संपादने
Marathi

होली एंजल कॉनव्हेंट मधील मुलींनी शाळेजवळचे दारूचे दुकान बंद केले!

Team YS Marathi
11th Feb 2017
Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share

३१ मार्चनंतर राष्ट्रीय आणि राज्य मार्गावरील दारूची दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक दारू दुकानांना नव्या जागी त्यांचे बस्तान बसवावे लागत आहे.( युवर स्टोरी मराठीवर वाचा हरमनसिंग यांनी हायवे वरील दारू दुकाने बंद करण्यासाठी कसा दिला होता लढा.) केरळ राज्य बेवरेज कॉर्पोरेशन(बेव्हको)च्या अशाच एका दारूच्या दुकानाचे पुनर्वसन नाथेनकोड येथील बेकर जंक्शन जवळ करण्यात आले. हे नवे दारूचे दुकान तिरुवनंतपूरम, केरळ येथील होली एंजल कॉनव्हेंट मुलींच्या शाऴेपासून केवळ पन्नास मीटर दूर अंतरावर होते. 


image


त्यामुळे मुलींमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली. ज्यांना त्या दारूच्या दुकानासमोरून शाळेत ये-जा करावी लागत होती. त्यामुळे घाबरून जावून पळपुटे करण्यापेक्षा या मुलींनी हा मुद्दा आपल्या हाती घेण्याचा निश्चय केला. सुमारे शंभर विद्यार्थीनी, शिक्षक आणि पालक दारूच्या दुकानासमोर जमा झाले, आणि शाळेजवळ दारु दुकान नको म्हणून त्यांनी निदर्शने केली.

विद्यमान कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात १५० मीटर परिघात अमली पदार्थ विकता येत नाहीत, त्याबाबत सांगताना एक विद्यार्थीनी अल्शामा म्हणाली की, “ हे असुरक्षेचे आहे की शाळेच्या अगदी जवळ दारूचे दुकान सुरु केले जावे, कारण ही मुलींची शाळा आहे. आम्हाला शाळेत जाताना किंवा घरी जाताना दारूचे दुकान ओलांडून का जायला लागावे? आमच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे.” मुख्याध्यापिका जी.सुझी यांनी सांगितले की, “ मला माझ्या विद्यार्थीनींच्या भविष्याची चिंता केलीच पाहिजे, पण मला त्यांचा अभिमान आहे की त्यांनी वाईट गोष्टीशी दोन हात करण्याचे ठरविले.” निदर्शनांकडे पहात त्यांनी स्पष्ट केले.

मागील मंगळवारी दुकान सुरु झाले, परंतू निदर्शनांमुळे गुरुवारी बंद करावे लागले. मात्र अफवा होत्या की ते सायंकाळी निदर्शने संपली की पुन्हा सुरु होवू शकते. मात्र मुली निर्धाराने उभ्या राहिल्या, त्यामुळे उत्पादन शुल्कमंत्री टि. पी रामकृष्णन यांनी या मुद्यावर लक्ष दिले. त्यांनी मुलींना आश्वासन दिले की, शाळेजवळील दारूची दुकाने बंद केली जातील, आणि त्यांच्या दक्षता आणि धैर्याचे त्यांनी कौतूकही केले.

(थिंक चेंज इंडिया)

Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags