संपादने
Marathi

सरकारद्वारे रस्त्यावर 3 डी झेब्रा क्रॉसिंग बनवून दुर्घटना टाळण्यासाठी मदत करणाऱ्या माय-लेकी

Team YS Marathi
10th Apr 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात. सरकार अशा दुर्घटना थांबवण्याचा कसोटीने प्रयत्न करीत आहे, पण अहमदाबादमधील माय- लेकींनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी एक कलात्मक उपाय शोधला आहे. सौम्या पांड्या ठक्कर व त्यांची आई शकुंतला ठक्कर यांनी कुशलतेने झेब्रा क्रॉसिंगला थ्रीडी रुपात रंगवून नवे रूप दिले आहे. यासाठी या जोडीने दुसऱ्या देशातून प्रेरणा घेऊन झेब्रा क्रॉसिंगला जमिनीशी समांतर अशा पद्धतीने रंगविले की वाहन चालकांना तो काहीसा उंच झालेला जाणवतो त्यामुळे साहजिकच वाहनाची गती कमी होते व अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होते. 

image


अहमदाबाद येथील सौम्या पांड्या ठक्कर या मूळतः पेशाने एक व्यावसायिक पेंटर आहेत ज्या गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सगळ्यात मोठी अॅक्वा शॅडो पेंटिंग बनवली, ज्यासाठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले. आपली आई शकुंतला ठक्कर यांच्याबरोबर त्यांनी आपल्या व्यावसायिक कामाची सुरुवात केली. 

सौम्या सांगतात की, "एक दिवस महामार्गावरील कामाची पाहणी करण्यासाठी रस्ते अधिकाऱ्यांचा फोन आला. ज्याप्रमाणे पाश्चात्य देशातील रस्त्यांवर थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग आहेत त्याच पद्धतीचा प्रयोग आपल्याला मेहसनाच्या महामार्गावर करायचा आहे. कारण या महामार्गावर अनेक शाळा व महाविद्यालये आहेत, जिथे त्यामुळे अनेक अपघात होतात."

image


सौम्या सांगतात की, ‘आम्ही त्यांना एक-दोन डिझाईन पाठवल्या त्याला त्यांनी दोन दिवसातच पसंती दिली. त्यानंतर आम्ही त्या महामार्गाला 3D पद्धतीने रंगविले.’ सौम्या सांगतात की त्या एक व्यावसायिक पेंटर असल्यामुळे लोकांना त्यांचे काम आवडते व या कामासंदर्भात त्यांच्याकडे अनेक गोष्टींची विचारपूस होते. या प्रयोगाने शंभर टक्के अपघात थांबवू शकत नसले तरीही निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. तथापि या प्रकारच्या झेब्रा क्रॉसिंगने अपघात कमी झालेत पण निश्चित आकडेवारी किती आहे ते सांगू शकत नाही. फोटो बघून अनेक लोक सांगतात की ही कल्पना भयानक आहे ज्याला बघून कोणताही ड्रायव्हर अचानक ब्रेकच लावेल. 

सौम्या यांना वाटते की, "आपले डोळे 2D पेंटिंगच बघू शकता, 3D पेंटिंग बघण्यासाठी आपल्याला चष्मा लावावा लागेल तसेच एका ठराविक अंतरावरून व कॅमेऱ्याच्या कोनातूनच आपण ते बघू शकतो, परंतु रोडवर चालणाऱ्यांना या तिरप्या रेषा व काहीसे वेगळे डिझाईन आणि त्याचे रंग दिसतात. ज्यामुळे ते या झेब्रा क्रॉसिंगला निरखून बघतात."

image


मेहसाना महामार्गावरील या यशस्वी प्रयोगानंतर रस्ते अधिका-यांनी आजुबाजूचे झेब्रा क्रॉसिंग अश्याच काही वेगळ्या पद्धतीने रंगवून घेतले आहेत म्हणजे लोकांचे लक्ष जास्तीत जास्त याबाजुला केंद्रित होऊन अपघात कमी होतील.

आपल्या भविष्यातील योजनेबद्दल त्या सांगतात की, त्यांचा प्रयत्न हा देशातील दुसरे आंतरराष्ट्रीय महामार्ग सुद्धा 3D किंवा नवीन उपक्रमाद्वारे रंगविले जावेत. 

त्या सांगतात की, "आंतरराष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आपल्या योजनेत विचारपूर्वकच बदल करण्याचा प्रयत्न करतात परंतु कधीतरी आपल्याला पहिले पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे तरच बदल हा शक्य आहे. जर आमच्या कामाला अशा पद्धतीने प्रोत्साहित केले तर आमच्याजवळ अनेक नवीन कल्पना आहेत ज्याच्या अवलंबनाने दुर्घटनांवर प्रतिबंध लावला जावू शकतो".

लेखिका : गीता बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags