणात भाग घेतला होता आणि त्याची मुलगी बेली यांना नंतर सीजीआय तंत्राच्या मदतीने त्यांनी जन्म दिला.

अलशिया म्हणाल्या की, या धावण्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारच्या आजारपणाची जाणिव झाली नाही. त्यांनी खुलासा केला की, “ मला स्वत:ची काळजी कशी घ्यावी ते माहिती आहे. मी खूप पाणी प्यायले, खूप इलेक्ट्रोलाइट घेतले, जे अनेकदा अशा महिलांच्या बाबतीत ज्यांच्या गर्भात मूल आहे त्यांना अधिक उष्णता मिळवून देते जी नेहमीच्या तुलनेत जास्त असते,”. 

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags