संपादने
Marathi

हिंदी ऑनलाइन युजर्स ‘Raftaar.in’मध्ये ‘गिरफ्तार’

Team YS Marathi
29th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘मिशन : इम्पॉसिबल’-‘घोस्ट प्रोटोकॉल’ या आपल्या चित्रपटांच्या संदर्भात टॉम क्रूजने ट्विट केले होते, ‘‘हम वास्तव में भारत में हमारे मित्रो के साथ बातचित के लिये आगे देख रहें हैं जब ‘घोस्ट प्रोटोकॉल’ जल्दी ही बाहर आता हैं. अनिल कपूर चट्टानो MI 4’’ – क्रूजच्या या ट्विटमुळे त्याच्या फॅन्स आणि फॉलोवर्समध्ये कमालीचा गोंधळ उडालेला होता. विशेषत: वाक्यातल्या ‘अनिल कपूर चट्टानो MI 4’ या भागामुळे हा गोंधळ होता. लाडक्या टॉमला त्यासाठी खुल्या दिलाने क्षमा करा… कारण ही जी काय गडबड झाली आणि हा जो काय गोंधळ उडाला, त्याला खरे कारण जे काय ठरले, ते होते ‘ऑटो ट्रांसलेशन सॉफ्टवेअर’ (स्वयंचलित भाषांतर करणारे सॉफ्टवेअर). आणि टॉमने मलाही हिंदी किती ठसक्यात येते, हे दाखवण्यासाठी एका वाक्यात सांगायचे तर आपल्या भारतीय फॅन्सना इम्प्रेस करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरण्याची ‘फुलिश हरकत’ केली होती. म्हणजे मुर्खपणा केला होता. अर्थात त्याला मुर्खपणा तरी कसे म्हणावे, त्याने सॉफ्टवेअरवर भरवसा टाकलेला होता. आता सॉफ्टवेअरने दगा दिला तर त्याला बिच्चारा टॉमी तरी काय करणार? खरंतर टॉमीला ‘Anil Kapoor rocks in MI 4’ असं म्हणायचं होतं! आणि सॉफ्टवेअरनं ते शब्दश: अनुवादित केलं. यंत्राला भावार्थ काय समजणार म्हणा…

एका व्यक्तीने मात्र ही गडबड चांगलीच लक्षात ठेवली. आणि वारंवार या गडबडीची पुनरुक्तीही ते करत असत… ही व्यक्ती म्हणजे पियूष वाजपेयी… पियूष हे Raftaar.in चे संचालक आणि सहसंस्थापक. टॉमीची खरंतर सॉफ्टवेअरची ही गडबड पियूष यांनी लक्षात ठेवण्यामागे कारणही तसेच होते. पियूष हे अशा स्वरूपाच्या गडबडी दूर व्हाव्यात, दुरुस्त व्हाव्यात म्हणून २००५ पासून अविश्रांत कष्ट उपसत होते. इंटरनेटवर हिंदीचा वापर करणाऱ्यांना हा अनुभव (हिंदीचा वापर केल्याचा) अल्हाददायक व्हावा हा उद्देश पियूष यांच्या या कष्टांमागे होता. Raftaar.in हे एक हिंदी सर्च इंजिन आहे. ३०० दशलक्ष हिंदी बोलणाऱ्यांना (जे हिंदीतून इंटरनेटद्वारे अपेक्षित विषयाचा मागोवा घेतात) हिंदीतील आशयाचे आणि विषयांचे भंडार उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण सेवा हे सर्च इंजिन बजावतेय.

image


पियूष वाजपेयी, डॉ. लवीश भंडारी

रफ्तारडॉटइन हा प्लेटफॉर्म Indicus Analytics ‘इन्डिकस ॲअॅनॅलिटिक्स’शीच संलग्न असलेली कंपनी. इन्डिकस ॲअॅनॅलिटिक्सची स्थापनाही पियूष आणि त्यांचे भागीदार डॉ. लवीश भंडारी यांनीच केलेली. प्लेटफॉर्मला ८.५ दशलक्ष पेज व्ह्यू आजअखेर प्राप्त झालेले आहेत आणि महिन्याकाठी साइटला भेट देणाऱ्यांची संख्या २.५ दशलक्ष आहे.

पियूष म्हणतात, ‘‘इथून पुढे आपापल्या भाषेतून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची लाटच भारतामध्ये उसळणार आहे. आणि हे तुम्ही हमखास गृहितच धरायचे आहे. हे घडेलच. नेटवरले भाषाकेंद्रित सर्च (शोध) म्हणूनच सध्या एक लूट लो प्रॉपर्टी आहे. एकुण ताळतंत्रासाठी तसा हा नाजुक मामला आहे. कारण त्यामुळे स्थानिक नेट युजर आणि त्याला सुलभ असणाऱ्या भाषेतील गोष्टी त्याला (स्थानिक नेट युजरला) उपलब्ध होण्यातील अडचणी दूर होऊ लागलेल्या आहेत. दरीवर पुल आता उभा राहिलेला आहे. आणि तो दिवसेंदिवस मजबूत होत चाललेला आहे.’’

युअर स्टोरीने या आधीच Reverie Technologies आणि Linguanext या दोन कंपन्यांबद्दल लिहिलेले आहे. या दोन्ही कंपन्यांनीही अशाच प्रकारच्या भाषिक बाजारावर आधारलेल्या आपापल्या व्यवसायांवर सर्वस्व पणाला लावलेले आहे.

पोर्टलबद्दल थोडेसे…

पियूष म्हणतात, की इंटरनेटचे विश्व उदयाला आले तसे ‘रफ्तार’ची भारतातल्या इंग्रजी वेबसाइटसारखी रचना त्यांच्या डोक्यात होती. पियूष सांगतात, ‘‘गुगल आज लोकांना उपलब्ध करून देते तसे व्हॅनिला सर्च पेज तुम्ही लोकांना उपलब्ध करून दिले… आणि लोक तर आपल्याला काय शोधायचेय त्याबद्दल अनभिज्ञच असतात… म्हणजे नेमके काय शोधायचे हा प्रश्न वापरकर्त्यासमोर तसाच कायम असतो. अर्थात हे लक्षात यायला काही वेळ जावा लागला. ‘याहू’ आणि ‘रेडिफ’ ज्या ज्या म्हणून सुविधा आपल्या इंग्रजी वाचकांना उपलब्ध करून देते, तशाच सुविधा खरे तर कोणत्याही भाषेच्या वाचकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात.’’

‘रफ्तार’च्या सगळ्याच डोलाऱ्याचे तंत्रज्ञान हे कंपनीचे आपले तंत्रज्ञान आहे. कंपनीने स्वत:च त्याची उभारणी केलेली आहे. हे तंत्रज्ञान युजरला सोयीचे असे आहे. ‘रफ्तार’वरला आशय हळुवारपणे गती धरतो. सुची उपलब्ध करून देतो आणि आशयाचे वर्गीकरण करतो. सगळा आशय आपोआप वर्गिकृत होतो. युजरला त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. विषयनिहाय बातम्या वर्गीकृत असतात. गाण्यांचेही शैलीबरहुकूम वर्गीकरण केलेले असते. आणि असे बरेच काही.

पियूष सांगतात, ‘‘आमच्या पातळीवर आशयाची आम्ही अत्यंत सूत्रबद्ध अशी संरचना केलेली आहे. विषयनिहाय संघटित स्वरूपातील आशयामुळे तुम्हाला काय शोधायचेय, काय पहायचेय ते ठरवणे सोपे जाते. समजा जर गाणं हा आशय असेल तर ‘रफ्तार’ने गाण्याच्या गायक, अल्बम, प्रकाराबरहुकूम गाणी श्रेणीबद्ध केलेली आहेत. हवं ते गाणं ऐकायला यामुळे सोपं ठरणारच ना.’’

‘रफ्तार’चा जन्मच मुळात पियूष वाजपेयी, डॉ. लवीश भंडारी यांना भाषेबद्दल असलेल्या आत्मियतेतून झालेला आहे. पियूष सांगतात, ‘‘खरंतर मी एक कॉम्प्युटरमधील डाटा या विषयातला आणि लवीश हे एक अर्थतज्ज्ञ. विश्लेषणाच्या एका प्रक्रियेतून जात असताना आम्ही ठरवले की दहाव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदीतून एक अर्थशास्त्राचे पुस्तक साकारावे. लवकरच आमच्या लक्षात आले, की अरे इंटरनेटवर हिंदीतून काहीही म्हणून उपलब्ध नाही. म्हणायला हिंदीतून देशाच्या लोकसंख्येचा आकडा तेवढा नेटवर होता.’’ हिंदीतूनही नेटवर सामग्री असलीच पाहिजे, या भाषिक अस्मितेतूनच पुढे दोघांनी मिळून ‘रफ्तार’ची उभारणी केली. सात वर्षांत टप्प्या-टप्प्याने ‘रफ्तार’ने धरलेली गती ही खरोखर मती गुंगवणारी अशीच आहे.

साइटच्या नावावर कितीतरी पायंडे आहेत. ‘रफ्तार’ने पहिल्यांदा केल्या, अशा ढीगभर गोष्टी आहेत. ASCII हिंदी फाँटचे युनिकोड हिंदी फाँटमध्ये (आणि उलटही) रूपांतर करणारे ‘रफ्तार’ पहिलेच आहे. उच्चाराबरहुकूम किबोर्ड ‘रफ्तार’नेच आणला. ऑनलाइन हिंदी ज्ञानकोषही ‘रफ्तार’ने पहिल्यांदा आणला. युनिकोड आणि इतर आशयाची सूची देऊन दोन्हींतले विषय युजरच्या सुलभपणे आटोक्यात आणले. वर्णांची व्युत्पत्ती, प्रकार आणि रचना विशद करणे हिंदीतून ऑनलाइन करणारी तर ही एकमेव साइट आहे. देवनागरी लिपीतून हिंदी गाण्यांचा वेध घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणारीसुद्धा ही पहिली आणि एकमेव साइट आहे. देवनागरीतील आशय रोमन लिपीतून उपलब्ध करण्याची सुविधा देणारीही ही पहिली साइट आहे. असं खूप काही ‘रफ्तार’च्या नावावर जमा आहे.

image


सर्च, बातम्या, शिक्षण, डिक्शनरी, ज्योतिष, धर्म, गाणी, चित्रपट आणि ब्लॉग असे आनंदायी मिश्रण ही साइट आज सर्वांना उपलब्ध करून देते आहे. ‘रफ्तार’चे युजर्स हे बहुभाषी आहेत, पण बहुतांशी उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील हिंदी भाषकांचे प्रमाण त्यात साहजिकच लक्षणीय असे आहे. बहुतांश युजर्स हे नोकरदार आहेत. पाठोपाठ व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा त्यात भरणा आहे. दोन तृतियांश युजर्स हे स्वत:चे स्वयंचलित वाहन असलेले वर्गनिहाय ‘अ’ श्रेणीतील आहेत. पियूष ही माहिती देताना अभिमानाने भरून पावलेले असतात.

पियूष स्पष्ट करतात, ‘‘युजर अपेक्षित सर्चसाठी त्या-त्या शब्दातील वर्ण टाइप करत जातो, तसे त्याच्यासाठी पटलावर पर्याय येत जातात म्हणजे त्याला जे शोधायचेय तेही पूर्ण टाइप होण्यापूर्वीच पर्याय म्हणून प्रत्यक्ष पटलावर आलेले असते. व्यंजन, वर्ण आणि शब्दाचे इतर भाग उदाहरणार्थ मात्रा या संदर्भातील ‘इनपूट’मध्ये सक्षम होण्यावर आम्ही भर देतो. अधिकाधिक शुद्धतेवरही आमचा साहजिकच भर आहे. सगळ्या शब्दाच्या इनपूटवरही आमचा भर राहीलच, पण ज्यांना हिंदी उच्चार अधिक चांगल्या प्रकारे माहित आहेत, अशा लोकांनी इनपूट म्हणून ते आहेत तसे टाकण्याची खरंतर मूळ कल्पना आहे.’’

इनपूटची निवड युजरवर असली तरी रफ्तारची रचनाच अशा पद्धतीने झालेली आहे, की युजर सहजपणे हवे त्यासाठी क्लिक करू शकतो आणि सर्च करू शकतो. नेमक्या इनपूटवर अवलंबून राहण्याची वेळ त्यामुळे सहसा येत नाही. पियूष सांगतात, ‘‘गुगलही स्वयंचलित सूचना याबाबतीत (सर्च कंटेंट) देतेच. तशीच आमचीही आमच्या युजर्ससंदर्भात सहकार्याची भावना आहे.’’

जो कुणी हिंदी युजर आपल्या साइटवर येईल तो काही पट्टीचा नेटकर नाही, आपल्याला काय शोधायचे आहे, आपण कशासाठी नेटवर बसलेलो आहोत, नेटवर आपल्याला काय-काय मिळणार आहे, असल्या प्रश्नांपासूनच यातल्या बऱ्याच जणांची सुरवात आहे, हे गृहित धरूनच ‘रफ्तार’ने आपल्या पद्धती विकसित केल्या आहेत. म्हणूनच रफ्तारचा क्लिक अँड सर्च ॲअॅप्रोच अमृताशी पैजा जिंकणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

जाहिरातींच्या माध्यमातून ‘रफ्तार’ पैसा उभा करते आणि म्हणून निधीच्या बाबतीत ती स्वावलंबी आहे. तथापि, आपली व्याप्ती ‘रफ्तार’ला वाढवायची आहेच. लवकरच ‘रफ्तार’ आपली यात्रा मोबाईल आणि टॅबलेटच्या माध्यमातूनही सुरू करणार आहे. त्यासाठी जास्तीच्या निधीची गरज पडेलच.

‘रफ्तार’चे संस्थापक एका अर्थाने फार सुदैवी आहेत. कारण त्यांना समर्पित वृत्तीचे सहकारी लाभलेले आहेत. ‘रफ्तार’ची सगळी चक्रं हे सहकारीच फिरवतात. सल्लागार आणि फार फार तर थोडेफार मार्गदर्शन एवढेच काय ते पियूष आणि डॉ. लवीश यांच्या वाट्याला येते. म्हणून मग ते ‘इंडिकस अॅनॅलिटिक्स’कडे अधिक लक्ष देऊ शकतात. आणि का देऊ नये? ‘रफ्तार’च्या गतीतील ‘इंडिकस ॲनॅलेटिक्स’ची भूमिका म्हणजे इंधनासारखीच आहे. डाटाबाबत सदैव चौकस राहण्यात आणि त्या अनुषंगाने भविष्यातल्या योजना आखण्यात ‘इंडिकस अॅनॅलेटिक्स’च ‘रफ्तार’ला सतत मदत करत असते.

पियूष सांगतात, ‘‘रफ्तारच्या थेट शोध क्षमतांमध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणणे, इनपूट तंत्रात अधिकाधिक सुधारणा करणे हेच आमचे यापुढले उद्दिष्ट असेल.’’

लेखिका : प्रीती चमिकुट्टी

अनुवाद : चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags