संपादने
Marathi

गोपैसाच्या माध्यमातून अंकिता जैनचा बचतीचा मार्ग

Team YS Marathi
23rd Apr 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

दिल्लीतल्या प्रख्यात कलादालनांमध्ये तिच्या चित्रांचं प्रदर्शन भरावावं अशी तिची इच्छा आहे. कामाच्या ठिकाणी जायला तिला दीड तास प्रवास करावा लागतो. पण तिच्या आवडीचा मनमुराद आनंद घेत ती प्रवास करते. शनिवार, रविवार आला की शहराच्या कोलाहलापासून दूर, जवळच फेरफटका मारुन ती ताजीतवानी होऊन येते. 


image


भेटूयात, गोपैसाडॉटकॉम (GoPaisa.com) ची संस्थापक २५ वर्षीय अंकिता जैन हिला. भारतातली पैशांचा सर्वात जास्त परतावा करणारी आणि कुपन देणारी ही साईट आहे.

अंकिताचा जन्म आणि बालपण सूरतमध्ये गेलं. खाजगी एफएम रेडिओ कंपन्यांच्या मार्केटिंग विभागांमध्ये कामाचा तिला अनुभव आहे. तिला आयुष्यात सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड द्यावं लागलं ते म्हणजे तिचं लहान वय. वयाच्या १८ व्या वर्षीच तिनं कामाला सुरूवात केली. लहान वयामुळे तिला लोक फारसं गंभीरपणे घेतच नाही. 

अंकिताचा जीवनसाथी आणि व्यावसायिक आयुष्यातीलही भागीदार अमन जैनसोबत बराच खल केल्यावर गोपैसाडॉटकॉमची कल्पना त्यांना सुचली. अमन फायनान्समध्ये काम करत असताना, अंकितासोबत गुंतवणूक, विपणन या क्षेत्रातल्या संधीवर त्यांच्यात चर्चा होत असे. आणि मग एकेदिवशी कॅशबॅक म्हणजेच पैशाच्या परताव्यासंबंधी क्षेत्रात काम करण्याचं त्यांनी ठरवलं.

अंकिता सांगते, "मुंबईत २०११ मध्ये आमच्या एका मित्राच्या लग्नात आमची भेट झाली. कॅशबॅक म्हणजे काय? त्याचा आवाका यावर आमची बरीच चर्चा झाली. लंडनमध्ये असताना अमनने या सर्व गोष्टींवर काम केलं होतं. त्यावेळी भारतात इकॉमर्स क्षेत्रात कॅशबॅक प्रकाराची थोडी थोडी ओळख व्हायला लागली होती. पण कॅशबॅकचे पाय जमायचे होते. लोकांना त्यावेळी फक्त क्रेडिट कार्डवर कॅशबॅक हीच गोष्ट माहीत होती". 

२०१२ मध्ये गोपैसाडॉटकॉमला सुरूवात झाली. आज जवळपास साडेपाचशे ब्रँडसोबत गोपैसाडॉटकॉम जोडले गेलं असून कॅशबॅक क्षेत्रात भारतात त्यांचं नाव अग्रेसर आहे. 

आव्हानं - सुरूवातीची दोन वर्ष खूप अवघड गेली. अंकिता तेव्हा २३ वर्षांची होती. तिच्या लहान वयामुळे तिला लोकं गंभीरपणे घेत नव्हते. ती सांगते, "लोकं माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे मी खूप मेहनत करायला लागली. माझ्या कामाची प्रचिती आकड्यांमधून दिसून यायला लागली. काही काळानंतर आमच्यावर लोकं विश्वास ठेवू लागले आणि आमचा व्यवसाय वाढत गेला. हा सगळा व्यवसाय प्रामाणिकपणावर चालतो. या वर्षाखेर आम्ही आमच्या व्यावसायिक भागिदारांना साडेपाचशे कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करून देण्याचं आमचं ध्येय आहे". 

सुरुवातीला अंकिताने व्यवसायात इतर व्यावसायिकांना सहभागी करून घेण्याकरता खूप मेहनत केली. अजूनही पाळण्यात असल्याने त्यांच्याकडे भांडवल कमी अाहे. तरीही त्यांना बऱ्यापैकी नफा मिळत असल्याचं अंकिता सांगते. सध्या गुंतवणुकदारांसोबत त्यांची बोलणी सुरू आहेत. पण स्वतःच्या हिंमतीवर इथपर्यंत पोहचल्याचं एक आगळं समाधान त्यांना आहे. सध्या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा अधिकाधिक ऑटोमेटेड आणि स्वायत्त करण्याचं त्यांचं ध्येय आहे. 

गोपैसाकडे नोंदणी केलेल्या ग्राहकांनी मिंटा, जबांग, एक्सपिडीया, फ्लिपकार्ट यासारख्या गौपैसाकडे नोंदणी केलेल्या इ-कॉमर्स वेबसाईट्सवर खरेदी केल्यास त्यांना कॅशबॅक किंवा कॅशरिवार्डस् मिळतात. या साईटद्वारे ऑनलाईन खरेदीवर सूटही बऱ्यापैकी मिळते. अँड्रॉइड आणि आयओएस वर त्यांनी त्यांचं अॅप आणलं. वर्षभरातच एक लाख लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं.

वेबसाईट आणि अॅप मिळून दहा लाखापेक्षा अधिक ग्राहक गोपैसा वापरत आहेत. दिवसाला ५-६ हजार नवीन ग्राहक या साईटशी जोडले जात आहेत. ऑक्टोबर २०१४ मध्ये एक कोटीहून कमी जीएमव्ही होता. पण अॉक्टोबर २०१५ मध्ये कंपनीचा जीएमव्ही ५५ कोटी रुपयाच्या आसपास पोहचला. 

कॅशबॅक क्षेत्र - जागतिक स्तरावर इ-कॉमर्सचा २० टक्के व्यवसाय मान्यतप्राप्त साखळ्यांमधून चालतो. भारतातही आता हा प्रकार लोकप्रिय होत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरचा वेग भारतातही दिसून येईल. भारतात या क्षेत्राचा ३०-४० टक्के व्यवसाय गोपैसाच्या हातात आहे.

इ-कॉमर्सचा बाजार ६६६ अब्ज ६४ कोटी ५ लाख ते ९९९ अब्ज ९० कोटी ६७ लाख ५० हजार दरम्यान आहे. २०२० पर्यंत हा बाजार ६,६६६ अब्ज ०४ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज गुगल कडून व्यक्त करण्यात आला आहे. समजा हा बाजार१,३३३ अब्ज २० कोटी ९० लाख रुपयांवर पोहचला तरी यातून मिळणारं कमिशन ६,६६६ कोटी ४ लाख ५० हजार एवढं असणार आहे. ५-८ टक्के सरासरी कमिशन मिळालं तरी गौपैशाचं बाजारात वर्चस्व असणार हे नक्की. 

अंकिता म्हणते, "सर्व विभागांमध्ये एकाच वेळी बचत करता येईल असं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. औषध आणि धान्य विभागात सध्या खूप मागण्या नोंदवल्या जातात. लोकांच्या सवयी सध्या बदलत आहेत". 

महानगरांसोबतच नागपूर, अहमदाबाद, इंदूर, म्हैसूर या शहरांमधूनही त्यांना आता व्यवसाय मिळू लागला आहे. हरिद्वारच्या एका महिलेने गोपैसाने अॅप सुरू केल्याबद्दल अंकिताला फोन करून तिचे आभार मानले होते. ही महिला अंकिताला म्हणाली की, या अॅपमुळे आता तिलाही मोठमोठ्या बँडसची खरेदी करता येत आहे. आयपीएलच्या या मौसमात गोपैसाने ग्राहकांकरता खूप मस्त मस्त ऑफर्स आणल्या. अंदाजामध्ये सामील होत ग्राहकांच्या खात्यात गुण जमा होतात. आणि या सगळ्यात रक्कम कुठेही येत नाही. लोक त्यांच्या आवडत्या संघाना किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देतात.

छोट्या शहरांतील गुणवत्ता - आपल्या उद्योजकात्वाच्या या प्रवासात आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचं अंकिता सांगते. छोट्या शहरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. ती सांगते, "एखाद्या स्टार्टअपकरता कर्मचारी निवडताना बऱ्याचदा मोठ्या शहरातील आणि प्रसिद्ध शैक्षणिक संस्थामधील व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं. पण आम्ही छोट्या शहरांकडे वळलो. आम्हाला आवश्यक असणारे कोडर्स आणि डेव्हलपर्स आम्ही लहान शहरांमधून निवडले. लहान शहरांतील लोकांना कधीकधी नीटपणे मांडता येत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधलं जात नाही. त्यांना एकदा का संधी मिळाली की मग ते मागे वळून पाहत नाहीत. आपल्या हुशारीने ते सर्वांवर मात करतात".

कंपनीची संस्थापक या नात्याने अंकिता म्हणते की आमच्याकडे काही ठाम अशी संस्थापक सूत्र, ठोकताळे नाहीत. कोणीही अचूक नसतो. सर्वजण शिकत शिकतच पुढे येतात. कोणीही आम्हाला नवीन कल्पना सुचवू शकतो. मी आता कॉलेजेसमध्ये जायला लागले आहे. आमचा ग्राहक वर्ग १८-३५ या वयोगटातला आहे. त्यांना आमच्याकडून काय हवं आहे. आम्ही त्यांना काय देऊ शकतो. त्यांच्याशी संवाद साधून हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न करते.

कॅशकरो हा सध्या त्यांचा थेट स्पर्धक आहे. तर कुपनदुनिया हाही आता त्यांच्यासोबत स्पर्धेत उतरलाय. ग्राहकांना उत्तम सेवा देऊन त्यांच्यासोबतच्या स्पर्धेत बाजी मारायचीय असं अंकिता म्हणते.

प्रवास- अंकिता सांगते, "मी सूरतला असताना मला माझे निर्णय कधीच स्वतःला घ्यायला यायचे नाहीत. मी कधीच ऑनलाईन खरेदी केली नव्हती. पण माझ्या व्यवसायामुळे माझ्यात निर्णयक्षमता आली. मी लहानपणीच ठरवलं होतं की, कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं. मी च स्वतःची बॉस असेन. मला तेव्हा सर्व काही करावसं वाटायचं. कोणतही ध्येय ठरलं नव्हतं. मी या व्यवसायात आल्यावर माझ्यातला अल्लडपणा जाऊन परिपक्वता आली. आता मी विचारपूर्वक निर्णय घेते". या सर्व प्रवासात सासरच्या मंडळीचं तिला चांगलं प्रोत्साहन लाभत असल्याचं अंकिता सांगते. 

या व्यवसायात पतीच भागीदार असल्याने खूप सहजपणे काही गोष्टी होतात असं तिचं म्हणणं आहे. "व्यवसायात चढउतार तर असतातच. पण आम्ही आधी मित्र आहोत. घर आणि व्यवसाय यात आम्ही कधीच सरमिसळ करत नाहीत. दोन्हीकडे आमच्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतल्या आहेत". आठवडाभर काम करून मग आठवड्याच्या शेवटी शहराबाहेर जाऊन ताजतवानं व्हायला दोघांनाही आवडतं. 

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

गर्भारपणातच नव्या उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या श्रद्धा सुद

"तुम्हाला काही करण्याची उर्मी आहे, मग थांबू नका तुमची आवडच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल"

आपल्या यशाची वाट धुंडाळणाऱ्या सहा उद्योगसम्राटांच्या राजकन्या


लेखिका - सास्वती मुखर्जी

अनुवाद - साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags