संपादने
Marathi

वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी चीन तयार करत आहे; व्हर्टिकल फॉरेस्ट!

16th Feb 2017
Add to
Shares
7
Comments
Share This
Add to
Shares
7
Comments
Share

आज, प्रदुषण हा जगातला महत्वाचा विषय झाला आहे, सा-या जगभरात त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आणि मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. चीन आता हरित पर्यावरण हा विचार घेवून काम करत असून त्यातून बांधकाम क्षेत्रात त्यांनी व्हर्टिकल फॉरेस्ट ही संकल्पना सुरु केली आहे.


Image Source- Inhabitat

Image Source- Inhabitat


असे दोन टॉवर्स ज्यांना नानजिंग ग्रीन टॉवर्स म्हटले जाते, तयार करण्यात आले आहेत ज्यावर अकराशे झाडे लावण्यात आली आहेत. याशिवाय २५०० कँसकँडिंग रोपे लावण्यात आली आहेत. त्यातून रोपे झुडपे आणि वृक्ष अशा ६५हजार वनस्पतीने या इमारती साकारण्यात आल्या आहेत. या ग्रिन टॉवर मध्ये २५ टन कार्बन शोषून घेण्याची व्यवस्था असून दररोज साठ किलो ऑक्सिजन ते तयार करत आहेत.

या टॉवर्स पैकी, एकाची उंची दोनशे मीटर तर दुसरा १०८ मिटरचा आहे. त्यांचे बांधकाम २०१८ पर्यंत पूर्ण होते आहे. त्यापैकी उंच असलेल्या टॉवरला ३५ मजले आहेत. त्यात कार्यालये, वस्तुसंग्रहालय आणि शाळा असेल, जी हरित उभारणीचे प्रशिक्षण देईल. लहान टॉवर मध्ये २४७ खोल्या आहेत. त्याच्या छतावर क्लब आहे, तसेच स्विमींग पूल देखील!

स्टेफेनो बोरेई हे त्याचे वास्तुविशारद असून त्यांच्या या काही पहिल्याच डिझाइन नाहीत. अश्याच प्रकारच्या इमारतींचा आराखडा त्यांनी यापूर्वी मिलान, इटली आणि स्विझर्लंड मध्ये केला आहे. अशा प्रकारचा आराखडा पूर्वी केवळ कागदावर असायचा, मात्र प्रत्यक्षात इटलीमध्ये बॉस्को व्हर्टीकलला यश मिळाल्यानंतर तसेच टॉवर स्विझर्लंडमध्येही उभारण्यात आले. चीन आता तिसरा देश आहे, ज्याने या आरेखनावर काम केले आहे.

झाडे आणि रोपे जमिनीवर लावली जातात तशीच येथेही लावली जातात, आणि अधिक काळजीपूर्वक लावली जातात. त्यामुळे जास्तीचे कॉंक्रीट देखील वाचते, या आरेखनात व्यक्तिगत मिनी-गार्डन दिले जाते, ज्याचा तेथे राहणा-याना आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे हिरवाई फुलवण्याची सुवर्णसंधी असते जेथे झाडे लावण्यास जागा नसल्याने साधारणत: मनाई केली जाते.

अशाप्रकारे व्हर्टिकल फॉरेस्ट संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाची नवी संकल्पाना राबविली जात आहे, ज्यातून हिरवाई सोबतच शुध्द हवा, आणि जीवनाचा स्तर देखील उंचावण्याचे काम केले जाते. अर्थातच याचे सारे श्रेय त्या आरेखनाला आणि त्याच्या वास्तुविशारदलाच जाते!

Add to
Shares
7
Comments
Share This
Add to
Shares
7
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags