संपादने
Marathi

सा-या आर्थिक स्टार्टअप्सना आवाहन: आयएसएमई एसीई, भारतामधील सर्वात मोठे आर्थिक गतिवर्धक उपलब्ध झाले आहेत

Team YS Marathi
13th Jul 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

आयएसएमई एसीई उपलब्ध करून देत आहेत इतर बाबीं प्रमाणेच एक लाख डॉलर्सचे बीज भांडवल, आर्थिक सेवा देणा-या भागीदारी संस्था, मार्गदर्शक म्हणून प्रकाशझोत, विपणन आणि तंत्रज्ञानाचे पाठबळ. [जर तुम्ही फिनटेक स्टार्ट अप असाल सर्वप्रथम आयएसएमई एएसई मध्ये अर्ज करा त्यासाठी [ www.ismeace.com] येथे संपर्क करा]

आयएसएमई एसीई – भारतातील सर्वात मोठे आर्थिक गतीवर्धक १२ स्टार्टअप या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू करत आहेत. त्यासाठी त्यांनी अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे, ज्यात एक लाख डॉलर्स पर्यंतचे बीज भांडवल स्टार्टअपना पुरवण्यात येणार आहे आणि बरेच काही.

आयएसएमई एसीई चे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यंमंत्री देवेंद्र फडणविस यांनी २६ जून रोजी लोअर परळ येथे केले, जे भारताच्या आर्थिक क्षेत्रात सर्वात मोठे संशोधन आणि उद्योजकतेला दिले जाणारे प्रोत्साहन आहे.


image


या प्रसंगी बोलताना राधा कपूर, संस्थापिका आणि कार्यकारी संचालिका दि थ्री सिस्टर्स इंन्स्टिटयूशनल ऑफिस, म्हणाल्या की, आयएसएमई एसीईचे तत्वज्ञान डिआयसीई वर आधारीत आहे. डिझाईन, इनोवेशन, आणि क्रियेटिवीटी पूर्ण एन्टरप्रेनरशिप कळीचे चालक म्हणून कार्यान्वित करणे. एक तरूण महिला उद्योजिका, म्हणून मला निश्चितपणे वाटते की, आपल्या कडच्या पर्यावरणाच्या भौगोलिकतेच्या मदतीने निसर्गाला येत्या काळात नक्कीच फायदा देता येईल ज्यातून उद्योजकता आणि रोजगार देणारे तयार होतील.”

गतिवर्धकांनी विकसित अशी सहव्यवस्था निर्माण केली आहे की, आर्थिक स्टार्टअप आयएसएमई एसीई कार्यक्रमात सहभागी होत आहेत. ज्यात आयएमबी ऍमेझॉन यांच्यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी आहेत. लुथ्रा ऍण्ड लुथ्रा कायदेशीर सल्ला देण्यासाठी आहेत. दि इंडियन एंजेल नेटवर्क, टिआयई आणि लेट्स वेंचर गुंतवणूक आणि उद्योजकता यांच्या पाठबळासाठी, केपीएमजी माहिती आणि ज्ञानासाठी, लेट्स टॉक पेमेंटस् संशोधनात्मक भागीदार म्हणून आणि एडब्ल्यूएफआयएस पायाभूत सुविधा सहभागीदार म्हणून मुंबईत नसणा-या स्टार्ट अप्सना जागा जागा मिळवून देण्यासाठी.

अपराजीत भांडारकर, मुख्य गतिवर्धन अधिकारी, आयएसएमई एसीई, म्हणाले की, “ फिनटेक स्टार्टअप्स मोठ्या आर्थिक- वित्त संस्थाशी स्पर्धा करताना भागीदारी करतात आणि एकत्रीकरण करतात. अशावेळी स्टार्टअप्सना संस्थांच्या तंत्रज्ञानात कपात करावी लागते आणि संस्था त्यानंतर ग्राहकांना तेच लागू करतात त्यासाठी ते सध्याचा ग्राहक डाटाबेस वापरतात. आयएसएमई एसीई या प्रकारच्या एकत्रीकरणाला आळा घालते त्यासाठी स्टार्टअपना मोठ्या वित्तीय संस्थांशी संपर्क निर्माण करुन देते.”

आयएसएमई एसीईचा प्रकाशझोत असणारे क्षेत्र खालील प्रमाणे आहेत:

पर्यायी कर्जपूरवठा

आर्थिक पतपुरवठा

स्मार्ट विश्वसनीयता आणि सुरक्षा

विमा तंत्रज्ञान

संपत्ती नियमन आणि रोबो ऍडवायझरी

अदायगी आणि लाभकारीता

ग्राहक सेवा

या क्षेत्रात सामान्य माणसाचे आर्थिक व्यवहार होत असतात, अदायगी, उसने-उधार, कर्ज, विमा आणि गुंतवणूक. स्टार्टअप एकतर बी टू सी किंवा बी टू बी किंवा बी टू बी टू सी अशा प्रकारच्या आर्थिक उलाढाली करत असतात, त्यांचे या गतिवर्धक कार्यक्रमात स्वागत आहे. 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags