उस्मानाबादचा मोहित कोलंगडे फेसबुकच्या माध्यमातून महिन्याकाठी कमावतोय ९० हजार रुपये
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया पासून कोणीच दूर राहू शकत नाही. सर्वांकडे स्मार्टफोन्स उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक मिनिटाला आपण चेक करत असतो की कोणी काय पोस्ट टाकली. सोशल मीडियावर वेळ घालवणं म्हणजे एखाद्या व्यसनाच्या आहारी जाण्यासारखं आहे अस म्हटलं जातं. असं असलं तरी याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकजण अर्थार्जनही करत आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो, करोडो रुपये कमावले जाऊ शकतात याचेच उत्तम उदाहरण आहे उस्मानाबाद जिल्यातील कळंबचा मोहित कोलंगडे हा इंजिनियरिगाचा विद्यार्थी. मोहित चक्क फेसबुकवरून महिन्याकाठी ९० हजार रुपये कमावतो.
मोहितने “आयच्या गावात आणि बाराच्या भावात” हे पहिले फेसबुक फेज २०१० ला सुरु केले. त्याच सोबत आज इंजिनियरिंग फंडा, विश्वास नागरे पाटील फॅन हे फेसबुक पेज तो चालवतो. या मागचे कारण म्हणजे सोशल मीडियावर मराठी मध्ये खूप कमी मनोरंजन होत असल्यामुळे लोकांचे मनोरंजन व्हावे, लोकांनी सतत वाचत राहावे या हेतूने त्याने हे फेसबुक पेज तयार केले, असे मोहित सांगतो.
मोहितच्या पेजसला आजपर्यंत मिळालेले लाईक्स
आईच्या गावात आणि बाराच्या भावात - ४ लाख ८२ हजार
इंजिनियरिंग फंडा - ४ लाख २० हजार
विश्वास नागरे पाटील फॅन - अडीच लाख
मोहित या आधी तासानतास मित्रांसोबत फेसबुक वर गप्पा मारत राहणे, वेळ वाया घालवणे असं करत असे. इचलकरंजीला इंजिनियरिंगला असताना इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासाठी विशेष काही करता येईल का, यावर तो विचार करत असे आणि मग एक वर्षानंतर 'इंजिनियरिंग फंडा' नावाचे फेसबुक पेज त्याने काढले, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला, त्यामुळे मोहित आणखीन उत्साहित होऊन कामाला लागला.
अभिनेता मकरंद अनासपुरेच्या नावानेही त्याने फेसबूक पेज ओपन केलं आणि त्याला नाव दिलं “मक्या रॉक बाकीचे वाचाडे फॉक्स” हे कॉमेडी पेज होतं, त्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, आज ते पेज डिलीट झाले आहे. मोहितने स्पर्धापरीक्षा देणाऱ्यांसाठी विश्वास नागरे पाटील यांच्या नावे पेज काढले, त्यावर एमपीएससी, युपीएससी करणाऱ्या लोकांना मार्गदर्शनपर लिखाण करणे त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणे. त्याचसोबत विविध प्रश्न, फोटो एडिट करून टाकणे, या पेजला आता वर्ष होत आले आहे. मोहित, विश्वास नागरे पाटील यांना कधी भेटला नाही, पण थोड्याच दिवसात ते ही पूर्ण होईल असं तो आत्मविश्वासाने सांगतो.आयच्या गावात आणि बाराच्या भावात, इंजिनीअरिंग फंडा या दोन पेजच्या माध्यमातून मोहितला पैसे मिळतात आणि त्यासाठीच तो जास्त पोस्ट टाकतो. मोहितनं २०१२ नंतर पेजेसचा वापर वेगवेगळ्या वेब साईटला, न्यूज मिडीयाला प्रमोट करण्यासाठी केला. त्यातून मोहितला महिन्याला ९० हजारापर्यंत उत्पन्न मिळतं.
या सर्व पेजसवर डेटा टाकण्यासाठी हिंदी, मराठी, इंग्लिश या भाषेतील जोक्स टाकणे, कधी प्रश्न टाकणे त्याचा मराठी अनुवाद करणे हे काम मोहित करायचा. डेटा मिळविण्यासाठी Whatsapp चा पण तो उपयोग करतोय. त्यावरील जोक्स पेज वर टाकणे काही वेळेला ते एडिट करणे, आकर्षक कसे दिसलं आणि वाचनीय कसे होईल या कडे लक्ष देणे. मित्रांसोबत गप्पा गोष्टी करताना जोक्स, व्यंग त्याचाही मोहित उपयोग करतोय. कधी काही विशेष मार्गदर्शन पर वाचनात आले तर ते पोस्ट करणे. सुरवातीला मोहितने जे काही केलं ते फक्त लोकांच्या मनोरंजनाच्या हेतूने केलं, नंतर त्याला लोक विचारू लागले की आमच्या पोस्ट टाकशील का? त्यातून मग आणखीन नवीन आयडीया येत राहिल्या आणि मग कमर्शियलकडे वळलो, असं मोहित सांगतो.
मोहितच्या नवीन घराचे बांधकाम सुरु आहे, त्याला 'फेसबुक हाउस' असे नाव देणार आहे आणि त्याला हे नाव त्याच्या मैत्रिणीने सुचवले आहे. कारण फेसबुक मुळेच त्याला सर्व काही मिळालं. घराच्या बांधकामासाठी त्याने काही पैसेही दिले आहेत. त्याने बाईकही याच पैश्यातून घेतली आहे आणि त्यांच्या आणि कुटुंबियांच्या सर्व गरजा तो पूर्ण करतो आहे. मोहित दिवसातून फक्त पाच तास सोशल मीडियासाठी देतो त्या वेळात यु टूब, फेसबुक, न्यूज, गुगल विकिपीडिया पाहतो. वेब पेजसकडे काम म्हणून तो कधीही पाहात नाही, तर फक्त एक आवड म्हणून याकडे तो पाहतो. त्यावेळातून थोडा वेळ तो फेसबुकसाठी देतो.
मोहितला जर फेसबुक कडून ऑफर आली तर काम करण्यासाठी इच्छुक आहे. भविष्यात मोहित स्वतःची वेबसाईट सुरु करणार आहे आणि त्या साईटला प्रमोट करणार आहे. ज्या व्यक्तीला फेसबुक वरून पैसे कमवायचे आहे त्यांना तो सांगतो की, "सुरवातीला तुम्हाला फारसा प्रतिसाद किवा पैसा मिळणार नाही. कधी महिन्याला तुम्हाला शंभर रुपये मिळतील तर कधी दिवसाला. लक्षपूर्वक काम केलं आणि तुमची क्रियेटीविटी दाखवली तर नक्कीच यात यशस्वी व्हाल. आज फक्त फेसबुकच पैसे कमवण्याचे साधन नाही तर युटूबच्या माध्यमातूनही पैसे कमावले जाऊ शकतात".
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा :