संपादने
Marathi

केवळ दोन लाख रुपये हातात असताना ७० वर्षीय वृध्दाने साकारली स्टार्टअपची यशोकथा

Team YS Marathi
26th Jul 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

दररोज आपण तरुणाईच्या यशकथा ऐकतो, ज्या असतात उत्साहाने भारलेल्या, परिपूर्ण आणि नव्याने काहीतरी क्रांतीकारी उद्योग असलेल्या. सभोवतालच्या या उद्योजकांमध्ये अनेकजण वीशीच्या आतले असतात ज्यांनी स्टार्टअपच्या विश्वात असामान्य काहीतरी केले असते. पण असा कुणी माणूस असले का ज्याने निवृत्तीनंतरच्या वयात सत्तरीनंतर स्टार्टअपच्या विश्वात पाऊल ठेवले असेल?

ललितमोहन माथूर यांनी कंपनीसाठी काम करताना वेगळे काहीतरी करुन दाखवले, न्यूझीलंडमध्ये एका ग्राहकाची भेट घेतली ज्याने त्यांना वायरच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार केली जे ते दुस-या एका गरम होणा-या उपकरणाच्या उत्पादकांसाठी आयात करत होते. काही कालावधीनंतर एका कंपनीतून निवृत्त झाल्यांनतर त्यांनी न्य़ूझीलंडमध्ये त्या संपर्क केला आणि विचारणा केली की त्याला केबलबाबत अजूनही काही समस्या आहेत का आणि ते त्याचे समाधान करु इच्छितात. हाताने काम करण्याच्या यंत्रावर केबल तयार करून काही सुधारित नमुने ललित या़ंनी त्याला पाठविले. ललित यांनी दिलेले नमुने, दर्जा आणि त्याची किमत याने प्रभावित होऊन त्या ग्राहकाने ललित यांच्या सेवा घेण्याचा निर्णय घेतला. ललित यांनी सुरु केलेल्या कामाच्या सुरवातीलाच असे घडल्याने त्यांचा उत्साह वाढला. मे २००५ मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी 'वाईप हॉटवायर इंडिया थर्मल इक्विपमेंट' (व्हाईट) या उपकरण गरम करण्याच्या वायर केबल मॅट आणि इतर वस्तूंच्या उद्योगाची स्थापना केली. कंपनीच्या स्थापनेनंतर त्याच्याशी संबंधित अनेक बाबी त्यांच्या डोक्यात घोळू लागल्या. “ येथे देशांतर्गत विशेष केबलच्या पुरेश्या चाचणीकरिता साधने नव्हती आणि आम्हाला आंतरराष्ट्रीय मानकानुसार काम करणे गरजेचे होते. तेथे कुशल मनुष्यबळाची देखील समस्या होती जरी उत्पादन सुरुवातीपासून निर्यातीसाठी होते तरी देखील स्थानिक बाजारात प्रशिक्षणाची सोय नव्हती. निधीची कमतरता ही आणखी एक महत्वाची समस्या होती जी कंपनीच्या वाढीसाठी प्रभावित करणारी होती” असे सत्तरीतले ललित सांगत होते. ललित ज्यांनी बडोदा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली होती आणि ज्यांचा संबंध जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेशी होता त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईत टाटा इलेक्ट्रिक कंपनीतून केली होती. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागात त्यांनी इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळात केलट्रॉन आणि अपट्रॉन मध्ये पुरेशी सेवा दिली होती. २००५ मध्ये निवृत्त होण्याच्या वेळी ग्रामविकास विभागात त्यांची अखेरची नियुक्ती विशेष प्रकारच्या केबलसाठीच्या प्रकल्पात व्यवस्थापकीय स्वरुपाची होती. स्वत:च्या व्यक्तिगत बचतीमधून दोन लाख रुपये प्रारंभी व्यवसायात गुंतवून त्यातून कच्च्या सामुग्री आणि यंत्रे घेण्यात आली, त्यावेळी ललित यांनी गुंतवणूकदार मिळतात का याचा शोध घेतला. स्थापनेनंतर लगेच व्हाईट ला मागण्या आल्या आणि त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेला कर्जासाठी अर्ज करण्यात आला. हा प्रस्ताव तातडीने फेटाळण्यात आला कारण कंपनीचा संस्थापक साठ वर्षे वयाचा होता! आणि बँकेसाठी ही बाब धोकादायक होती.

ललित मोहन माथुर ( डावीकडून तिसरे ) त्यांच्या टीम समवेत

ललित मोहन माथुर ( डावीकडून तिसरे ) त्यांच्या टीम समवेत


त्यांनतर ललित यांच्या दोन मित्रांनी भागीदारी केली आणि सुमारे बारा लाख रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली ज्यातून त्यांना काही अवजड यंत्रे घेता आली आणि काही जणांची नियुक्ती करता आली. २०१०मध्ये नेदरलँन्डमधील गुंतवणूकदारांच्या मदतीने गुंतवणूक वाढली. 

गती संथ आणि स्थिर असते तेंव्हाच शर्यत जिंकते.

आधुनिक उत्पादनाने सुरुवात करत कंपनीने दावा केला की ते तीन दशलक्ष मीटर केबल उत्पादन करतात आणि मागील आर्थिक वर्षात बारा कोटींची उलाढाल केली आहे. ललित यांनी साहिबाबाद येथे छोटा प्रकल्प तयार केला. काही वर्षात त्यांनी राजस्थान मधील निर्माना येथे हा प्रकल्प हलविला. सध्या ते निर्माना येथे दोन प्रकल्प चालवितात ज्यात शंभर जणांना रोजगार मिळाला आहे.

ललित यांच्यामते कंपनीने सुरुवातीला आपला विश्वास ग्राहकांना तोंडी आश्वासने देऊन मिळवला. व्हाईट ही संस्था जगभरातील व्यावसायिक प्रदर्शनात देखील सहभागी होते. त्यातून त्यांचा संपर्क नव्या ग्राहक आणि पुरवठादारांशी होतो त्याच बरोबरीने बाजारात नव्याने येणा-या बाबींची त्यांना माहिती मिळते. आज, कंपनीने जागतिक बाजारात विस्तार सुरू केला आहे मुख्यत्वे युरोप आणि न्युझीलंड आणि त्यांचा उत्तर अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे.

केन संशोधन अहवालानुसार, भारताचा वायर आणि केबल बाजारातील महसूल सीएजीआर नुसार सन २००९ ते २०१६ दरम्यान १६.४ टक्के वाढला आहे. संशोधन अहवालानुसार, कंपन्यांचे वायर आणि केबल बाजार लक्षणीयरित्या सीएजीआरच्या दरानुसार वाढत असून ५९० दशलक्ष कोटीच्या घरात २०१९ दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. उत्पादकांची संख्यावाढ आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वाढणारी गुंतवणूक ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक वायर आणि केबल बाजाराचे मुल्य २०१४ मध्ये ४.६५ दशलक्ष डॉलर्सवरून वाढले आणि सीएजीआर नुसार त्याची अपेक्षित वाढ सन २०१५ ते २०२० दरम्यान ८.७ इतकी होणार आहे. सध्या व्यापारी आणि निवासी उपकरणातील वाटा मोठा असून जमिनीखालच्या तसेच बर्फ वितळण्याच्या उपकरणातील बाजाराचा त्यात मोठा हिस्सा आहे. उर्जा संसाधने आणि जागतिक हवामान बदलांच्या जागरुकतेच्या पार्श्वभूमीवर ही वाढ जोमाने होण्याची अपेक्षा आहे.

केबलच्या वर्गवारीमध्ये, विशेषत: ज्या गरम करण्याच्या उपकरणासाठी वापरात येतात, त्यात केवळ फार थोड्या भारतीय कंपन्यांकडे सारखी उत्पादने आहेत. थर्मोपॅडस ही त्यापैकी एक मोठी निर्यातदार उत्पादक कंपनी आहे. टेफकॉट आणि गर्ग असोसिएट या आणखी दोन एनसीआर आधारित कंपन्या आहेत ज्या निर्यातदार आहेत. आणि या भारतीय कंपन्यांना इतर बाजारातील तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

समाजाला परत देणे

“ व्हाईट ने दहा वर्षे पालकत्व घेतल्याने, मला समाधान आहे की, येथील तरुणांना रोजगार आणि जगण्याचे साधन मिळाले आहे. व्हाईट मधून मीसुध्दा माझ्या इच्छांची पूर्तता करतो आहे ज्यातून मला समाजाचे देणे देता येते – आम्ही सक्रीयपणे डोळ्याच्या रुग्णालयाला मदत करतो आणि निर्माना येथे प्राथमिक शाळा दत्तक घेतली आहे.” असे सांगून उदारपणाने ललीत समारोप करतात.

लेखक : तौसीफ आलम

अनुवाद: नंदिनी वानखडे पाटील

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags