संपादने
Marathi

बीटमायसॅलरीः लक्ष्य कर्मचारी भरती प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडविण्याचे...

Team YS Marathi
15th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

म्हैसुरमध्ये जन्म आणि कर्नाटकातील हरीहर या छोट्याशा गावात बालपण गेलेल्या कार्तिक प्रसाद यांना उद्योजक बनण्याच्या स्वप्नाने पछाडले ते वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच... २००० सालच्या सुरुवातीला त्यांनी त्यांच्या बेडरुममध्ये बसूनच एसेम्बल्ड डेस्कटॉप संगणक विकायला सुरुवात केली.... त्यांचे कुटुंबीय आणि मित्रच त्यांचे ग्राहक होते.

तर २००३ मध्ये कार्तिक यांनी त्यांच्या मित्रांसह एक गेमिंग स्टेशन सुरु करण्यासाठी एक किलोमीटरच्या परिसरात रहाणाऱ्या त्यांच्या सगळ्या मित्रांचे संगणक एकमेकांशी जोडून घेतले. भूमिगत लॅन आणि केबलिंगच्याद्वारे त्यांनी हे काम केले.

उद्योजगतेबद्दल असलेल्या आकर्षणातूनच त्यांना सिरियल आत्रंप्रुनरचा बहुमान मिळू शकला. २००४-०५ मध्ये त्यांनी खास तंत्रज्ञांसाठी म्हणून ब्लॉगसॅव्हीडॉटकॉम (blogsavvy.com) ची स्थापना केली. एक कम्युनिटी प्लेस (जसे की फेसबुक) म्हणून सेवा देण्याचा त्यामागे उद्देश होता. त्याला खरं तर चांगला प्रतिसाद मिळाला, पण देखभालीच्या अभावामुळे ते बंद करावे लागले. “ मला सर्व्हर्स आणि स्केल परवडू शकत नव्हते. कारण त्यावेळी इंटरनेट हे केवळ नेट कॅफेज मध्ये उपलब्ध असे आणि तासासाठी ८० रुपयांपर्यंत दर आकारला जात असे. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये भांडवल गुंतवू शकतील, असे गुंतवणूकदार मिळणे जवळजवळ अशक्यच होते,” कार्तिक सांगतात.

त्यानंतर एका राष्ट्रीय वृत्तपत्राने (व्हीटी, जो आता टाईम्स समूहाचा भाग आहे) विचारणा केल्यामुळे त्यांनी तंत्रज्ञान या विषयावर त्या वृत्तपत्रात एक लेखमाला चालविली.

image


२००६ मध्ये कार्तिक यांनी इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनेकशन्स या विषयात जीएमआयटी दावणगिरी (व्हीटीयु) मधून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. कॅम्पस प्लेसमेंटच्या वेळीच त्यांना टीसीएसमध्ये नोकरीही मिळाली. तर पुढे २००९ मध्ये त्यांनी कॉग्निझंट बिझनेस कन्सल्टींग कंपनीत नोकरीला सुरुवात केली.

अखेर २०१० मध्ये ते युकेला गेले. कंटेट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात त्यांनी मोठ्या रिटेल आणि इनव्हेस्टमेंट बॅंकांबरोबर कन्सल्टींगला सुरुवात केली. कार्तिक सांगतात, “ युकेमध्ये वर्षानुवर्षे माझ्या सर्व कंपन्या या सातत्याने फायद्यात राहिल्या आहेत आणि त्यांनी चांगला महसूलही मिळविला आहे. तसेच मी माझ्या कामामधून व्यावसायिकांशी उत्तम संपर्कही प्रस्थापित केला आहे.”

बीटमायसॅलरीचा प्रवास

२०१४ च्या अखेरीस कार्तिक यांची गाठ स्वॅश यांच्याशी झाली. लंडनमध्ये जन्मलेले स्वॅश तेथेच लहानाचे मोठे झाले होते. इनव्हेस्टमेंट बॅंकर आणि क्वालिफाईड चार्टर्ड अकाऊंटट असलेल्या स्वॅश यांना इनव्हेस्टमेंट बॅंकींग (मॉर्गन स्टॅन्ली, जेपी मॉर्गन आणि डाॅईच) क्षेत्रातील वीस वर्षांहून जास्त काळ कामाचा अनुभव होता.

image


कार्तिक असे एखादे उत्पादन तयार करण्यासाठी उत्सुक होते, जे रिक्रुटमेंट स्पेस अर्थात कर्मचारीभरती क्षेत्रात संभाव्य क्रांती आणेल आणि उमेदवार आणि रिक्रुटर्स अर्थात भरती करणारे, अशा दोघांनाही या दृष्टीने अधिक सक्षम करुन एकूणच भरती प्रक्रिया सुकर करेल. त्यादृष्टीने मग त्यांनी बीटमायसॅलरी (BeatMySalary) सुरु करण्याच्या कल्पनेबाबत स्वॅश यांच्याशी चर्चा केली. जॉब मार्केटमधील कटकटींचा चांगलाच अनुभव स्वतः घेतला असल्याने असाच एखादा उपक्रम सुरु करण्यासाठी स्वॅशसुद्धा तेवढेच उत्सुक होते. त्यामुळेच त्यांनी यामध्ये ५०,००० डॉलर्स सीड कॅपिटल म्हणून गुंतविण्याचा निर्णय घेतला.

बीटमायसॅलरीची सुरुवात भारतात (बंगळुरुमध्ये) मे, २०१५ मध्ये झाली आणि लवकरच त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. पहिल्याच महिन्यात त्यांचा व्यवसाय हा अपेक्षापेक्षाही चांगला झाला. ५०० उमेदवार आणि ५ रिक्रुटर्स मिळतील हा त्यांचा अंदाज असताना, प्रत्यक्षात मात्र त्यांना १५०० उमेदवार आणि ७५ रिक्रुटर्स मिळाले.

भारतात सुरुवात करण्याबाबत कार्तिक सांगतात, “ भारतातच या उत्पादनाचा विकास करण्यामागे दोन कारणे होती – एक म्हणजे, आवश्यक ती कौशल्ये भारतात असल्याचे आम्हाला माहित होते आणि माझे सर्व नेटवर्कही इथेच होते. तर दुसरे म्हणजे आमचे बजेट हे अगदी कमी असल्याने खर्च कमी ठेवणेही गरजेचे होते.”

युजर इंटरफेसचे काम बंगलोर स्थित डिजाईन कंपनीकडून करुन घेण्याच्या हेतूने कार्तिक यांनी इन्फोसिसचे माजी कर्मचारी रौनक जैन यांना आपल्याबरोबर घेतले. खर्च कमी करण्यासाठी म्हणून प्रोटोटाईपचा आराखडा स्वतः कार्तिक यांनीच बनविला. तर एकूणच या प्रक्रिया गतीमान करण्यासाठी म्हणून त्यांनी लोगो डिजायनर्सची एक लहान टीम आणि कंटेंट रायटर्सनाही बंगलोर येथे मदतीला घेतले.

या स्टार्टअपची नोंदणी जरी लंडनमध्ये झाली असली, तरी सुरुवातीच्या काळात केवळ भारतातच त्याचे विपणन केले गेले. तर सप्टेंबर, २०१५ च्या अखेरीस ते युकेमध्ये उपलब्ध झाले.

“ या उत्पादनाने सुरुवातीला भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आणि १२,००० च्या वर सोशल मिडिया एंगेजमेंटसह प्रचंड प्रतिसाद इथे मिळाला. आमच्याकडे २६० लिंक्डइन फॉलोअर्स आहेत – त्यापैकी ७५ टक्के वरिष्ठ व्यवस्थापनातील आणि व्हीपी दर्जाचे आहेत. तर सुमारे सत्तर टक्क्याहून जास्त उमेदवार हे उद्योगातील वरिष्ठ दर्जाचे असून आयआयटी-आयआयएम आणि इतर महत्वाच्या बी-स्कूलमधून शिक्षण घेतलेले आहेत,” कार्तिक स्पष्ट करतात.

बीटमायसॅलरीचे रिक्रुटर्स आणि उमेदवार हे किरकोळ विक्री, वित्त, आयटी, ऑटोमोबाईल, लॉजिस्टीक्स, एफएमसीजी, उत्पादन, विपणन, सेल्स आणि बिझनेस डेवलपेंट या क्षेत्रातील आहे.

बीटमायसॅलरी (बीएमएस) हे रिक्रुटर्स आणि अनुभवी उमेदवारांच्यासाठी बाजारपेठेतील पहिलेच अशा प्रकारचे उत्पादन असल्याचा कार्तिक यांचा दावा आहे.

उमेदवार बीएमएसवर नोंदणी करतात आणि रिक्रुटर्स कौशल्य, किवर्डस्, स्थान, सध्याचे आणि अपेक्षित वेतन, अनुभव आणि उपलब्धता याचा वापर करुन उमेदवारांचा शोध घेतात. उमेदवाराची सर्व माहिती एका आटोपशीर कार्डमध्ये (खेळ्यातील पत्त्यासारख्या) रुपांतरीत केली जाते, ज्यामुळे अशी सर्व कार्डस् एका बास्केटमध्ये एकत्र करता येतात आणि एकाचवेळी ते त्यांच्यापर्यंत पोहचू शकतात.

बीएमएसची अंतर्गत इमेल प्रणाली वापरुन, विशिष्ट शोधाशी जुळणाऱ्या अनेक उमेदवारांपर्यंत एक जॉब डिस्क्रिप्शन वापरुन पोहचवता येते. त्या जॉब डिस्क्रिप्शनसह ईमेल आल्यास, उमेदवार ती स्वीकारु शकतो किंवा नाकारुही शकतो (जेणेकरुन रिक्रुटरला त्यांच्याशी संपर्क साधण्याची परवानगी मिळू शकेल). जर उमेदवाराने ते स्वीकारले, तर रिक्रुटरला त्या उमेदवाराची सर्व सविस्तर माहिती त्यांच्या “स्वीकार” सुचीत मिळते (रिक्रुटरच्या डॅशबोर्डवर). त्यानंतर ते बीएमएसची अंतर्गत व्यवस्था वापरुन पुढील संपर्क करु शकतात.

“ रिक्रुटर्स आमचे अंतर्गत ईमेल किंवा अगदी फोन सुविधा वापरुन उमेदवारांपर्यंत पोहचू शकतात, रिक्रुटर्सना उमेदवाराचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी मिळत नाही. तसेच जर रिक्रुटर उमेदवारांच्या अपेक्षांनुसार नसेल, तर ते त्या जॉबसाठी त्या विशिष्ट उमेदवारापर्यंत पोहचू शकत नाहीत,” कार्तिक सांगतात.

हे पोर्टल वापरण्यासाठी रिक्रुटर्सना सदस्यता शुल्क भरावे लागते. बीएमएसची स्वतःची टेलिफोन प्रणाली वापरुन उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी रिक्रुटर्सनी विकत घेतलेल्या टॉक टाईमवर हे शुल्क आधारित असते. हे शुल्क आधारित आहे ते ‘वी ग्रो ऍज यु ग्रो’ या मॉडेलवर, ज्यानुसार दरमहा रिक्रुटर्सना पन्नास मिनिटांचा टॉक टाईम आणि उमेदवारांकडून पाच प्रतिसाद मोफत मिळतात. त्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या गरजेनुसार निवड करावी लागते.

बीएमएसकडे आज नोंदणी केलेले जवळपास १३० रिक्रुटर्स आहेत. यामध्ये स्टार्टअप्स, संस्था आणि मोठ्या ब्लु-चीप कंपनी जशा की एक्झोटेल, झायकस, टीएमएल, जस्टडायल, ऍमेझॉन इंडीया, टार्गेट कॉर्पोरेशन आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

कार्तिक सांगतात, “ उमेदवारांसाठी नोंदणी मोफत आहे. त्याचबरोबर त्यांना नोकरी मिळाल्यासही त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. आम्ही फक्त रिक्रुटर्सकडून आमचे पोर्टल वापरण्यासाठी आणि उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी सदस्यता शुल्क आकारतो. रिक्रुटर्सची सत्यता पडताळून पहाण्यासाठी आम्ही अतिशय कडक धोरणांचे पालन करत असल्याने सध्या आम्ही सुमारे शंभर रिक्रुटर्सनाच स्वीकृती दिली आहे.”

या वर्षभरात बीटामायसॅलरीचे लक्ष्य आहे ते ७५,००० अनुभवी उमेदवार आणि शंभर पेड रिक्रुटर्सपर्यंत पोहचण्याचे...आणि महसूलाचा विचार करता सुमारे पन्नास कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा मानस आहे.

कार्तिक पुढे सांगतात, “ २०१६ अखेरपर्यंत हे उत्पादन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स आणि मध्य-पूर्वेपर्यंत पोहचेल आणि ७० मिलियन डॉलर्स अंदाजे महसूल असेल. युके आणि भारतीय व्हीसी’ज कडून भांडवल उभारणीचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात विविध माध्यमांतून सुमारे दोन मिलियन डॉलर्स उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

करियरबाबतीत मार्गदर्शन करणारे ʻएम्पावर फ्युचर्सʼ

‘रिलिजमायअॅड’ने तंत्र-शक्तीतून रचला जाहिरात विश्वात एक इतिहास !

‘रेस्टोकिच’ : ‘आयआयटी रुडकी’चा पदवीधर पुरवतोय ‘शेफ’

लेखक - अपराजिता चौधरी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags