संपादने
Marathi

पॉल सिरोमोनी यांना भेटा; असा माणूस ज्याने वयाच्या नव्वदीत पीएचडी पदवी मिळवली!

Team YS Marathi
6th Apr 2017
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

चेन्नई मधील ९० वर्षीय पॉल एस सिरोमोनी, यांनी पीएचडी पदवी मिळवली आहे. ज्यातून त्यांनी दाखवून दिले आहे की शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी तुम्ही कधीच म्हातारे होत नाही. निवृत्तीनंतर काम सुरू करत, त्यांचा प्रबंध पूर्ण होण्यास तीन वर्ष लागली आणि त्यांना २०१७च्या फेब्रूवारीमध्ये डॉक्टरेट मिळाली. याबाबतच्या वृत्तानुसार, त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता ‘God’s call to the church to join in transforming the world into a kingdom of love.’


image


पॉल यांनी सरचिटणीस म्हणून वायएमसीए मध्ये काम केले आणि नंतर सेंट मार्क कँथेड्रल येथे ‘औद्योगिक चमू सेवा’ चे प्रमूख होते. ते सहा परिक्षांच्या प्रक्रियेतून गेले, तीन दीर्घ परिक्षा होत्या, आणि अनेक प्रकारच्या परिषदानंतर त्यांना डॉक्टरेट मिळाली.

या दरम्यान त्यांनी तरुणांच्या मनोवैज्ञानिक भूमिकांचा जवळून अभ्यास केला. त्यात त्यांना बहुतांश तणाव आणि नैराश्याने पछाडल्याचे दिसून आले. पॉल यांनी इंडियन सोसायटी फॉर अप्लाइड बिव्हेरियल सायन्स ची सुरूवात करत सौहार्दपूर्ण वातावरणात ज्ञान आणि जाणिव जागृती निर्माण करत शिस्त आणि क्षमतांचा विकास करण्यासाठी प्रसाराचे काम हाती घेतले. आयएसएबीएस ही मुल्याधारीत संस्था आहे, जी व्यक्तीच्या मानवी प्रतिष्ठा आणि स्वायत्तता यांचे समूह संस्था आणि समाजातील स्थान मिळवून देण्याचे काम करते. आयएसएबीएस ही संस्था समाज, विकास आणि मानवी मुल्याच्या अभिसराणातील सततच्या प्रक्रियांवर संशोधन, प्रयोग, प्रायोगिकतेवर आधारीत वागणूकीच्या शास्त्रांचा अभ्यास करते.

पॉल, जे निस्वार्थ माणूस म्हणून आपला बहुतांश वेळ बंगळुरूच्या झोपडपट्टी भागात लहान मुलांना मुल्य शिक्षण देण्यासाठी तसेच आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी व्यतीत करतात. त्यांनी सेवाभावी संस्था सोबत सहभागीता केली आहे आणि अभियान सुरू केले आहे ‘ जॉय ऑफ गिव्हींग विक’ ज्यात ते लाइट हाऊस रेल्वे स्थानकावर रात्र घालवण्यासाठी जातात, त्यांच्या सोबत ५० च्या आसपास व्यावसायिक, विद्यार्थी असतात ज्यानी त्यांना पीएचडीच्या संशोधनासाठी आग्रह केला.

त्यांच्या पत्नी, जॉयसे सिरोमोनी, ज्या ८७ वर्षांच्या आहेत, त्या देखील मानवतावादी आहेत. ज्या नेहमी गरजू लोकांना मदतीसाठी पुढाकार घेतात. त्यांचे कार्य वयाच्या ३४व्या वर्षी सुरू झाले, त्यांच्या कार्यात त्या लोकांच्या पुनर्वसनासाठी आग्रही असतात आणि त्यांना अनेक प्रकारच्या मानसिक आजारापासून वाचवितात. एमबीबीएस पदवीधारक ज्यांच्या जवळ स्त्री रोग तज्ञ म्हणून परवाना आहे, त्यांनी भारतामध्ये आणि युके मध्ये अनेक रूग्णालयात सेवा दिली आहे. परिपूर्णता (हाफवे होम) पुनर्वसन केंद्र जे त्या कोलकाता येथे चालवितात, त्यात अनेक रूग्ण आहेत. त्यांना सीएनएन-आयबीएन चा रिअल हिरो पुरस्कार २०१० देखील मिळाला आहे. त्यांच्या एका मुलाखती दरम्यान पॉल म्हणतात.

“ योगायोगाने आमच्या संस्कृतीने आम्हाला मर्यादा घातल्या आहेत आणि आमच्या संस्कृतीवर अर्थव्यवस्थेचा परिणाम आहे”.

या सुदृढ जोडप्याला सक्षमपणे वाटते की, निम्मी लोकसंख्या एक किंवा त्यापेक्षा जास्त मानसिक आजारांनी ग्रस्त आहे, कारण जग अमानवीपणे चालते. यासाठी त्यांच्या माध्यमातून ते यथाशक्ती प्रयत्न करत असतात की या जगाला प्रेम आणि शांतीच्या माध्यमातून योग्य प्रकारे सुधारता यावे. - (थिंक चेंज इंडिया)

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags