संपादने
Marathi

उत्पादनास सुरुवात होण्यापूर्वीच गोव्यातील होम ऑटोमेशन स्टार्टअपला प्री ऑर्डर्स मिळविण्यात आले घवघवीत यश

26th Feb 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

अजय नाईक आणि लुशियो मेसक्विटा यांची पहिली भेट झाली ती गोव्यात... पर्सिटंट सिस्टीम्स लिमिटेडमध्ये काम करण्याच्या निमित्ताने एकतीस वर्षीय अजय आणि तेहतीस वर्षीय लुशियो प्रथमच एकमेकांना भेटले. त्यावेळेपर्यंत या दोघांनी प्रवास, आरोग्यसेवा, ऑनलाईन गेमिंग आणि संगणक ग्राफीक्सच्या एंटरप्राईज सॉफ्टवेअर डोमेनवर एकत्रितपणे केलेल्या कामाचा अनुभव वीस वर्षे एवढा प्रदीर्घ होता.

image


त्यावेळी एकत्र काम करत असतानाच, लुशियो यांना अजय यांची व्यावसायिक बनण्याची महत्वाकांक्षा पहिल्यांदा जाणवली. या दोघांनी त्यावर चर्चा करण्यास सुरुवात केली आणि २९ सप्टेंबर, २०११ ला एल ऍन्ड ए टेक प्रायव्हेट लिमिटेडची (L & A Tech Pvt. Ltd) स्थापना झाली.

२०१३ मध्ये त्यांनी आपले लक्ष एंटरप्राईज सॉफ्टवेअरकडून मोबाईल ऍपच्या दिशेने वळविले. आपल्याकडे बारा ऍप्स असून, सहा खंडातील दोनशे देशांमधील पाच हजारहून अधिक शहरांतील दोन लाखांहून जास्त लोकांनी याचा वापर केल्याचा दावा त्यांनी आपल्या लिक्डइन पेजच्या माध्यमातून केला आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये एका जर्मन फर्मने त्यांच्यापुढे त्यांच्या व्यवसायातील ऍप विभाग विकत घेण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला, ज्यानुसार त्यांना तीन वर्षांच्या काळात एक मिलियन युरो एवढी किंमत ही फर्म देऊ करत होती. मात्र नॉन डिस्क्लॉजर एग्रीमेंट असल्या कारणाने हे संस्थापक या फर्मचे नाव उघड करु इच्छित नाहीत.

ऍप्सकडून ऑटोमेशनच्या दिशेने

पण, या यशाने अजय आणि लुशियो हे आत्मसंतुष्ट होऊन बसले नाहीत. त्यांनी त्यांचा दुसरा डाव सुरु केला आणि होम ऑटोमेशन सिस्टीमवर काम करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या पैशातील काही भाग त्यांनी या उत्पादनाचा नमुना उभारण्याच्या कामी गुंतवला.

आज, होमड्रॉईड (Homedroid) हे त्यांचे उत्पादन, घरातील बहुतेक सर्व विद्युत उपकरणांवर नियंत्रण मिळविण्याच्या कामी वापरता येऊ शकते आणि मुख्य म्हणजे यासाठी शून्य रिवायरींग आवश्यक असते अर्थात नव्याने वायरींग करण्याची कसलीस गरज भासत नाही. घर किंवा कार्यालयात दोन ते तीन तासांच्या कालावधीतच ही प्रणाली बसवता येते.

हे हार्डवेअर स्विचबोर्डस् मध्ये बसविण्यात येते आणि त्याच्यासह ग्राहकाच्या स्मार्टफोनवर एक ऍप देण्यात येते, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या उपकरणांचे दूरस्थपणे नियंत्रण करता येते. विद्युत उपकरणे चालू आणि बंद करणे, या उपकरणाच्या कामाचे शेड्युलिंग अर्थात क्रमयोजन करणे, खोलीतील गारवा आणि प्रकाशावर नियंत्रण ठेवून खोलीसाठी प्रोफाईल्सचे सेटींग करणे आणि उच्च दाबाच्या उपकरणांवर सक्रीय विद्युत देखरेख करणे, या काही मुलभूत कार्यांचा यामध्ये समावेश आहे. या देखरेखीच्या माध्यमातून, जर एखाद्या उपकरणाचा प्रस्थापित विद्युतदाबाचा दर आणि वीजेचा प्रत्यक्ष वापर यामध्ये तफावत आढळल्यास ही प्रणाली घरमालकाला दक्षतेचा इशारा देते.

त्याशिवाय पंख्याच्या वेगाचे नियंत्रण करणे आणि डिमरशिवायही दिव्यांचा प्रकाश मंद करणे (एलईडी संरचित बल्बसाठी - ज्यामध्ये प्रकाश मंद करता येऊ शकतो), यांसारखी वैशिष्टेही या प्रणालीद्वारे देण्यात येत असल्याचे लुशियो सांगतात. त्यांच्या अभियंत्यांची टीम सध्या या उत्पादनात सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यावर काम करत आहे, जसे की मोशन डिटेक्टर्स आणि सीसीटीव्ही कॅमेरा तंत्रज्ञान.

ते सांगतात, सध्या तरी त्यांच्या फर्मला पाच बी2बी पुरवठादारांकडून २६५५ प्री ऑर्डर्स (विक्री सुरु होण्यापूर्वीच आलेल्या मागण्या) मिळाल्या आहेत, ज्यांच्याकडून पुढे या उत्पादनाची विक्री ग्राहकांना किंवा बांधकाम व्यावसायिकांना केली जाईल. सध्या या उत्पादनाची फर्मने निश्चित केलेली किंमत ही प्रति युनिट १.१५ लाख रुपये असून, यामध्ये साधारणपणे २५ पॉवर पॉईंटस् किंवा उपकरणांचा अंतर्भाव केलेला आहे. यासाठी आपल्याला ३० कोटी रुपये किंमतीच्या प्री-ऑर्डर्स मिळाल्याचा या जोडीचा दावा असून, उत्पादनाच्या वाटपानंतर पन्नास टक्के रक्कम तर उत्पादनाची विक्री प्रत्यक्ष ग्राहकाला झाल्यानंतर उर्वरित पन्नास टक्के रक्कम एल ऍन्ड ए टेक प्रायव्हेट लिमिटेडला मिळेल.

image


त्याचबरोबर कार्यालयांसाठी म्हणून ५-१० पॉवर पॉईंटचा अंतर्भाव असलेले चाळीस हजार रुपये किंमतीपर्यंतचे लहान युनिटस् ही फर्म देऊ करत आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने प्री-ऑर्डर्स मिळविण्यात आलेल्या यशाबाबत विचारले असता, लुशियो सांगतात, की हे केवळ बी2बीसाठी होते, ग्राहकांशी संपर्क न साधता आमच्या सेल्स टीमने व्यवसायांशीच संपर्क साधला. पण त्याचबरोबर येत्या एक-दोन वर्षांत उत्पादनाच्या बी2सी पर्यायावरही काम करणार असल्याचे ते नाकारतही नाहीत. युनिटच्या अर्थशास्त्रावर बोलताना लुसियो सांगतात की ते तैवानमधून सुट्टे भाग मिळवितात तर हैदराबाद आणि बंगळुरु येथे हे भाग एकत्रित करण्यात येतात. मोठ्या युनिटस् च्या जुळणीसाठी सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचेही ते सांगतात, ज्यामध्ये विक्री होईपर्यंत कर, विपणन, वितरण, लॉजिस्टीक्स आणि इन्व्हेनटरी स्टॉकींगचा खर्च जोडला जातो. सध्या त्यांचा नफा पंधरा टक्के एवढा आहे.

त्यापुढे जात, या उत्पादनाला एक वर्षाची वॉरंटी असून (उत्पादन बसविल्यानंतर) ऍपचे अपग्रेडेशन हे आयुष्यभरासाठी मोफत आहे. त्याशिवाय स्विचबोर्डमध्ये हे युनिट बसविण्यासाठी फारशा प्रशिक्षणाची गरज नाही. सध्या या उत्पादनाचे विपणन फक्त मुंबईतच सुरु असून बंगळुरुहून प्रचंड-प्री ऑर्डर्स येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर ते इतरही महानगरांत नेण्याची त्यांची योजना आहे.

आकांक्षा

उद्योग आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी (उदाहरणार्थ रस्त्यांवरील दिवे) पायाभूत सुविधा ऑटोमेशनमध्येही काम करण्याचीही कंपनीची योजना आहे, पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादनाला अजूनही सुरुवात झालेली नाही. भारतात जागतिक पायाभूत सुविधा कंपनी उभारण्याचे आपले स्वप्न असल्याचे लुशियो सांगतात.

स्वबळावर सुरुवात केल्यानंतर, आता ते मोठ्या प्रमाणात उत्पादन जुळणी आणि विपणनासाठी सहा कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे केवळ मागण्यांनुसार मालाचे वाटप करण्यासाठीच नव्हे तर एकूणच त्यांचे अस्तित्व वाढविण्यासाठीही मदत मिळू शकेल.

या भांडवलाद्वारे जुळणी करणारे जे कामगार सध्या त्यांच्याकडे कंत्राटी तत्वावर आहेत, त्यांना कायम करण्याची या पंधरा जणांच्या टीमची योजना आहे.

ही जोडगोळी त्यांच्या पुढच्या प्रगतीसाठी खूपच उत्सुक आहे. लुशियो सांगतात, “ माझी कंपनी वाढताना पहाण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. आणखी चांगली प्रगती आपण कशी साध्य करु शकतो, याचाच विचार आम्ही रात्रंदिवस करत असतो. आम्ही सुरुवात केली ती केवळ तीस हजार रुपयांच्या भांडवलावर आणि आज आमचा संभाव्य महसूल आहे तो ३०.३ कोटी रुपयांचा...आणि हे केवळ ४.५ वर्षांच्या कालावधीत.”

त्यांच्यासमोरील लक्ष्य कठीण आहेत, पण हे उद्योजक खूपच आशावादी असून, सर्व काही योजनेबरहुकूम झाल्यास, २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात १०० कोटी रुपयांची विक्री होण्याचा त्यांचा अंदाज आहे. २०२० पर्यंत इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उद्योगाला १५ बिलियन डॉलर्सचा उद्योग बनविण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असतानाच, देशात होम ऑटोमेशन उद्योगाला नुकतीच सुरुवात आहे. अमेरिकेत होम ऑटोमेशन हा व्यापारीदृष्ट्या उपयुक्त आयओटी असून, मार्केटस् आणि मार्केटस् नुसार २०१३ मध्ये या उद्योगाचे जागतिक मूल्य हे ५.७७ बिलियन डॉलर्स एवढे असून हा उद्योग ११.३६ सीएजीआरने (कंपाऊंड ऍन्युअल ग्रोथ रेट) वाढण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

क्लोव्हरबोर्डसारखी उत्पादने असलेल्या काही तरुण कंपन्या आहेत, ज्यांनादेखील एक हजार पेक्षा जास्त युनिटस् च्या प्री-ऑर्डर्स मिळविण्यात यश आले असून, त्यातून या बाजारपेठेतील संधी आणि गरजा दिसून येत आहेत. मात्र या स्टार्टअप्सपुढील सर्वात मोठे आव्हान आहे ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात करण्यासाठी आवश्यक ते भांडवल मिळविण्याचे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कथा :

तीन वर्षांत तीन स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तेहतीस वर्षिय अर्पिता खद्रीया म्हणतात ‘ही तर केवळ सुरुवात’….

हैद्राबादच्या टमीकार्टची सहा महिन्यात भरारी, खाद्यपुरवठा क्षेत्रातला नवा खेळाडू

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग

लेखक – तरुष भल्ला

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags