संपादने
Marathi

बिल गेटस यांनी मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा आवाज बुलंद केला आहे

Team YS Marathi
1st May 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधिश दानशूर बिल गेटस हेअसे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी जगभरात सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यांचा पुरस्कार केला आहे. या क्षेत्रातील कार्यासाठी त्यांनी सक्रीय सहभाग देखील नेहमीच घेतला आहे. या पार्श्वभुमीवर गेटस यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाला गौरविले आहे, त्यांच्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांनी गेल्या काही वर्षातील यशाचे कौतूक केले आहे. स्वच्छतेशिवाय स्वच्छ भारत अभियानात कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनाबाबतही विचार करण्यात आला आहे.


Image source: Gates Notes

Image source: Gates Notes


त्यांचा ब्लॉग gatesnotes.com, गेटस यांनी म्हटले आहे, “ तीन वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक धाडसी घोषणा केली होती, ती म्हणजे सार्वजनिक आरोग्याबाबत जी मी निवडून आलेल्या पदाधिका-यांकडून क्वचितच ऐकली असेल. मला असे कधी दिसले नाही की एखादा राष्ट्रीय नेता अशा प्रकारच्या घोषणा जाहीरपणे उघडपणे करत असेल. इतकेच नाही, मोदी यांनी त्यांच्या घोषणा कृतीत उतरविल्या आहेत. या भाषणानंतर दोन महिन्यात, त्यांनी मोहिम सुरू केली ‘ स्वच्छ भारत, जिचे राष्ट्रीय लक्ष्य २०१९ पर्यंत संपूर्ण स्वच्छता हे देण्यात आले आहे. ७५लाख शौचालये यामध्ये देशभरात निर्माण केली जाणार आहेत आणि प्रक्रीया न करता कोणतेही सांडपाणी तसेच पर्यावरणात सोडले जाणार नाही याची हमी घेतली जाणार आहे.”

या बाबतच्या वृत्ता नुसार, गेटस यांनी नोंद घेतली आहे की मोदी हे पहिलेच राजकारणी आहेत, ज्यांनी अशा संवेदनशील मुद्याला हात घातला आहे. ज्यांनी इतक्या धाडसाने आणि जाहीरपणे त्यांचा उच्चार केला आहे. त्यांच्या पहिल्याच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा संकल्प केला आहे. हे वास्तव आहे आणि गेटस यानी त्याची दखल त्यांच्या ब्लॉगमध्ये घेतली आहे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags