संपादने
Marathi

कन्टेन्ट पायरसीचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्नशील ‘रॅकून’

9th Feb 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

जेव्हापासून कन्टेन्ट अस्तित्वात आहे तेव्हापासून पायरसीबाबतचा वादही अस्तित्वात आहे. मात्र आपल्यापैकी अनेकांना ही समस्या किती मोठी आणि सर्वव्यापी आहे हे लक्षात आलेले नाही. ही केवळ फिल्ममेकर्स आणि गायकांशी संबंधित समस्या नसून डिझाईन आणि कन्टेन्टचे काम करणाऱ्या सर्वच क्रिएटिव्ह व्यक्तींची समस्या आहे. जोपर्यंत या समस्येवर नेमका उपाय घेऊन ‘रॅकून’ पुढे आले नव्हते तोपर्यंत त्यांच्या या समस्येविरोधात नियमितपणे झगडणारेही त्यांच्याकडे कुणी नव्हते.

image


आयआयएम-सी चा माजी विद्यार्थी असलेला नरेश भारद्वाज कोणत्याही मोठ्या कल्पनेला लगेच फसला जायचा. त्याच्या नवीन उपक्रम सुरु करण्याच्या प्रयत्नांमुळे त्याच्या टेक महिंद्रा, याहू डॉट कॉम आणि कॅपिलरी या कोर्पोरेट कंपन्यांतील अनुभवांमध्ये वारंवार खंड आला. त्याने सुरुवातीला आय स्पोर्ट ही स्पोर्ट न्यूज वेबसाईट सुरु केली. त्यानंतर क्लासमेट ही इन-क्लासरुम कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम सुरु केली आणि अखेरीस ‘रॅकून’.

‘रॅकून’ची सुरुवात झाली तेव्हा त्याचे उद्देश्य पूर्णपणे वेगळे होते. ‘रॅकून’चा सहसंस्थापक असलेला २८ वर्षांचा आदित्य त्रिपाठी आणि नरेश आयआयएम-कोलकाताच्या कॅम्पसमध्ये शेजारी राहणारे मित्र. आदित्य बोर्डिंग स्कूलमध्ये असताना त्याच्या मनात कन्टेन्ट निर्माण करण्याविषयी आवड निर्माण झाली. त्याने शाळा आणि कॉलेजमध्ये असताना इन हाऊस मॅगझिनबरोबरच अजूनही बऱ्याच गोष्टींसाठी ग्राफिक डिझाईनचे काम केले होते. त्यामुळे डोळ्यांना भावेल असे ग्राफिक्स तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे त्याला चांगलेच माहिती होते. नरेशबरोबर मिळून ‘रॅकून’ची सुरुवात करण्यापूर्वी त्याने एअरटेलमध्ये सेल्स विभागासाठी वर्षभर काम केले.

ऑक्टोबर २०१३ मध्ये ‘रॅकून’ची स्थापना झाली. “रॅकूनमध्ये आम्ही सुरुवातीला स्थानिक बाय-बॅक मार्केटमधून घेतलेल्या वापरलेल्या स्मार्टफोन्सचे सहा महिन्यांच्या वॉरन्टीसह नूतनीकरण करु लागलो. मात्र काही महिन्यातच आमच्या लक्षात आले की रोखीचे व्यवहार आणि बेकायदेशीर आयातीचे वर्चस्व असलेल्या बाजारात आम्ही किंमतीच्या स्पर्धेत कमी पडत आहोत,” नरेश सांगतो.

त्याचवेळी स्मार्टफोन आणि फोन केसेसची ऑनलाईन आणि ऑफलाईन वाढती विक्री ते पहात होते. “आमच्या लक्षात आले की स्मार्टफोन हे एक पर्सनल प्रोडक्ट असूनही क्वचितच कुणाला याचा ऍपिअरन्स पर्सनलाइज्ड करुन घेणं परवडतं. यावर कस्टमाइज प्रिंट असलेली फोन केस हे उत्तर आम्हाला सापडलं,” तो सांगतो.

image


ऑगस्ट २०१४ मध्ये, ‘रॅकून’ कस्टमाइजेबल फोन केसची खूप मोठी रेंज बाजारात आणण्यासाठी खूप उत्सुक होते आणि डिसेंबर २०१४ पर्यंत त्यांनी सेल्फी, कार, सुपरहिरोज आणि अशा अनेक विलक्षण गोष्टी प्रिंट केलेल्या तीन हजारापेक्षा जास्त फोन केसेस विकल्या.

एप्रिल २०१५ मध्ये त्यांचा तिसरा सहसंस्थापक शिवप्रकाश श्रीपालजी त्यांच्याबरोबर काम करु लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या तंत्रज्ञान आणि प्रोडक्ट प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. त्यांच्या विक्री झालेल्या फोन केसच्या ट्रेण्डच्या संख्येवरुन त्यांच्या लक्षात आले की त्यांची ३० टक्के विक्री ही सेल्फी, फॅमिली पिक्चर आणि इतर पर्सनल गोष्टी प्रिंट केलेल्या फोन केसेसची आहे. उर्वरित विक्री झालेल्या फोन केसेसवर प्रमुख लोकप्रिय थीम्स प्रिंट केलेल्या होत्या. ज्यामध्ये टीव्ही शो, मुव्ही, स्पोर्ट्स, इंटरनेट मीम इत्यादीचा समावेश होता. यावरुन पॉप-संस्कृतीच्या संदर्भांच्या आधारावर बेहान्स, फेसबुक, इन्स्टाग्रामवर कन्टेन्ट तयार करणारा स्वतंत्र डिजीटल आर्टिस्टचा मोठा समुदाय असल्याचं त्यांनी ओळखले.

“दोन्ही गोष्टींचे एकत्रीकरण करण्याची ती योग्य वेळ होती. म्हणून आम्ही टी-शर्ट्स, पोस्टर्स आणि फ्रेम्ड आर्ट ही नवीन प्रोडक्ट्स बाजारात आणली. ‘रॅकून’च्या या नव्या व्यासपीठाच्या यशस्वीतेची चाचणी घेण्यासाठी ऑगस्ट २०१५ मध्ये आम्ही या आर्टिस्टना गाठलं. या व्यासपीठावर ते आपला पोर्टफोलिओ त्वरित कायदेशीररित्या वैध करु शकतात. हा प्रयोग ग्राहक आणि स्वतंत्र आर्टिस्ट या दोघांच्याही दृष्टीने यशस्वी झाला,” असं नरेश सांगतो.

‘रॅकून’ने दोन समस्यांवर उपाय उपलब्ध करुन दिला – ग्राहकांना दिला जाणारा हलक्या दर्जाचा माल ज्यावर त्यांचा आवडता कन्टेन्ट असायचा आणि कन्टेन्ट निर्माण करणाऱ्या कलाकारांना त्यांचे काम असणाऱ्या प्रोडक्टचा मिळणारा नगण्य मोबदला. या समस्या निर्माण होण्याला कारणीभूत ठरतो ग्राहकांना येणारा अस्थिर बाजाराचा अनुभव आणि उत्पादन निर्माण, वितरण यामधील अडचणी आणि कन्टेन्ट निर्मात्यांसाठी पायरसी. ग्राहकांना ब्रॅण्डेड शॉपिंगचा अनुभव देऊन आणि थोड्या किंमतीत किंवा विनामूल्य जलद गतीने व्यापारी माल विकसित करण्यासाठी कन्टेंट निर्मात्यांना मदत करुन ‘रॅकून’ या समस्या सोडवते.

पुढील संशोधनातून त्यांच्या निदर्शनास आले की मोठ्या प्रमाणातील ब्रॅण्डेड व्यापारी लॅण्डस्केपला यादीचा खर्च, वितरण आणि पायरसी अशा इतर अनेक समस्यांनी वेढलेले असते. भारतातील मोठे मीडिया ब्रॅण्ड (बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टुडिओ, टीव्ही ब्रॅण्ड्स) ब्रॅण्डेड वस्तूंची किरकोळ विक्री टाळण्याला पसंती देतात आणि त्यांच्या कन्टेन्टचा परवाना केवळ त्यांची उत्पादन यादी आणि मार्केट रिस्क घेऊ इच्छिणाऱ्या त्यांच्या भागीदारांनाच देतात. यु ट्यूब स्टार्स, परफॉर्मिंग आर्ट ट्रूप्स, ऑनलाईन कॉमिक्स यावरील वाढत्या समुदायानेही या व्यापाराचे फायदे पाहिले. मात्र ते वरील कारणांमुळे त्यांचे प्रोडक्ट्स बाजारात आणायला संकोच करतात.

आता रॅकूनने ‘स्वतंत्र’ आणि ‘मीडिया ब्रॅण्ड्स’ अशा सर्व प्रकारच्या कन्टेट निर्मात्यांना व्यापारी माल थोड्या खर्चात किंवा कुठल्याही खर्चाविना जलद गतीने विकसित करण्यासाठी मदत करणारा एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार कन्टेट निर्मात्यांना मालाची यादी आणि वितरण यांची व्यवस्था पहाण्याची गरज नाही.

“जून २०१५ मध्ये एकदा आम्ही ट्रॅक बदलल्यावर आम्ही लगेचच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि पार्टनरशिप प्रोग्रॅम सुरु केला. ऑगस्ट २०१५ च्या शेवटी हा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला. आमचा इमेज प्रोसेसिंग टेक्नोलॉजीचा मुख्य संच आता डिजीटल ग्रॅाफीक्स निर्माण करु शकणारी कोणीही व्यक्ती वापरु शकते. आता, एका हाय रिझोल्युशन ग्राफिक्सचा वापर करुन कोणताही कन्टेन्ट निर्माता ब्रॅण्डेड दुकानांमधून विकली जाऊ शकणारी १५० हून जास्त उत्पादने तयार करु शकतो,” नरेश सांगतो.

फोन केसेसच्या कस्टमायजेशनचा २०१५ मध्ये जवळपास ३०० दशलक्ष डॉलरचा व्यापार झाला. २०१४ मध्ये टी-शर्ट्सने दोन दशलक्ष डॉलर्सचा व्यापार केला होता. आता कन्टेन्ट निर्माते यासाठी काम करण्याकरिता सहजतेने यामध्ये उतरत आहेत.

image


इंटरनेटवरचे तुमचे आवडते थिंगअमबाब्स विविध प्रोडक्ट्सवर पोर्टेबल करणे ही आता ‘रॅकून’ची ओळख बनली आहे. या सुधारणेमुळे ‘रॅकून’ने प्रत्येक तिमाहीत निर्धारित लक्ष्य पार करुन यशाचे नवनवीन टप्पे पार केले आहेत. गेल्या १२ महिन्यात ३० हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी फोन केसेस खरेदी केल्या. यापैकी दहा हजार केसेस मार्च २०१५ पर्यंत विकल्या गेल्या होत्या आणि फेरबदल केल्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये त्यांच्या इतर मालाचे सहा हजार युनिट विकले गेले.

“डिजीटल प्रिंटींगमधील ग्राहक अनुप्रयोग ही अजूनही नुकतीच अस्तित्वात आलेली संधी आहे. विविध प्रकारचे प्रिंटेड प्रॉडक्ट्स बाजारात आणण्यासाठी अजून बराच वाव आहे. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उत्पादन यावर लक्ष केंद्रित करुन ब्रॅण्डेड वस्तूंच्या व्यापारातील अग्रगण्य होणं हे आमचं लक्ष्य आहे. या स्टेजला आम्ही मोठी मागणी असलेले २० कन्टेन्ट भागीदार आमच्याशी डिजीटली जोडण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याचबरोबर २०१६ मध्ये पाच नवी उत्पादने आमच्या यादीत समाविष्ट करायची आहेत,” नरेश सांगतो.

आजकालच्या पिढीला प्रेमपूर्वक नेटफ्लिक्स जनरेशन म्हटलं जातं आणि भारतामध्येही असे नेटफ्लिक्सर्स मोठ्या प्रमाणात आहेत. इंटरनेट आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा वेगाने होणारा प्रसार यामुळे जवळपास प्रत्येक शो आणि फिल्म फ्रॅन्चायजीचा स्वतःचा असा निष्ठावंत अनुयायांचा समुदाय निर्माण झालेला असतो. पॉप कल्चरचे संदर्भ हा तरुणांच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेचा एक मोठा भाग असल्याने या लोकांसाठी ती एक अतिशय वैयक्तिक अशी बाब आहे आणि म्हणूनच या संदर्भांना अंगावर घालण्याजोगे किंवा वापरण्याजोगे बनविणे ही निश्चितपणे एक अब्जावधी डॉलर्स कमवून देणाऱ्या उद्योगाची कल्पना आहे. मात्र हे क्षेत्र नेहमीच असंघटित आणि खर्चिक होते आणि म्हणूनच नरेशने नमूद केल्याप्रमाणे इथे पायरसीला खूप वाव होता.

फॅनफिक्शनची विस्तृत श्रेणी उपलब्ध असलेली खूप कमी पोर्टल्स आहेत आणि ‘रॅकून’चे बिझनेस मॉडेल हे दुधारी तलवार आहे. इथे एका बाजूला प्रामाणिक डिझाईन कलाकाराला चांगले व्यासपीठ मिळते, त्याचे कौशल्य वैध करण्यासाठी एक साधन मिळते आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध आकर्षक वस्तू उपलब्ध होतात. या कल्पनेचे प्रशंसक अनेक आहेत. त्यामुळे याला मागणी निश्चितच असेल. मात्र दर्जा आणि किंमत यामध्ये योग्य समतोल राखणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन पायरसी निर्मुलनाचा ‘रॅकून’चा मुख्य हेतू साध्य होईल.

यासारख्या काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

दिल्लीतली 'लॉराटो' एक हजार कायदेतज्ज्ञांच्या माध्यमातून देतेय कायदेविषयक परिपूर्ण सहाय्य

'एम-इंडिकेटर'द्वारे मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचलेले सचिन टेके

स्ट्रीट फॅशनला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देणारे 'स्ट्रीटबाजार.इन'

आणखी काही प्रेरणादायी यशोगाथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

 

लेखक : बिंजल शाह

अनुवाद : अनुज्ञा निकम

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags