संपादने
Marathi

तुम्ही तुमची जुनी वस्तू द्या आणि गरजेची दुसरी वस्तू घ्या, ‘प्लॅनेट फॉर ग्रोथ’ वर...

Team YS Marathi
25th Mar 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

कधी तुम्ही विचार केला आहे का की, ज्या वस्तूला आपण अनेकदा वापरून असेच फेकून देतो, मात्र ती वस्तू दुस-या कुणाच्या कामी येऊ शकते. किंवा घरातील एखाद्या कोप-यात ठेवलेले जे तुमच्यासाठी उपयोगाचे नसेल, ते दुस-या कुणासाठी महत्वाचे असू शकते. विशेष बाब ही आहे की, जर तुम्ही त्या वस्तूला दुस-याला कुणाला दिले आणि त्यांनी त्याच्या बदल्यात तुम्हाला आपली एखादी वस्तू दिली जी तुमच्या कामाची असेल, तर किती मजा येईल. अशातच दोघांच्या गरजा पूर्ण होतील, सोबतच या प्रक्रियेत पैशांची कुठली देवाणघेवाणही नसेल. ‘प्लॅनेट फॉर ग्रोथ’ असा एक मंच आहे, ज्याची निर्मिती वरूण चंदोला यांनी केली आहे. 

image


वरूण चंदोला यांचे सुरुवातीचे शिक्षण हल्द्वानीमध्ये झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते दिल्लीला आले. येथे दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी एमबीए केले. त्यांना सुरुवातीपासूनच संगीत, तबला आणि सामाजिक कार्याची खूप आवड होती. त्या दरम्यान ते त्या लोकांसाठी काम करू इच्छित होते, जे समाजाच्या प्रवाहासोबत नसून खूप मागे सुटले आहेत.

वरूण सांगतात की, “एक दिवशी मला अचानक वस्तू विनिमय प्रणालीचा विचार आला. मी विचार केला की, जुन्या काळात जेव्हा लोकांकडे पैसा नव्हता, तेव्हा ते एकमेकांमध्ये वस्तूंची देवाण घेवाण करून आपल्या गरजा भागवायचे. हे काम ते मोठ्या सहजतेने आणि कुठलेही वाद न करता करत होते. ते करू शकतात मग, आपण का करू शकत नाही. याच विचारांसोबत जानेवारी २०१५ला मी ‘प्लॅनेट फॉर ग्रोथ’ ची नोंदणी केली आणि नोव्हेंबर २०१५पासून काम करणे सुरु केले आहे.” 

image


वरुण यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “आज लोक आपल्या त्या वस्तूंना फेकून देतात, जी त्यांच्या गरजेची नसते. मी विचार केला की, आज ज्या वस्तू आपल्या गरजेच्या नाहीत, त्या दुस-या व्यक्तीच्या गरजेच्या असू शकतात. त्यामुळे आम्ही एक असे सामाजिक मंच उभारण्याचे ठरविले, जेथे वस्तूंची देवाण घेवाण होऊ शकेल.”

तेव्हा त्यांनी एक असे मंच उभारले, ज्यात वस्तू विनिमयच्या माध्यमाने दुस-यांची मदत करता येईल आणि दुसरी ही की ते त्यांच्या बनविलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना रोजगार देऊ शकतील. 

image


‘प्लॅनेट फॉर ग्रोथ’च्या काम करण्याच्या पद्धतीबाबत वरुण यांचे म्हणणे आहे की, या मंचामार्फत कुठलीही व्यक्ती आपले आणि दुस-यांचे भले करू शकते. त्यांचे म्हणणे आहे की, बाजारात रोज नवे सामान येत आहे. त्यामुळे लोक जुने सामान सोडून नवीन सामान घेतात. मात्र हेच जुने सामान दुस-यांसाठी गरजेचे असू शकते. या मंचावर आम्ही सामानांची देवाण घेवाण देखील करतो. ते सांगतात की, त्या मार्फत लोक पुस्तके, बूट, बॅग, कपडे इत्यादी सामानाची देवाण घेवाणच करू शकत नाहीत तर, आपल्या सेवांची देखील देवाण घेवाण करू शकतात. जसे कुणाला विदेशी भाषा शिकायची आहे, जसे की रशियन, फ्रेंच किंवा संकेतस्थळामार्फत त्याला शिकू शकतात. इतकेच नव्हे तर, जेवण बनविण्याची रेसिपी किंवा आपल्या दुस-या कलेला दुस-यांना शिकवू शकतात. 

image


‘प्लॅनेट फॉर ग्रोथ’ एक सामाजिक मंच आहे, जेथे कुणीही कुठूनही बसून ग्रामीण महिलांनी बनविलेल्या वस्तू आणि ओर्गनिक समान खरेदी करू शकतात. वरूण आपले संकेतस्थळ आणि फेसबुक मार्फत लोकांना जागरूक करून त्यांना सांगतात की, ते गैर जरुरी वस्तूंना दुस-यांना देऊन मदत करू शकतात. त्याव्यतिरिक्त ते अनेक हॉटेलवाल्यांशी बोलत आहेत, जेणेकरून ते आपले वाचलेले जेवण न फेकता, ते जेवण गरीब आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवतील. वरूण सांगतात की, “मी लोकांना हे सांगत नाही की, तुम्ही तुमच्या गरजा न भागवता दुस-यांची मदत करा. मी त्यांना सांगतो की, जे तुमच्या गरजेचे नसेल ते तुम्ही दुस-यांना दान देऊन त्यांची मदत करा.”

वरूण सांगतात की, सध्या त्यांनी उत्तराखंड सरकार सोबत एक करार केला आहे, ज्यात त्यांची संस्था त्या संघटना आणि स्वयंसेवी संस्थांकडून सामान खरेदी करेल आणि आपल्या संकेतस्थळामार्फत त्या सामानाला देश- विदेशात विकतील. आतापर्यंत त्यांच्या संकेतस्थळाने रशिया, ब्राझील, टर्की, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशच्या स्वयंसेवी संस्थाना स्वतःसोबत सामील केले आहे.

वरुण आपल्या वेलफेयर शॉपचे एप्रिलमध्ये अनावरण करत आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या शॉपमध्ये सध्या ऑनलाईनच आहे. हे संकेतस्थळ सामान्य संकेतस्थळासारखे नाही, ज्यात केवळ सामानच विकले जाते. ते सांगतात की, सध्या ते सरकारी अधिका-यांसोबत उत्तराखंडच्या अनेक भागात गेले आणि तेथे त्यांनी पाहिले की, महिला किती मेहनतीने आपले सामान बनवितात, मात्र बाजारात त्यांना विकू शकत नाहीत. वरूण सांगतात की, ते वेलफेयर शॉप मार्फत लोकांना हे देखील सांगतील की, कुठल्या लोकांनी त्याला किती मेहनतीने तयार केले आहे, जेणेकरून लोक या उत्पादनाला विकत घेण्यासाठी तयार होतील. 

image


नुकतेच वरूण आणि त्यांच्या गटाने ‘प्रत्येक पायात चप्पल’ नावाने एक अभियान चालविले, ज्यात एक हजार मुलांना त्यांनी नव्या चपला घातल्या. या कार्यक्रमाला हे आता वाढवू इच्छितात, त्यासाठी ‘रीलेक्सो’ कंपनीसोबत त्यांचे बोलणे अखेरच्या टप्प्यात आहे. यावेळी त्यांची योजना देशाच्या विविध भागांमध्ये जवळपास १०हजार लोकांना चप्पल घालण्याची आहे. हे लोकांना जागरूक करतात की, ते आपले कपडे सिग्नलवर राहणा-या गरीब लोकांना किंवा झोपडपट्टीत राहणा-या लोकांना कपडा दान करतील. इतकेच नव्हे, हे गरीब आणि भिकारी लोकांना समजावितात की, त्यांच्याकडे काम करण्यासाठी खूप काही आहे आणि जर त्यांनी स्वच्छ कपडे घालून काम मागण्यासाठी जातील, तर त्यांना काम मिळण्यासाठी समस्या येणार नाहीत. 

image


निधीबाबत वरूण यांचे म्हणणे आहे की, सुरुवातीची २०-२५ लाखांची गुंतवणूक त्यांनी स्वतः केली आहे. कारण, अधिकाधिक काम वस्तू विनिमयाचेच आहे, त्यामुळे सध्या सर्वात अधिक पैशांची गरज त्यांना पडलेली नाही. भविष्यात त्यांची योजना आपल्या कामाला देश आणि विदेशात आणण्याचे आहे. ज्यात गुंतवणुकीसाठी त्यांचे बोलणे राज्य सरकारसोबत अनेक दुस-या संस्थांसोबत सुरु आहे. प्लॅनेट फॉर ग्रोथ मध्ये सहा जण त्यांच्या वेगवेगळ्या स्थापनेत सामील आहेत, २० लोकांना त्यांनी स्वतःकडे कामावर ठेवले आहे आणि जवळपास २०० लोक त्यांच्या सोबत स्वयंसेवक म्हणून सामील आहेत. सध्या वरूण आपल्या या कामाला दिल्ली आणि डेहरादून येथून चालवत आहेत.

संकेतस्थळ : www.planetforgrowth.com

लेखक : हरिश

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags