संपादने
Marathi

लहानपणीचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं, ‘कनाबीज’ फूटवेअर निर्मितीची रंजक कहाणी

Team YS Marathi
23rd Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

देविका यांना उद्योजिका व्हायचं होतं. अगदी लहानपणापासून. सात वर्षांची असताना त्यांनी निबंध लिहिला होता की एक दिवस त्या दुकानाची शृंखला सुरु करणार ‘देविका आणि स्पेन्सर’ या नावान. ( मार्क्स आणि स्पेन्सर या ख्यातनाम उत्पादनाच्या नावानं प्रभावित होऊन)

विशीच्या आसपास त्या अमेरिकेत गेल्या आणि वॉरविक विद्यापीठातून पदवी मिळवली. परदेशात अभ्यास केल्यानंतर आणि नोकरी केल्यानंतर २०१४ मध्ये त्या भारतात आल्या. इथं आल्यावर त्या अनेक दिवस स्वत:साठी एक विशिष्ट बूट शोधत होत्या.. चामड्याचा वापर नसलेले. त्यांना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्या मुख्यत्वे करून चामड्याचे बुट बनवतात तर काही स्थानिक बाजारात चामड्याचा वापर नसलेली उत्पादन बनवत आहेत .

image


“मी अमेरिकेतून छान छापील डिजाईन असलेले कॅनव्हासचे बूट आणले होते. दिल्लीतल्या उन्हाळ्यात मी ते घातले होते आणि मला खूप गरम झालं. कारण ते बंद होते आणि माझी उंची कमी असल्यानं मला उंच टाचांचे बूट घालायला आवडतात. पण घामाच्या धारांनी मला वेगळा विचार करायला प्रवृत्त केलं. मला कॅनव्हासचे बुट आवडतात, पण उष्णतेमुळे ते पुढून किंवा मागून खुले असलेले आणि हो उंच टाचांचे असलेले मला चालले असते." देविका आठवणी सांगत होत्या.

चामड्याचे नसणारे पण फॅशनेबल आणि आरामदायी असणारे बूट, या संकल्पनेतून निर्मिती झाली ‘कनाबीज’ची ! त्याचं उद्योजिका होण्याचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण होण्याची ही ती वेळ. एप्रिल २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या कनाबीज आहेत तरी कशा ? चामड्याच्या नसलेल्या... आरामदायक आणि फॅशनेबल... महिलांसाठी एक नवा पर्याय !

image


कनाबीज सर्वांसाठी ?

प्राचीन काळापासून कॅनव्हास हे हेम्पपासून बनविलं जात. कनाबीजचं हे रोप (ज्यापासून मारिजुअना हे ड्रग सुद्धा तयार केलं जातं) म्हणून मग , थोडंसं कलात्मक आणि वेगळं नाव वाटावं यासाठी कनाबीज हे ट्रेंडी नाव ठेवण्यात आलं.

नवी दिल्लीतल्या हॉटेल अशोकमधल्या लंडन मार्केटमध्ये याचं अनावरण करण्यात आलं . याची विक्री आणि विपणन मुख्यत्वे करून सोशल मिडिया आणि मुख प्रसिद्धीद्वारे झालीय. कनाबीज घालून अनेक फॅशन शोज, त्याचबरोबर अनेक कार्यक्रम ज्याचा विषयच 'कनाबीज् शु पार्टी ' असा होता. ज्यात अनेक महिला एकत्र येतात, मजा करतात आणि कनाबीज घालून बघतात. ज्या आवडतात त्या विकत घेऊन जातात. या पार्टीज दिल्लीत खूप प्रसिद्ध झाल्या आहेत आणि येत्या काही महिन्यात देविका या पार्टीज अन्य शहरातही ठेवणार आहेत.

image


वित्तीय संस्थेचा अनुभव आणि फुटवेअरचा बिझनेस ?

देविकानं लंडन मध्ये चार्टर्ड अकाऊंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनतर लंडन मधल्या इवायमध्ये नोकरी, गुरगाव मध्ये डेलॉएटमध्ये नोकरी, त्यानंतर एका वेगळ्याच व्यवसायाची सुरुवात. देविकाने यासाठी खूप संशोधन केलं. शेवटी मनाजोगता डिझायनर मिळाल्यावर त्यांनी आपल्या कल्पना त्यांच्यासमोर मांडल्या. अंशुल त्यागी हे आता त्यांच्या क्रिएटिव्ह विभागाचे प्रमुख आहेत . कनाबीज सुरु करण्यापूर्वी त्यांनी खूप वेळा चर्चा केली आणि शेवटी त्याचं हे मूर्त रूप सुरु झालं. या व्यवसायाचं भांडवल होत १५ लाख रुपये, जे त्यांनी आपल्या बचतीमधून आणि कुटुंबियांकडून जमा केले.

" उत्पादन डिझाईन करण्यापासून नमुने बनवण्यापर्यंत आणि मग ऑर्डर घेण्यापर्यंत, तसंच, विक्रीचं जाळं विणण्यापासून, गोदाम शोधणं, वाहतुकीची व्यवस्था या सगळ्याची सुरुवात शून्यापासून करावी लागली.”

देविका हे मान्य करतात की, ७ वर्षांच्या कोर्पोरेट क्षेत्रातल्या नोकरीच्या अनुभवापेक्षा एक वर्षाच्या या व्यवसायाच्या अनुभवाने त्यांना खूप काही शिकवलं.

कनाबीज नेमकी कोणत्या स्टाईलमध्ये बसते?

आमची उत्पादन म्हणजे निव्वळ मौज, रोज घालण्याजोगी आणि उच्चतम गुणवत्तेची! पण ग्राहकांचा अनुभव आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा. आम्ही उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत मग ती ग्राहकांनी केलेली चौकशी असो किंवा खरेदी केल्यावर ग्राहकांचा अनुभव असो. आम्ही आमच्या ग्राहकांशी सतत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो .

किंमत, गुणवत्ता आणि अन्य वैशिष्ट्ये!

कनाबीजची किंमत ही १७०० ते २८०० च्या दरम्यान आहे आणि देविका अभिमामानं सांगतात की त्यांची उत्पादनं ही, वेगळी आणि उच्चतम दर्जाची आहेत तसंच आंतरराष्ट्रीय उत्पादनांपेक्षा ३० ते ४० % कमी किंमतीत आहेत. त्यांची उत्पादन ही (www.kanabis.in) या त्यांच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. तसंच, मुंबई, पुणे, जयपूर, चेन्नई सारख्या शहरात विविध नामांकीत बुटांच्या दुकानात उपलब्ध आहेत तर दिल्लीतल्या त्यांच्या गोदामातूनही हे बुट खरेदी करता येतात .

image


देविका म्हणतात आमची उत्पादन ही नोएडामधल्या फ़ुटवेयर डिजाईन आणि डेवलपमेंट या संस्थेतून परीक्षण होऊन येतात. आमच्या बुटांचे तळ हे ओरखडा प्रतिबंधक, न घसरणारे आणि अत्यंत लवचिक आहेत. आमचे निर्माते, कारखानदार हे गुणवत्ता परीक्षण करण्यासाठी ऑडीट तर अन्य जणांनाही आम्ही कधी कधी परीक्षणासाठी बोलवतो. आम्ही समाधानी झाल्यावरच निर्मिती करण्यात येते .

म्हणूनच यात काही आश्चर्य नाही की कनाबीजनं, फक्त सात महिन्यात १,५०० बुटांची विक्री केली आहे म्हणजे सरासरी दर महिन्याला २०० जोड. यावरून या बुटांचं आकर्षण वाढतंय हे लक्षात येतं, त्यांच्या पेजला सतत मिळणाऱ्या प्रतिसादानं तसंच ऑफलाइन होणाऱ्या विक्रीनं हे सिद्ध केलं आहे. त्यांच्या टिममध्ये फक्त ५ जणांचा सहभाग आहे. इंटर्न्स निहारिका सिंगला आणि शिल्पा डांगी आणि व्यवसाय सल्लागार अक्षय श्रीमाल आणि अर्थात देविका आणि अंशुल !

अजून खूप अंतर आहे , पण त्या सज्ज आहेत.

देविका यांचा प्रवास आता सुरु झालाय आणि त्यांना माहिती आहे त्याचं उत्पादन घरोघरी पोचायला अद्याप बराच कालावधी जावा लागणार आहे. आठवडाभर काम करणं आणि आठवड्याच्या सुट्टीत सुद्धा काम करणं सुरु आहे. (सध्या त्या ड्युक विद्यापीठातून एम.बी. ए.चा कोर्स सुद्धा करत आहेत) त्यांचा प्रवास योग्य दिशेनं सुरु आहे अशी त्या खात्री बाळगतात आणि आतापर्यंतचा प्रवास खूप आनंददायी असल्याचं त्या सांगतात. रोज त्यांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद त्यांना रोज नवनवीन आव्हानं पेलायला प्रेरित करतो. " या ही व्यवसायात चढउतार आहेत, जे कोणत्याही व्यवसायात असतात, पण अनुभवाचा एक भाग आहे."

त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल त्यांना विचारलं असता त्या म्हणतात ," सध्यातरी आम्ही भारतात विक्री करण्यावर भर देत आहोत. पण लवकरच भारताबाहेरही आमची उत्पादनं आम्ही पाठवू. गेल्या सात महिन्यात आम्ही पाहिलंय की आमची विक्री प्रत्येक महिन्यात दुप्पट होतेय, आता आमचं लक्ष्य हे संपूर्ण बाजारपेठ काबीज करण्यावर आहे."


लेखक - अपराजिता चौधरी

अनुवाद - प्रेरणा भराडे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags