अंधश्रध्दा निर्मूलन करुन जनजागृतीसाठी प्रयत्नरत आहेत डोळ्यांचे एक डॉक्टर दिनेश मिश्र!
समाजात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. एक असे जे केवळ स्वतःचीच चिंता करतात आणि त्यांच्यासाठी समाजाला कधीच प्राधान्य नसते. दुसरे असे असतात, जे समाजाला जास्त महत्व देतात आणि त्यासाठी अनेक प्रयत्न देखील करतात. या कामात अनेक समस्या देखील येतात, परंतु ज्यांनी आपले लक्ष्य समाजाच्या उत्कर्षासाठी बनविले, त्यांच्यासाठी तेच जीवन आणि तीच जिद्द देखील आहे. असेच आहेत, डॉ. दिनेश मिश्र.
१९८६ मध्ये रायपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम. बी. बी. एस. केल्यानंतर १९८९ मध्ये डॉ. दिनेश मिश्र यांनी नेत्र चिकित्सामध्ये प्राविण्य मिळवले आणि अनुभव मिळविण्यासाठी मुंबईला गेले. १९९१ मध्ये जेव्हा रायपूरला परतले तेव्हा त्यांनी स्वतःचा दवाखाना उघडला. येथे सलग ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येऊ लागले, ज्यांना शारीरिक आजारांव्यतिरिक्त अंधविश्वासाने मानसिकरित्या ग्रासले होते. डॉ. दिनेश मिश्र या लोकांचा उपचार करताना त्यांच्याशी संवाद साधून माहिती देखील घ्यायला लागले की, ग्रामीण भागात कुठल्या प्रकारचा अंधविश्वास आहे, त्यामुळे त्यांची कशी फसवणूक होते आहे. या दरम्यान त्यांना हे देखील माहित पडले की, छत्तीसगढ मध्ये बैगा गुनिया देखील जादू टोणा करून उपचार करण्याचे ढोंग करत आहे.
डॉ. दिनेश मिश्र यांना या सर्व गोष्टींबद्धल इतकी घृणा निर्माण झाली की, त्यांनी निश्चय केला की, ते या विरोधात जनजागृती अभियान चालवतील. त्यासाठी ते प्रत्येक आठवड्यात जवळपासच्या गावात जाऊन तेथे लोकांची सभा घेऊन लोकांना अंधविश्वासापासून दूर राहण्याचा सल्ला देऊ लागले. डोळ्यांच्या डॉक्टरांच्या तोंडातून या गोष्टी लोकांना जरा विचित्रच वाटत असत, मात्र गावतल्या लोकांना डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास देखील बसत होता. हळू हळू आपल्या प्रयत्नाच्या यशाने डॉ. मिश्र यांना उत्साहित केले आणि १९९५ मध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीची स्थापना करून कु-रिती आणि अंधविश्वासामुळे बळी पडलेल्या ग्रामीण लोकांना या अभिशापातून मुक्त करण्याचे अभियान सुरु केले.
डॉ. दिनेश यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “ सलग मला असे सांगण्यात येत होते की, गावात एखाद्या महिलेला चेटकीण समजून केवळ त्रासच दिला जात नसे तर, समाजातून तिला बहिष्कृत देखील केले जाते आणि त्यांचे खाणे पिणे बंद करण्यात येत असत. त्यामुळे गावात तणाव आणि अविश्वासाचे वातावरण असायचे.”
डॉ. मिश्र यांनी अशा गावांना चिन्हांकित करून तेथील सलग दौरा सुरु केला आणि गावातल्या लोकांशी संवाद साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान छत्तीसगढमध्ये चेटकीण असल्याची शंका असल्या कारणाने काही महिलांची हत्या देखील झाली. डॉ. मिश्र यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या अध्ययन आणि त्यांच्या शिफारशीला आधार बनवून छत्तीसगढ सरकारने एका समितीची स्थापना करून चेटकीण म्हणून महिलांच्या होणा-या छळाविरुद्ध कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला. सन २००५मध्ये ‘छत्तीसगढ चेटकीण छळ निवारण अधिनियम’ बनले, ज्यात अशा प्रकरणाविरुद्ध तीन वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. या अधिनियमात डॉ. मिश्र यांच्या शिफारशी वर झाड फुक, जंतर – मंतर, जादू टोणा आणि अंधविश्वास पसरवून छळ केल्याचा देखील अपराध असल्याचे मानले गेले आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून गावोगावी जाऊन अंधविश्वासाचा काळोख दूर करण्याच्या प्रयत्नात डॉ. मिश्र यांनी आतापर्यंत जवळपास १३५०सभा घेतल्या आहेत आणि ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या अंधविश्वासाच्या जाळ्यात न अडकण्याचे आणि कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी प्रशिक्षण देखील द्यायला लागले. ते राज्यातील विभिन्न महिला कारागृहात जाऊन देखील भ्रम निवारण आणि मार्गदर्शन शिबीर चालवितात. राज्य पोलीस विभाग देखील अनेकदा त्यांना ग्रामीण भागात अंधविश्वासाविरुद्ध अभियान चालविण्यासाठी बोलवितात.
डॉ. दिनेश मिश्र यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारने २००७मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित केले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना मध्यप्रदेशचे राज्यपाल, राज्य महिला आयोग, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून सन्मानित करण्यात आले आहे.
आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
आता वाचा संबंधित कथा :
४६ वर्षापासून अविरतपणे निराधारांची मदत करणारे अमरजीत सिंह सूदन
समाजात नैतिक मूल्य जपण्यासाठीची तपस्या..आर.डी. रावल
वंचितांचा सर्वांगिण विकास हेच राशीचे ‘लक्ष्यम’
लेखक : रवी वर्मा.
अनुवाद : किशोर आपटे.