संपादने
Marathi

टेस्टींग, मेजरींग आणि कॅलिब्रेटिंग टूल्स ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे एकमेव पोर्टल ‘लॅबबाझार’

Team YS Marathi
13th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

पायाभूत सुविधांना अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. त्यांच्या विकासामध्ये इतर अनेक उद्योगांचा विकास सामावलेला असतो. बांधकाम उपकरणांचा उद्योग हा पायाभूत सुविधांच्या वाढीवर थेट अवलंबून असणाऱ्या अनेक उद्योंगामधील एक आहे.

बांधकाम उपकरणांच्या उद्योगात दहावर्षांहून जास्त काळ काम केलेल्या राहुल गुप्ताच्या निरीक्षणानुसार प्रत्येक व्यवसायागणिक इण्डस्ट्रीअल प्रोडक्ट सेगमेंटला कमी दर्जाची उत्पादने आणि किंमतीमधील तफावतीमुळे गालबोट लागलेले आहे. तो त्याच्या एका मित्राचे उदाहरण देतो जो एक बांधकाम कंपनी चालवत होता आणि त्याने टेस्ट आणि मेजरिंग उपकरणे बाजार भावाच्या जवळपास दुप्पट किंमतीत विकत घेतली होती.

राहुल सांगतो की अशी टेस्ट आणि मेजरिंग उपकरणे सहजरित्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांची किंमत आणि उपयोगाबाबत पारदर्शकता राहत नाही त्यामुळे असं घडतं.

image


ग्राहकांना चांगल्या दरात अस्सल उत्पादनांचा पुरवठा करुन लॅब सप्लाईजची उपलब्धता वाढविण्याच्या मुख्य कल्पनेसह ऑक्टोबर २०१५ मध्ये ‘लॅबबाझार’ सुरु करण्यात आले. “आम्हाला सगळ्या प्रकारची उपकरणे एका माध्यमावर उपलब्ध करुन द्यायची आहेत. जेणेकरुन सर्व प्रकारचे टेस्टिंग, मेजरिंग आणि कॅलिब्रेशन टूल्स मिळणारे बाजारातील एकमेव ठिकाण अशी ओळख लॅबबाझारला प्राप्त होईल,” असं ‘लॅबबाझार’चा संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष असलेला ३३ वर्षांचा राहुल सांगतो. त्याने दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली आहे. त्याला लॅबोरेटरीजच्या क्षेत्राचा दहावर्षांहून जास्त अनुभव आहे. तो आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यशाळाही घेतो.

५० लाखांच्या गुंतवणूकीसह दिल्लीमधून ‘लॅबबाझार’ची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्थिर विकास होत असल्याचे राहुल सांगतो. ‘लॅबबाझार’ स्टॉकवर आधारीत ई- कॉमर्स मॉडेलचे अनुसरण करत असून देशभरात माल पुरविते.

“आम्हाला दर महिन्याला ८०० ते ९०० ऑर्डर्स मिळतात. आमच्या ग्राहकांमध्ये इतर कंपन्यांबरोबरच जेपी ग्रुप आणि आयआयटी दिल्लीचाही समावेश आहे. याशिवाय दक्षिण भारतात खूप मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे आणि तिथे लोक क्वालिटी कॉन्शिअस असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात (५० टक्क्याहून जास्त) मालाची विक्री होते,” राहुल सांगतो.

हे व्यासपीठ अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. एकदा का जम बसला की निधी उभारण्याची त्यांची योजना आहे.

आयबीईएफच्या माहितीनुसार बांधकाम उपकरण उद्योगक्षेत्राचा वार्षिक महसूल २०१४ च्या आर्थिक वर्षापर्यंत ६.५ अब्ज डॉलरवर पोहचला होता.२००७ आणि २०१४ च्या दरम्यान वार्षिक महसूलात ८.३८ टक्के संयुक्त वार्षिक विकास दरानुसार वाढ झाली आणि सरकारने हाती घेतलेल्या जलद पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांमुळे येत्या काळात या उद्योगक्षेत्राचा वार्षिक महसूल १३.१ टक्के संयुक्त वार्षिक विकास दरानुसार आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतीय बांधकाम उपकरण मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्यानुसार २०१९ -२० च्या आर्थिक वर्षापर्यंत भारतीय बांधकाम उपकरण उद्योगक्षेत्रातील उलाढालीत सध्याच्या २.८ अब्ज डॉलरवरुन पाच अब्ज डॉलरपर्यंत वाढ होईल.

मार्केटमध्ये टूल्स, इक्विपमेंट्स आणि लॅब सप्लाईजची मिळून जवळपास २००० कोटींची उलाढाल होत असल्याचं राहुल सांगतो. तो सांगतो की येत्या दोन वर्षात यापैकी किमान १५ टक्के हिस्सा काबीज करण्याचा त्याचा बेत आहे. औद्योगिक पुरवठ्यामध्ये इन्डस्ट्रीबाइंग, ऊर्जाकार्ट आणि टोलेक्सो ही काही मोठी नावं आहेत ज्यांनी आपल्या क्षेत्रात हे केलेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इन्डस्ट्रीबाइंगने ट्रायफेक्टाकडून कर्ज स्वरुपात १२ कोटींचा निधी उभा केला. सुरुवातीला त्यांनी सैफ पार्टनर्स आणि कलारी कॅपिटलकडून निधी उभा केला होता.

बाजारातील स्पर्धेबद्दल बोलताना राहुल सांगतो की ‘लॅबबाझार’ हे लॅब सप्लाइजवर लक्ष केंद्रित केलेले एकमेव पोर्टल आहे. तथापि, तो इतरांकडून सुरु झालेल्या स्पर्धेकडे दुर्लक्ष करु शकत नाही. तो त्याच्या टेक्निकल सपोर्टच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या कामासाठी योग्य असलेले उत्पादन निवडण्याची संधी उपलब्ध करुन देऊन स्वतःला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करु इच्छितो. त्याचबरोबर ‘लॅबबाझार’ डायरेक्ट शिपींग सुविधा पुरवित असल्याने दलाल आणि त्यांना द्यावी लागणारी किंमत या दोन्ही गोष्टी टाळल्या जातात.

ब्रॅण्ड्सना ऑनलाईन जाण्याची वाटणारी धास्ती हे ‘लॅबबाझार’ समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. या व्यासपीठाकरिता हळूहळू का होईना पण किरकोळ विक्रेते तयार होत आहेत. त्याचबरोबर ‘लॅबबाझार’ ग्राहक मिळविण्याकरिता पारंपारिक आणि डिजीटल अशा दोन्ही स्वरुपाच्या विविध मार्केटींगच्या पद्धती अंगिकारत आहे.

व्यवसायाच्या वाढीबाबत बोलताना राहुल सांगतो की आज देशभरात जवळपास चार कोटी एसएमईज आणि तांत्रिक संस्था अशा आहेत ज्या अस्सल उत्पादन खऱ्या किंमतीमध्ये खरेदी करण्यासाठी धडपडत आहेत. “आम्ही बाजाराला एक मोठी संधी उपलब्ध करुन देत आहोत आणि ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता आवश्यक ते प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याचबरोबर ग्राहकांची उत्पादनांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची प्रोडक्ट लाईनही नियमितपणे शंभराहून अधिक नवीन उत्पादनांसह वाढवित आहोत,” असं राहुल सांगतो.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

‘स्मार्ट व्हिलेज’साठी स्वत:चे आगळे सिमेंट! लाकडापाठोपाठ पोलादातही ‘क्लोरोअर्थ’ आजमावणार कर्तृत्व

“ कुणी घर देता का घर ?”: लाखोंचा प्रश्न, ‘शुभम’चे उत्तर

लेखक : तौसिफ अलम

अनुवाद : अनुज्ञा निकम

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags