संपादने
Marathi

'द व्हिक्टोरीया मेमोरीयल स्कूल फॉर द ब्लाईंड'च्या विद्यार्थ्यांची थक्क करणारी मसाज कला !

Narendra Bandabe
13th Feb 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

मुंबईत नुकत्याचसुरु झालेल्या काळा घोडा आर्ट फेस्टीवलमध्ये जाण्यासाठी प्रचंड गर्दी असते. सुरक्षा कड्यातून आतमध्ये जायलाच अर्धा ते पाऊण तास लागतो. आतमध्ये कला अविष्कांराची मांदीयाळी आहे. जो तो आपला कॅमेरा हातात घेऊन तिथले देखावे टिपण्याचा प्रयत्न करत असतो. तिथली कला आणि खाऊ गल्लीचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर पाय दुखायला लागतात. अगदी पायाचे तुकडे पडतात म्हणा ना. हाच थकवा घालवण्याची सोयही तिथं करण्यात आलीय. तुम्ही चालून थकलात तर पायाला मसाज करण्यासाठी द व्हिक्टोरीया मेमोरीयल स्कूल फॉर द ब्लाईंडच्या स्टॉलकडे तुमचं लक्ष जातं. तिथं अंध बांधव आपल्या पायाला मसाज करण्यासाठी सज्ज असतात. काळा घोडा आर्ट फेस्टीवलच्या इतर स्टॉल बाहेर गर्दी असते ना तश्शीच गर्दी या मसाज आउटलेटच्या बाहेरही असते. आपआपला मसाज करण्यासाठी लोक रांग लावतात हे विशेष.


image


दिसत नसलं तरी मसाजचं ट्रेनिंग घेतलेले द व्हिक्टोरीया मेमोरीयल स्कूल फॉर द ब्लाईंडच्या विद्यार्थ्यांच्या या मसाज कले कडे पाहिलं तर तुम्हाला तोंडात बोट घालावं लागेल. अगदी प्रोफेशनल मसाजरपेक्षा किती तरी चांगल्या पटीनं ते मसाज करतात आणि तुम्हाला रिलॅक्स करतात. दहा मिनिटांचे ५० रुपये आणि २० मिनिटांचे १०० रुपये असे या मसाजचे चार्ज. अगदी सर्व सामान्यांना परवडतील असे. हे या आउटलेट बाहेरच्या गर्दीचं मुख्य कारण आहे. यातून मिळणारा ७० टक्के निधी हा या मसाज करणाऱ्या अंध मसाजर्सना देण्यात येतो आणि ३० टक्के संस्थेला जातो. मसाजिंग हे अंध व्यक्तींसाठी कमवण्याचं एक साधन होऊ शकतं हे यातून प्रकर्षांनं जाणवलंय आणि संस्थेचा हाच एक उद्देश आहे.

image


द व्हिक्टोरीया मेमोरीयल स्कूल फॉर द ब्लाईंडमध्ये अंध व्यक्तींच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक कार्यक्रम आखले जातात. या संस्थेची स्थापना १९०४ ची. आज सुमारे ११२ वर्षे ही संस्था अंधांसाठी अविरतपणे काम करतेय. इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी खास असं प्रशिक्षण दिलं जातं. मसाजिंग हे त्याचपैकी एक आहे.

फुट मसाज, रिफ्लेक्सॉलॉजी, नेक एन्ड हेड मसाज, फुल बॉडी मसाज असे विविध प्रकार या अंध व्यक्तींना शिकवले जातात. डोळस व्यक्तींपेक्षा मसाजिंगचे गुण शिकुन घेण्याची कसब जास्त असते असे संस्थेतर्फे सांगण्यात आलं. यातून मग या अंध व्यक्तींना कमाई करण्यासाठी विविध दालनं उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात येतं. य़ातून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व काही इथं करता येतं.

image


या अशा कार्यक्रमामुळे आपण या समाजात मान वर करुन राहू शकताे असा आत्मविश्वास मिळाल्याचं हे अनोखे मसाजर्स सांगतात. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मसाजद्वारे एखाद्याचं दु:ख कमी करण्याचा आनंद आहेच. शिवाय मसाज करणे ही आमच्यासाठी कला आहे. जसं काळा घोडा फेस्टीवलमध्ये इतर कलाविष्कार पाहण्यासाठी लोक येतात. तसंच आमच्या या कलेचाही मनमुराद आनंद लोकांनी घ्यावा असं आमचं म्हणणं आहे. असं इथं मसाज करणारे सांगत होतें.

image


“यांच्या हाताचा स्पर्शच तुमच्या शरीरात एक वेगळी उर्जा भरतो”, असं संतोष प्रजापती सांगत होते. “यांचं ट्रेनिंग उत्तम झालंय. यामुळे कुणाला कसं मसाज करावं याची पुरेपुर कल्पना यांना आहे. अगदी फूट मसाज ते ब़ॉडी मसाज असं सर्व काही प्रोफेशनल पध्दतीनं केलं जातं. ही कलाच आहे.”

यामुळे इथं येणारे लोकही खुश आहेत. हे विशेष. मसाज द्वारे रोजगाराची संधी उपबल्ध करुन देण्याचा द व्हिक्टोरीया मेमोरीयल स्कूल फॉर द ब्लाईंडचा उपक्रम खरंच कौतुकास पात्र आहे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

फेरीवाला ते कोट्यवधींचा मालक, डोळस व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या एका अंधाचा साहसी प्रवास

अंध मुलांच्या ‘प्रगती’साठी लढणार्‍या सुहासिनीताई मांजरेकर

‘प्रोजेक्ट स्टारफिश’ लाखो अंधांसाठी नव्या आयुष्याचे नाव

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags