संपादने
Marathi

‘आकड्यांचे गाव’ महिलांच्या माध्यमातून चालवत येणारे देशातील पहिले बीपीओ

आपण समाजाचे काही देणे लागतो. या प्रमुख हेतूने जे एस डब्लू फाउंडेशनने २००५ मध्ये ग्रामीण भागामध्ये डाटा ऑपरेटिंगचा व्यवसाय सुरु केला. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना चुलीसमोरच आयुष्य घालवावं लागते. या मुलींना घरातून बाहेर पडून त्यांच्या ... ज्ञानाचा.... फायदा त्यांच्यासह गावाला व देशाला करून देणे आणि गावाचा विकास करून ग्रामीण भागातील गरीबी हटवणे व महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण घडवणे या उद्देशाने हा बीपीओ सुरु केला आहे

Team YS Marathi
9th Oct 2015
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

ग्रामीण भारतासाठी अनेक योजना राबवल्या जातात. पण त्या योजनांचा ग्रामीण भागात राहणा-या लोकांना किती फायदा होतो. हा एक संशोधनाचा विषय आहे. पण आपल्या देशामध्ये असे एक गाव आहे की ज्या गावामध्ये महिलांच्या विकासासाठी महिलांमार्फत बीपीओ चालवण्यात येते. मुळातच बीपीओ म्हटले की आपल्या नजरेसमोर येतात त्या तोकड्या कपड्यांमध्ये वावरणारे हायफाय इंग्लिश बोलणारी मुले-मुली. पण बेल्लारी येथील विजयनगर येथे ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी जे एस डब्लू फाउंडेशन मार्फत एक अनोखे बीपीओ सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे वैशिष्टय म्हणजे या सेंटरमध्ये ग्रामीण भागातील सुशिक्षित महिला काम करत असून महिलांच्या माध्यमातून चालवत येणारे हे देशातील पहिले बीपीओ सेंटर ठरले आहे . कन्नडमध्ये हे सेंटर आकड्यांचे गाव या नावाने ओळखले जाते.


एक अनोखे बीपीओ सेंटर

एक अनोखे बीपीओ सेंटर


आपण समाजाचे काही देणे लागतो. या प्रमुख हेतूने जे एस डब्लू फाउंडेशनने २००५ मध्ये ग्रामीण भागामध्ये डाटा ऑपरेटिंगचा व्यवसाय सुरु केला. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना चुलीसमोरच आयुष्य घालवावं लागते. या मुलींना घरातून बाहेर पडून त्यांच्या ज्ञानाचा फायदा त्यांच्यासह गावाला व देशाला करून देणे आणि गावाचा विकास करून ग्रामीण भागातील गरीबी हटवणे व महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण घडवणे या उद्देशाने हा बीपीओ सुरु केला आहे . या बीपीओ मध्ये कामाबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही जे एस डब्लू कंपनीच्या माहिती व प्रसारण विभागाचे प्रमुख असलेल्या कर्मेश घोष यांची भेट घेतली.

२००५ मध्ये सुरु झालेल्या डाटा ऑपरेटिंगच्या या कंपनीची सध्या ग्रामीण भागात दोन सेंटर चालू आहे. या दोन्ही सेंटरमध्ये परिसरातील सुमारे ३०० महिला कार्यरत आहेत. सुरुवातील एका भारतीय बँकेसाठी चेक प्रोसेसिंग करणाऱ्या या कंपनीने कोडींग, बँके अंतर्गत ग्राहक सेवा आणि गैर सरकारी संस्थांनी जमवलेल्या निधीचा तपशील ठेवण्याची कामे हाती घेतली होती. मात्र आजच्या घडीला मोठी मजल मारत अनेक कामे हाती घेतली आहेत. या बीपीओ कंपनीतील कर्मचा-यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. बीपीओमधील महिलांमध्ये आत्मसन्मानासोबत स्वतः बद्दल आत्मविश्वासही निर्माण झाला आहे. या बीपीओमुळे ग्रामीण भागातील महिला स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या असून , लग्न झाल्यानंतर जगाच्या पाठीवर कोठेही गेल्या तरी आपण बीपीओमध्ये काम करू शकतो, असा विश्वासही त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. स्वतः च्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागातील मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांना देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावण्याची संधी या बीपीओमधून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो असल्याचा दावा घोष यांनी केला. आज त्या ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत

ग्रामीण बीपीओच्या या मॉडेलला मार्केटमध्ये नव्हे तर समाजाच्या विविध स्तरातून मान्यता मिळाली असून कामाबाबत अधिक अपेक्षा आणि आशाही निर्माण झाल्या आहेत. बीपीओमध्ये काम करणा-या मुलेमुली आणि त्यांच्या आई वडिलांना यामुळे एक आत्मसन्मायुक्त जीवन तसेच सुरक्षित आणि उत्तम उदरनिर्वाहाचे साधन मिळाल्याने मोठा आनंद मिळाला आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण बीपीओकडे एक उत्तम आणि दूरदर्शी व्यावसायीक कंपनीच्या रुपाने पाहिले जात आहे.. सध्याच्या शहरातील बदलती सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता ग्रामीण भागात बीपीओ सुरु करणे हा एक महत्त्वपूर्ण व्यवसायिक निर्णय समजला जात आहे..

जेव्हा आम्ही नव्या कर्मचा-यांची भरती करतो त्यावेळी ग्रामीण भागातील तरूणींचा उत्साह आणि शिकण्याची जिद्द पाहून हा बीपीओ ग्रामीण भागात असाच सुरू ठेवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. तसेच आम्ही एक योग्य व्यवसाय करत असल्याचा विश्वासही मिळतो..सर्व अंगाने विचार केला तर हा सर्वांसाठी फायदेशीर आहे. याद्वारे ग्रामीण भागातील जनतेला आपले गाव सोडून नोकरीसाठी शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही. कंपनीलाही उत्तम आणि कमी मानधनात कर्मचारी मिळत असल्याची माहिती कर्मेश यांनी दिली.


बीपीओचा मॉडेल अन्य गावात सूरू करणात यावे, ज्यामुळे अधिकाधिक गावातील लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यास मदत होईल. तसेच या कामासाठी जे लोक पुढे येतील त्यांच्याशी चर्चा आणि सल्लामसलत करून त्यांच्या सहकार्याने हे काम पुढे नेता येऊ शकते. बीपीओ क्षेत्रात काम करणा-या या मुलींकडे जेव्हा एखादे मोठे काम येते तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. कारण या कामासाठी कंपनी कमीत कमी वेळ देते. त्यावेळी ग्रामीण भागातील मुली काम करण्यास टाळाटाळ करतात. कारण त्यांना आवश्यक कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी वेळ आणि साधनांची गरज असते ..यावरून स्पष्ट होते की शहरी बीपीओ ग्रामीण बीपीओवर मात करते. त्यासाठी आम्ही आमच्या बीपीओत अधिकाधिक संसाधने आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून ग्रामीण भागातील मुलीना काम करणे अधिक सोपे जाईल...

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags