संपादने
Marathi

७५वा दिवस: अजूनही ते माझ्या काळ्या त्वचेकडे तिरस्काराच्या, संशयाच्या नजरेनंच पाहतात...

Team YS Marathi
2nd May 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जगाला सामोरे जाण्यासाठी तिनं स्वत: ला तयार केलं तेव्हा तिलाच काहीसं किळसवाण वाटत होतं. ती रस्त्यावर चालत होती, तेव्हा सुरुवातीला तिला आत्मविश्वास नव्हता...पण तरीही तिनं चालायला सुरुवात केली. तिच्या पाठीवर रोखलेल्या नजरा तिला जाणवत होत्या आणि त्यांची कुजुबज तिला कानांत अगदी स्पष्ट ऐकू येत होती. तिनं घेतलेल्या बनावट रुपाबद्दल आणि तिच्या या प्रकारच्या पेहरावाबद्दलच ही सारी कुजबुज आहे हे तिलाही माहिती होतं. पण त्वचेच्या याच रंगाबद्दलचा असाच संवाद तर सुरु व्हायला हवा होता...आणि त्याबद्दलची उत्सुकताही निर्माण व्हावी अशी तिची इच्छा होती. शेवटी, यापुढचे १०० दिवस तिला अशाच प्रकारच्या यातनांमधून तिला जायचं होतं. अशाच प्रकारच्या यातना तर ७० टक्के लोकसंख्या त्यांचं संपूर्ण आयुष्यभर सहन करत असते. पण आदर निर्माण व्हावा किंवा स्विकारला जावा यासाठी तिच्यासारखं त्यांना गडद काळा रंग धुऊन टाकता येत नाही...त्यांना त्यांच्या गदड छायेत कायमचं राहवं लागतं. जया पी.एस यांना हे मात्र जाणवलं की आपण इतके संकुचित का आहोत याबद्दलच्या संवादाची ठिणगी त्या पाडू शकल्या.


image


जया पी.एस. यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत.

जया पी.एस यांनी प्रजासत्ताक दिनी स्वत: ला कळकट मळकट रंगात अगदी डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत माखून घेतलं होतं. सध्या त्या तिरुअनंतपूरममध्ये त्यांची बहीण, मैत्रीण आणि काकूंसोबत राहतात. पण आपल्या मनात अगदी खोल रुतून बसलेला काळ्या रंगाबद्दल असलेला तिरस्कार आणि दलितांबद्दलचे पूर्वग्रह दूर करण्यासाठी त्यांनी स्वत:ला काळ्या रंगानं माखून घेतलं होतं. फाईन आर्ट्समध्ये त्यांनी पदव्युतर शिक्षण घेतलं आहे. त्या पेंटर आहेत, शिक्षिका आहेत आणि कलाकारही आहेत...त्यामुळेच त्या या सामाजिक प्रयोगाकडे एक सादरीकरण, आविष्कार म्हणूनच पाहतात. शेवटी, कला ही बदलासाठी खूप परिणामकारक वाहन ठरू शकते. एकाच वेळेच ही निदर्शनंही होती आणि त्याचवेळेस कलाही...कला ही आपल्या कल्पना आणि विश्वास व्यक्त करण्याचे माध्यम होऊ शकते हे त्यांना माहिती आहे. “माझ्या सादरीकरणामध्ये माझं शरीर हे सगळ्यांत महत्त्वाचे माध्यम आहे. याबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मला थेट जाणवणं आवश्यक आहे. तसंच त्यांना माझ्या प्रयोगातून काय वाटतं हे जाणून घेणंही मला महत्त्वाचं वाटतं, “ असं त्या सांगतात.

imageकलाकाक्षी या कलेचा हा प्रकार आहे. हे एक कार्यकर्त्यांसाठीचं व्यासपीठ आहे. या माध्यमातून एखाद्या महत्त्वाच्या सध्या घडत असलेल्या विषयावर लोकांसोबत स्वत:ला जोडून घेता येते. सामजिक कार्यकर्ते, अन्य कलाकार, लेखक आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना सामाजिक उप्रकम, चर्चा आणि अन्य उपक्रमांमधून जोडून घेता येते. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशबरात निदर्शनं झाली. त्यानंतर २६ जानेवारीला कोचीमध्ये स्मरण रेहित वेमुलाचे हा कार्यक्रम कलाकाक्षीने आयोजित केला होता. त्याच्या आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठठीतले शब्द ऐकून अंगावर अजूनही काटा येतो..

imageजया त्यांच्या बहिणीसोबत...त्या त्यांचा गडद रंग तर धुऊन टाकू शकतात, पण ज्या लोकांसोबत त्यांचा लढा सुरु आहे, त्यांना बदलू शकत नाहीत...

जोपर्यंत या लढ्याला यश येत नाही तोपर्यंत एक कलाकार म्हणून त्या हा लढा कसा सुरु ठेवू शकतात याची त्यांना जाणीव झाली. त्यांचा भर शक्यतो दलितांच्या प्रश्नांवर असतो. आपल्या समाजात त्वचेचा काळा रंग म्हणजे वाईट असंच समजतात. काळ्या त्वचेवर लोक संशय घेतात. इतिहासात तर अशाप्रकारच्या तिरस्कारातून आपल्या समाजात बळीही गेले आहेत. पण अजूनही जातव्यवस्था सुरुच आहे. रोहित वेमुलाच्या बाबतीत काय घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीत, एक कलाकार म्हणून मला काही प्रश्न कसे उपस्थित करता येतील याचा मी सतत विचार करत होते. माझ्या कलेच्या माध्यमांतून त्या प्रश्नांना कशी वाचा फोडता येईल याचा विचार सुरु होता, असं त्या सांगतात.

आधी या फाजील धर्माभिमानाच्या तळापर्यंत जाण्याची जया पी.एस यांची इच्छा होती. लोकांकडून सादरीकरण सुरु असतानाच सतत प्रतिसाद मिळावा आणि त्याच वेळेस ते संवादातही गुंतून रहावेत, हे गरजेचं होतं. त्यासाठीच त्यांना एक अफलातून कल्पना सुचली...त्यांच्या शरीरालाच एक कॅनव्हास म्हणून वापरायची...म्हणजे एक वेगळा अनुभव घेता आला असता. शरीराचे प्रत्यक्ष दिसणारे सगळे अवयव काळ्या रंगांनं रंगवायचं त्यांनी ठरवलं...आणि हा प्रयोग तब्बल १०० दिवस करायचं त्यांनी ठरवलं...


image


वंशवादाच्या ५० छटा

काळा रंग लावून पहिल्यांदा घराबाहेर पडले, तेव्हा लोकांसमोर मी वावरू शकेन असा मला अजिबात आत्मविश्वास नव्हता, पण मला ते करायचंच होतं...असं त्या सांगतात. बस, रिक्षामधून प्रवास करताना, फूटपाथवरून चालताना अनेकांनी त्यांना विचारलं की त्यांना काही समस्या आहे का, कोणत्या अडचणीत आहेत का त्या...या सादरीकरणाबद्दल त्यांनी अनेक शंका व्यक्त केल्या. काही लोकांनी कौतुक केलं तर काहींनी टीका... पण मी त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली, असंही त्यां सांगतात. जिथे त्या चित्रकलेच्या शिक्षिका म्हणून काम करतात, तिथे पोहोचल्यावरही त्यांचे विद्यार्थी आणि पालकांनी त्या नेमकं काय करतायेत याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मी हीच संधी उचलली आणि जातव्यवस्था आपल्या समाजात नेमकं काय काम करते आणि माझी सादरीकरणाची संकल्पना त्यांना समजावून सांगितली, जया पी. एस सांगतात.

जया इथेच थांबल्या नाहीत. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणामध्ये त्या आणखी काहीतरी कलात्मक गोष्ट जोडत गेल्या. त्यांच्या सादरीकरणाचा ४२ वा दिवस होता आंतरारराष्ट्रीय महिला दिन...या दिवशी त्यांनी त्यांच्या काळ्या रंगाने रंगवलेल्या शरीरावर एलईडी लाईट्स लावून घेतले कोचीच्या अगदी गर्दीच्या रस्त्यांवर लज्जेची चाल अर्थात् वॉक ऑफ शेम घेतला. आपल्या सौंदर्याच्या परिमाणांना बदलण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला. एक भरतनाट्यम नर्तिका म्हणून जया यांना सरावाची तसेच अगदी परफेक्ट दिसण्यासाठी, सौंदर्याच्या परिमाणांना साध्य करण्यासाठी कार्यक्रमाच्या आधीही थोड्याशा मेकअपमध्ये राहण्याची सवय होती. “ एक शास्त्रीय नर्तिका म्हणून मला काळ्या रंगासह शास्त्रीय नृत्य सादर करण्याचं मी ठरवलं. कारण मला भारतीय शास्त्रीय कला प्रकारांमधील सौंदर्याची संकल्पना मोडायच्या होत्या, असं त्या सांगतात. त्यामुळे आपल्या मूर्खपणाची खूण म्हणून हे लाईट्स होते. आपण आपल्या सुंदर काळ्या रंगाच्या त्वचेलाफिकट रंगाआड दडवून टाकतो आणि आपल्याला वाटतं की आपण त्यामुळे सुंदर दिसतो.

तिचा महिला दिनाचा आविष्कार

आता यापुढे त्यांना या विषयावर चर्चा, परिसंवाद आयोजित करायचे आहेत, सादरीकरणाच्या दरम्यान चित्रत केलेल्या फोटो आणि व्हिडओजचे प्रदर्शन भरवण्याचंही त्यांच्या मनात आहे. तसेच त्यांच्या या उपक्रमामधील फोटो वापरून त्यांना दलित चळवळीमधील महत्त्वाच्या टप्प्यांसह एक कॅलेंडर करायचे आहे. त्याशिवाय त्यांना त्यांच्या १०० दिवसांमधल्या अनुभवांवर एक पुस्तक लिहायचं आहे. त्यामध्ये दलित कार्यकर्ते आणि अन्य मोहिमेंबद्दलच्या साहित्याचाही समावेश असेल.

मी माझ्या सादरीकरणानं लगेचच संपूर्ण समाज किंवा सरकार नाही बदलू शकत, पण मी काही प्रश्न नक्कीच उपस्थित करू शकते याची मला खात्री आहे, असं जया म्हणतात. आपली मानसिकता किंवा आपल्या समाजातली जात व्यवस्था परत तपासून बघण्याची गरज आहे, असं त्यांना वाटतं. त्यांना सोशल मिडीयावरून तसंच अन्य ठिकाणांहून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता पायाचा दगड तर रचला गेला आहे असा त्यांना विश्वास आहे..

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

लहानपणी आईसोबत रस्त्यांवर बांगड्या विकणारा कसा बनला आयएएस अधिकारी...

मुसलमान कुटुंबात शिक्षणाची ज्योत पेटवणारी वाराणसीची ‘नौशाबा’ 

मुस्लिम समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्नशील संस्था ठरली आहे बंधुभावाचे अद्भूत उदाहरण 

लेखक -बिंजल शाह

अनुवाद- सचिन जोशी

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags